Showing posts with label P - T. Show all posts
Showing posts with label P - T. Show all posts

Thursday, February 12, 2009

शेवग्याच्या शेंगांची आमटी - Drumstick Amati (Dal)

Drumstick Dal in English

Maharashtrian Dal, Goda Masalyachi Amati, Kala masala, drumstick curry, drumstick dal, goda masala, shevgyachya shenga, shevagyachya shenga
साहित्य:
१/२ कप तूरडाळ
७ ते ८ शेवग्याच्या शेंगांचे तुकडे (४ इंचाचे)
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
५ ते ६ कढीपत्ता पाने (Know more : Health Benefits of Curry Leaves)
४ ते ५ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१/४ कप खोवलेला नारळ
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१ ते दिड टिस्पून गोडा मसाला
१ टेस्पून गूळ
३ ते ४ आमसुलं
चवीपुरते मिठ

कृती:
१) तूरडाळ प्रेशर-कूकरमध्ये ६ ते ७ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. नंतर शेवग्याच्या शेंगा २ ते ३ शिट्ट्या करून शिजवून घ्याव्यात. तूरडाळ आणि शेवग्याच्या शेंगा एकत्र कूकरमध्ये शिजवू नयेत, नाहीतर शेंगा जास्त शिजतील आणि फुटतील. शेंगा शिजवताना थोडे मिठ घालावे.
२) तूरडाळ वरण निट घोटून घ्यावे. पातेल्यात तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, मिरची, कढीपत्ता, नारळ घालून फोडणी करावी त्यात कोथिंबीर घालून १५ ते २० सेकंद परतावे. नंतर यात तूरडाळ घालावी गरजेनुसार पाणी घालावे.
३) आमटीला एक उकळी आली कि शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालाव्यात. गोडा मसाला, आमसुलं आणि मिठ घालून मध्यम आचेवर आमटी ५ मिनीटे उकळू द्यावी. नंतर गूळ घालावा आणि साधारण २ ते ३ मिनीटे उकळू द्यावी. गॅस बंद करून थोडावेळ पातेल्यावर झाकण ठेवावे.
शेवग्याची आमटी तूप-भाताबरोबर सर्व्ह करावी.

Labels:
Shevgyachya Shenganchi Amati, Drumstick dal

Tuesday, February 10, 2009

पाइनॅपल मँगो सलाड - Pineapple Mango Salad

Pineapple Mango Salad in English

वाढणी: २ जणांसाठी

ananasache salad, pineapple raita, healthy salad recipe, fruit salad, Mango salad
साहित्य:
१/४ कप अननसाचे लहान तुकडे
३/४ कप आंब्याचे पातळ उभे काप (आंबा आधी सोलून घ्यावा)
१/२ टिस्पून लिंबाचा रस
१/८ टिस्पून चाट मसाला
१/८ टिस्पून काळे मिठ
१/८ टिस्पून मिरपूड
१ टिस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/८ टिस्पून सुक्या लाल मिरचीचा चुरा
चवीपुरते मिठ
सजावटीसाठी १ लेट्युसचे पान

कृती:
१) एका वाटीत लिंबाचा रस, चाट मसाला आणि काळे मिठ मिक्स करावे.
२) एका वाडग्यात अननसाचे चौकोनी तुकडे आणि आंब्याच्या कापट्या हलक्या हाताने मिक्स करावे. लिंबूरसाचे मिश्रण यात घालून हळू हळू मिक्स करावे. चव पाहून गरज पडल्यास मिठ घालावे.
३) सर्व्हींग प्लेटमध्ये लेट्युसचे पान ठेवावे त्यात तयार सलाड घालावे. मिरपूड आणि कोथिंबीरीने सजवावे. तासभर फ्रिजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करावे.

Labels:
Pineapple Salad, Mango Pineapple Salad, Tangy Mango Salad

Thursday, February 5, 2009

पनीर कढाई - Paneer Kadhai

Paneer Kadhai in English

Visit my other Paneer Recipes - Paneer Makhanwala | Vegetable Paneer Pizza | Paneer Kofta Curry | Paneer Hariyali | Chili Paneer | Palak Paneer | Paneer Masala | Paneer Matar


Paneer kadai recipe, Paneer recipe, North Indian Recipe, Punjabi food Indian food recipe
साहित्य:
२५० ग्राम ताजे पनीर (पनीरची कृती)
२ कप उभे चिरलेले कांदे
१ टेस्पून आलेपेस्ट
१ टेस्पून लसूण पेस्ट
दिड कप टोमॅटो प्युरी
१ टेस्पून लाल तिखट
१ टिस्पून गरम मसाला
२ टेस्पून तेल
२ सुक्या लाल मिरच्या
१ तमालपत्र, १ दालचिनी, ५-६ मिरे, १ टिस्पून धणे, २ वेलची, ३-४ लवंगा
१/४ कप चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) प्रथम कढईत तेल गरम करावे. त्यात क्रमाने सुक्या मिरच्या, तमालपत्र, दालचिनी, मिरं, धणे, वेलची, लवंग घालावे. मध्यम आचेवर मसाल्याचा छान वास सुटेपर्यंत परतावे. नंतर त्यात चिरलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट घालावी. आणि परतावे. चवीपुरते मिठ घालावे.
२) कांदा चांगला परतला गेला कि त्यात टोमॅटो प्युरी, लाल तिखट आणि गरम मसाला घालावा आणि ढवळावे. एक उकळी आल्यावर पनीरचे चौकोनी तुकडे घालून मध्यम आचेवर गरम करावे. हलक्या हाताने ढवळावे जेणेकरून पनीर फुटणार नाही.

टीप:
१) जर पनीर फ्रोजन असेल तर आधी तेल शालो फ्राय करून घ्यावे.
२) आख्खा गरम मसाला वापरल्याने अजून छान फ्लेवर येतो. जर धणे किंवा आख्खी मिरी नसेल आणि धणेपूड किंवा मिरपूड असेल तर ती वापरू शकतो, फक्त ती ग्रेव्हीत घालावी.
जर आख्खा गरम मसाला (तमालपत्र, दालचिनी, मिरे, धणे, वेलची, लवंगा)नसेल तर रेडीमेड गरम मसाला पावडर थोडी जास्त प्रमाणात वापरावी.

Labels: Paneer Kadhai, Paneer Karai, North Indian curry, Paneer curry recip

Tuesday, January 27, 2009

पाइनॅपल रायता - Pineapple Raita

Pineapple Raita in English

वाढणी : २ जणांसाठी

pineapple raita, yogurt raita recipe, healthy raita, Pineapple salad, Pineapple yogurt saladसाहित्य:
३/४ कप अननस लहान फोडी
१ कप दही
१/८ टिस्पून जिरेपूड
चवीपुरते मिठ
१ टेस्पून साखर
१ लहान हिरवी मिरची (ऐच्छिक)
१ टिस्पून कोथिंबीर
१ चेरी सजावटीसाठी (ऐच्छिक)
४ ते ५ अननसाचे लहान तुकडे सजावटीसाठी

कृती:
१) दही चांगले फेटून घ्या. त्यात साखर आणि थोडे मिठ घालावे. जर थोडा तिखटपणा हवा असेल तरच मिरची घालावी.
२) फेटलेल्या दह्यात अननसाच्या फोडी घालाव्यात. चव पाहून साखर मिठ आवडीनुसार वाढवावे, मिक्स करावे. सर्व्हींग बोलमध्ये घालून त्यावर जिरेपूड भुरभूरावी. नंतर अननसाच्या फोडी, कोथिंबीर आणि चेरीने सजवावे. थोडावेळ थंड करून सर्व्ह करावे.

टीप:
१) जर फक्त गोड रायते हवे असेल तर हिरवी मिरची वगळावी.
२) काही जणांना गोड रायते आवडते. त्यांनी आवडीनुसार साखर वाढवावी.
३) किंचीत मिरपूड घातल्याने छान स्वाद येतो. फक्त ती सर्व्ह करण्याआधी दह्यात मिसळू नये, त्यामुळे दह्याचा रंग बदलेल. म्हणून जिरपूडसारखीच वरून भुरभूरावी.

Tuesday, January 20, 2009

वेज पनीर माखनवाला - Paneer Makhanwala

Veg Paneer Makhanwala in English

वाढणी: ३ जणांसाठी

खाली दिलेली कृती ज्यांना खुप मसालेदार पंजाबी भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी स्पेशल आहे. चवीला खुप छान आणि सौम्य लागते.

paneer makhanwala, paneer recipes, punjabi food, north indian curry, Indian spicy foodसाहित्य:
१/२ कप पनीरचे तुकडे
१/४ कप फरसबीचे तुकडे (१/२ इंच)
१/४ कप गाजर (छोटे चौकोनी तुकडे)
१/४ कप बटाटा (सोलून छोटे तुकडे)
१/४ कप फ्लॉवरचे तुकडे
१/२ कप कांदा (छोटे तुकडे)
३ टेस्पून मटार
१ कप टोमॅटोचे तुकडे (सोललेला)
१ टेस्पून टोमॅटो पेस्ट
१/२ टेस्पून जिरे
१/२ टेस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून गरम मसाला
१ तमालपत्र
दिड टेस्पून दुध
दिड टेस्पून बटर
२ टेस्पून तूप
चवीपुरते मिठ

कृती:
१) २ कप पाण्यात फरसबीचे तुकडे, गाजर, बटाटा, फ्लॉवरचे तुकडे आणि मटार उकळवत ठेवावे. या पाण्यात १ तमालपत्र घालावे. भाज्या निट शिजू द्याव्यात. भाज्या शिजल्या कि उरलेले पाणी ठेवून द्यावे. तमालपत्र काढून टाकावे.
२) २ टोमॅटो पाण्यात साल सुटेस्तोवर उकळवावे. साले काढून टोमॅटोचे बारीक तुकडे करावे.
३) नॉनस्टीक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जिरे घालावे व कांदा परतावा. कांदा परतला कि १/२ टिस्पून गरम मसाला घालावा. कांदा निट शिजू द्यावा.
४) नंतर टोमॅटोचे तुकडे घालावे. तूपाचा तवंग येईस्तोवर शिजू द्यावे.
५) नंतर उकळलेल्या भाज्या घालाव्यात, भाज्या उकळून उरलेले पाणी, टोमॅटोपेस्ट घालावी, मिठ आणि तिखट घालावे. ढवळावे.
६) गॅस मंद करून दुध, बटर, पनीर घालून हळूवार ढवळावे.४ ते ५ मिनीटे मंद आचेवरच झाकून शिजू द्यावे.
गरमा-गरम भाजी नान, रोटी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी.

Labels:
Paneer Makhanwala, Vegetable Makhanwala, Punjabi Recipes

Tuesday, January 13, 2009

तिळाच्या वडया - Tilachya Vadya

Tilachya Vadya in English

साधारण २० वड्या

साहित्य:
१/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
१/२ कप किसून भाजलेले सुके खोबरे
१/२ कप तिळ
पाऊण कप किसलेला गूळ
१/२ टेस्पून तूप (साधारण २ टिस्पून)
१/२ टिस्पून वेलचीपूड
सुकामेवा (ऐच्छिक) (काजू बदामचे तुकडे)

कृती:
१) तिळ मध्यम आचेवर कोरडेच भाजून घ्यावेत. आणि मिक्सरमध्ये अगदी काही सेकंद फिरवावे. तिळाची पूड करू नये, तिळ अर्धवट मोडले गेले पाहिजेत.
२) वड्या करण्यापुर्वी दोन स्टीलच्या ताटांना तूपाचा हात लावून ठेवावा. पातेल्यात तूप गरम करावे. त्यात किसलेला गूळ घालावा. गूळ वितळला कि गॅस बंद करावा. लगेच त्यात शेंगदाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, आणि भाजलेले तिळ घालावेत आणि भराभर मिक्स करावे. लगेच वेलचीपूड आणि सुकामेवा घालावा. मिक्स करून हे दाटसर मिश्रण तूप लावलेल्या ताटात घालून थापावे. मिश्रण गरम असल्याने थापण्यासाठी एखाद्या वाटीच्या बुडाला तूप लावून त्याने थापावे.
३) मिश्रण गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

Labels:
Sesame Cakes, Sesame vadi, Tilachya Vadya

Thursday, December 25, 2008

सोलकढी - Solkadhi

Solkadhi in English

Solkadhi is a refreshing appetizer drink originated in Konkan region, Maharashtra. Solkadhi is made of Kokum fruit, Coconut milk and flavored with Garlic and Cumin. Konkani or Malvani cuisine is little spicy and solkadhi gives soothing effect after hot and spicy yet very delicious meal. Also kokum helps in digestion process.
Solkadhi is served chilled or lukewarm.

वाढणी: दिड कप

Maharashtrian, Solkadhi, Marathi, Kokum Kadhi, Malvani Kadhi, Konkani Recipes
साहित्य:
७ ते ८ आमसुलं
१ कप नारळाचे दूध
१ ते २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
२ लसूण पाकळ्या
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/२ टिस्पून जिरेपूड
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे

कृती:

१) आमसुलं १/२ कप गरम पाण्यात भिजत टाकावीत. अर्ध्या-पाऊण तासाने त्याच पाण्यात आमसुलं कुस्करून घ्यावीत आणि पाणी गाळून घ्यावे.
२) कोथिंबीर आणि मिरची एका वाडग्यात घ्यावे. त्यात किंचीत मिठ घालून हाताने किंवा चमच्याने कुस्करावे.
३) लसूण बारीक चिरून घ्यावी.
४) जिरे किंचीत कुटून घ्यावे.
फोडणी न करता सोलकढी ::::
नारळाच्या दुधात आमसुलाचे पाणी, कुस्करलेली कोथिंबीर मिरची, चिरलेली लसूण आणि कुटलेले जिरे मिक्स करावे. चवीपुरते मिठ घालावे.
फोडणी केलेली सोलकढी::::
नारळाच्या दुधात आमसुलाचे पाणी, कुस्करलेली कोथिंबीर मिरची आणि चिरलेली लसूण घालून मिक्स करावे. चवीपुरते मिठ घालावे. कढल्यात तूप गरम करून त्यात कुटलेले जिरे घालून हि फोडणी नारळ दुधाच्या मिश्रणात घालावी आणि निट मिक्स करावे.
थंडच सर्व्ह करावे किंवा अगदी मंद आचेवर कोमटसर करावे जास्त गरम करू नये. सर्व्ह करताना वरून जिरेपूड भुरभूरावी. जिरेपूड आधीच मिक्स करू नये नाहीतर सोलकढीचा रंग बदलतो.
सोलकढी नुसतीच किंवा भाताबरोबर खायलाही छान लागते.

टीप:
१) १/४ कप घट्टसर आंबट ताक घातले तर खुप छान चव येते.
२) कोकमाचे आगळ म्हणजेच साखरविरहित कोकमाचा घट्ट कोळ (Kokum Concentrate) बाजारात विकत मिळतो. ते वापरूनही सोलकढी बनवता येते.

Labels:
Solkadhi, Kokum Kadhi

Tuesday, December 2, 2008

रताळे किस - Ratale Kis

Ratale Kis in English

वाढणी: २-३ जणांसाठी

ratalyacha kis, ratale kis, fasting food, fasting recipe, high carb food, low calorie food
साहित्य:
साडेचार कप रताळ्याचा किस (३ मोठी रताळी)
१ टेस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
४ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून किंवा २-३ सुक्या लाल मिरच्या
१/४ कप कोथिंबीर
१/२ टिस्पून जिरेपूड
3 टेस्पून शेंगदाण्याचा कूट
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून साखर
२ टेस्पून कोथिंबीर
१ टेस्पून लिंबाचा रस
२ टेस्पून ओल्या नारळाचा चव

कृती:
१) रताळी स्वच्छ धुवून घ्यावीत. मी शक्यतो साले काढत नाही फक्त रताळ्यावर काळपट डाग असतील तेवढे सुरीने काढून टाकते. पण जर वाटले तर साल काढून मग किसावे. रताळी किसताना जवळ एक गार पाणी भरलेले पातेले तयार ठेवावे. अर्धे रताळे किसले कि या पाण्यात टाकावे म्हणजे किसलेले रताळे काळे पडणार नाही.
२) कढईत तूप गरम करावे त्यात जिरे, मिरच्या घालून फोडणी करावी. तसेच १/४ कप कोथिंबीर फोडणीस घालावी. लगेच पाण्यात घातलेले रताळे किस दोन्ही हातांनी पिळून कढईत टाकावे. जिरेपूड घालून निट परतावे. आधी मिठ घालू नये कारण रताळ्याचा किस शिजत आला कि बराच आळतो आणि मिठाचा अंदाज चुकू शकतो.
३) मध्यम आचेवर रताळ्याचा किस झाकण न ठेवता शिजू द्यावा. कालथ्याने निट ढवळावे. ६-७ मिनीटांत रताळ्याचा किस आळतो तसेच अर्धवट शिजतो. त्यात थोडे मिठ, साखर, शेंगदाण्याचा कूट घालून परतावे. थोडावेळ झाकण ठेवून शिजू द्यावे.
रताळ्याचा किस तयार झाला कि त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालून दह्याबरोबर सर्व्ह करावे.

Labels:
Ratalyacha Kis, Potato hash, Indian sweet Potato hash, ratale kees

Tuesday, November 18, 2008

पिंडी छोले - Pindi Chole

Pindi Chhole in English

वाढणी: २ जणांसाठी

Punjabi Chhole, Chana masala,Pindi Chole recipe
साहित्य:
३/४ कप काबुली चणे
३ टेस्पून + २ टिस्पून तेल
१/४ कप कांदा, बारीक चिरून
२ टिस्पून आलेपेस्ट
२ टिस्पून लसूणपेस्टChana masala gravy, Indian restaurant style Recipe
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१ टेस्पून धणेपूड
१ टेस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून आमचूर पावडर
दिड टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून हळद
२ टिस्पून जिरं
२ टिस्पून अनारदाणा
१ मध्यम टॉमेटो
१ टिस्पून गरम मसाला
चवीनुसार मिठ
१ लाल मिरची
सजावटीसाठी
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
कांद्याच्या चकत्या

छोले आणि भटुरे रेसिपी

कृती:
१) पाउण कप काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवावेत. भिजवलेले चणे कूकरमध्ये ४-५ शिट्ट्या करून शिजवावेत. चणे छान मऊसर शिजवावेत. खुप जास्तही शिजवू नयेत, नाहीतर चणे फुटू शकतात. चणे शिजवताना मिठ घालून शिजवावेत. उरलेले पाणी ठेवून द्यावे.
२) नॉनस्टिक पॅनमध्ये २ टिस्पून जिरं, मध्यम आचेवर कोरडेच भाजावे. नंतर २ टिस्पून अनारदाणा थोडावेळ भाजावे. हे दोन्ही जिन्नस थोडे थंड झाले कि खलबत्त्यात घालून पूड करून घ्यावी.
३) नॉनस्टिक पॅनमध्ये ३ टेस्पून तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट घालावे. नंतर त्यात आलेलसूण पेस्ट घालून थोडा वेळ परतावे. गॅस मध्यम करावा आणि चिरलेला कांदा घालावा. तेल सुटेस्तोवर परतावे.
४) कांदा परतला कि त्यात धणे-जिरेपूड, आमचूर पावडर घालावी. १/४ कप शिजवलेल्या चण्याचे उरलेले पाणी घालावी. मध्यम आचेवर उकळी येऊ द्यावी.
५) नंतर शिजवलेले चणे घालून हळूहळू मिक्स करावे. गरज लागल्यास थोडे पाणी घालावे. मिठ आणि आवश्यक तेवढी जिरे-अनारदाणा पावडर घालावी.
६) टॉमेटोचे मोठे चौकोनी तुकडे करून घालावेत. गरज वाटल्यास लाल तिखट किंवा कमी वाटत असलेला जिन्नस घालावा. मंद आचेवर २-३ मिनीटे वाफ काढावी.
७) सर्व्ह करताना, छोले सर्व्हींग प्लेटमध्ये काढावेत. एका छोट्या कढल्यात १ ते २ टिस्पून तेल गरम करावे. त्यात लाल मिरची घालून हि फोडणी लगेच भाजीवर ओतावी. वरून कोथिंबीर आणि कांद्याच्या चकत्या घालून सर्व्ह करावे.
नान, रोटी किंवा अगदी ब्रेडबरोबरही हे छोले मस्त लागतात.

Labels:
Pindi Chole, Chole Masala, Chana Masala, Punjabi Chole

Thursday, October 30, 2008

पनीर - Paneer

Paneer in English

Indian Cheese, Homemade Paneer, Paneer kase banvave, how to make Paneer Cheese at home
साहित्य:
१/२ गॅलन दूध (होल मिल्क)
२ टेस्पून व्हिनेगर किंवा लिंबाचा रस
१ सुती कपडा किंवा मस्लिन क्लॉथ
१ चाळणी किंवा कोलँडर

कृती:
१) एक जाड बुडाचे पातेले घ्यावे. त्यात दूध ओतून मध्यम आचेवर दूध उकळवायला ठेवावे.
२) दुध वाफाळले कि मोठ्या चमच्याने ढवळावे. दुध पातेल्याच्या तळाला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. दुध वाफाळले कि आच मिडीयम लो वर ठेवून त्यात १ टेस्पून व्हिनेगर हळूहळू घालावे. एकाच वेळी सर्व व्हिनेगर घालू नये, थेंबथेंब करून सर्व ठिकाणी व्हिनेगर घालून ढवळत राहावे. दुध फाटण्याची क्रिया सुरू झाली कि गॅस एकदम मंद करावा आणि व्हिनेगर घालून ढवळत राहावे. हळूहळू चोथा आणि पाणी वेगळे होईल. गॅस बंद करावा. पाण्याचा पांढरट रंग गेला कि समजावे पनीर गाळण्यासाठी तयार आहे.
३) पाणी आणि पनीर वेगळे झाले कि सुती कपडा चाळणीत पसरवून ठेवावा आणि चाळणीच्या खाली पाणी जमवण्यासाठी पातेले ठेवावे. पनीरचे ग्रॅन्युल्स कपड्यातच ठेवून गार पाण्याखाली हलक्या हाताने धुवून घ्यावे, म्हणजे व्हिनेगरचा वास जाण्यास मदत होते.
४) पनीर साधारण १/२ तास टांगून ठेवावे. नंतर गच्च चौकोनी आकारात बांधून घ्यावे म्हणजे पनीरची घट्ट अशी वडी बनेल आणि छान क्युब्ज कापता येतील.
५) एखादा प्लेन सरफेस (पोळपाट, फळी, कटींग बोर्ड) तिरका ठेवावा व त्यावर बांधलेले पनीर ठेवावे आणि बांधलेल्या पनीरवर एखादी जड वस्तू ठेवावी (वरवंटा). जड काही नसेल तर कूकरमध्ये पाणी भरून झाकण लावावे आणि कूकर पडणार नाही अशा रितीने ठेवावे. पनीर तिरक्या पोझिशनमध्ये ठेवल्याने त्यातील अधिकचे पाणी निघून जाईल. जर काही लाकडी वस्तू प्लेन सरफेस म्हणून वापरणार असाल तर त्यावर प्लास्टिक किंवा अल्युमिनीयम फॉईल ठेवावी नाहीतर लाकूड तसेच पनीर खराब होवू शकते.
६) ६ ते ७ तासात पाणी निघून जाते आणि पनीरची छान वडी तयार होते.

टीप:
१) सुती कपडा एकदम घट्ट विणेचा असु नये नाहीतर गाळताना निट गाळले जात नाही, पाणी पुर्ण वाहून जात नाही.
२) लिंबाचा रस थोड्या पाण्यात मिसळून ते पाणी गरजेपुरतेच वापरावे. लिंबाचा रस जास्त घातला गेला तर पनीरला लिंबाचा स्वाद लागू शकतो.
३) गाळलेले पाणी बाटलीत भरून रेफ्रिजरेट करून नंतर पनीर बनवताना व्हिनेगरऐवजी वापरता येते.

Labels:
Paneer Recipe, how to make Indian Paneer Cheese, Homemade Paneer

Tuesday, October 14, 2008

सोया ग्रॅन्युल्स कटलेट - Soya Cutlet

Soya Granules Cutlet in English

Cutlet, Soya Cutlet, Healthy Cutlet, Vegetable Cutlet, Indian Snack, Savory Snack, Tea time snack
साहित्य:
१ कप न्युट्रेला सोया ग्रॅन्युल्स
(मी रूची ब्रँडचे सोया ग्रॅन्युल्स वापरले होते)
१ कप उकडलेला बटाटा, किसून
१/२ कप वाफवलेले मटार
१ किसलेले गाजर
७-८ वाफवलेली फरसबी, बारीक चिरून
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टिस्पून जिरेपूड
१/४ कप कांदा, पातळ उभा चिरून
१ टिस्पून आले पेस्ट
५-६ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
६-७ कढीपत्ता
२ टेस्पून बेसन
१ टिस्पून तेल
चवीनुसार मिठ
१/२ कप भाजलेला रवा
शालो फ्राईंगसाठी तेल

कृती:

१) ३ ते ४ कप पाणी उकळत ठेवावे. त्यात १ टिस्पून मिठ आणि १ कप न्युट्रेला ग्रॅन्युल्स आणि घालून ५ मिनीटे मध्यम आचेवर उकळवावे. नंतर हे ग्रॅन्युल्स चाळणीत काढून १० मिनीटे निथळत ठेवावे. १-२ वेळा थंड पाण्याने धुवून घ्यावे. पाणी निथळून गेले कि ग्रॅन्युल्स हाताने पिळून घ्यावेत. पाणी राहू देवू नयेत.
२) नॉनस्टिक पॅनमध्ये १ टिस्पून तेल गरम करावे त्यात कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, आले पेस्ट घालावी. काही सेकंद परतून कांदा घालावा. कांदा परतला गेला कि त्यात बेसन घालून मंद आचेवर परतावे. बेसन निट परतले गेले कि हे मिश्रण दुसर्‍या वाडग्यात काढून ठेवावे.
३) एका मोठ्या भांड्यात शिजवलेले ग्रॅन्युल्स, उकडलेला बटाटा, वाफवलेले मटार, किसलेले गाजर, फरसबी, कोथिंबीर, जिरेपूड, बेसनाचे मिश्रण आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे. वाटल्यास थोडे लाल तिखट घालावे. निट मिक्स करावे.
४) वरील मिश्रणाचे मध्यम आकाराचे चपटे कटलेट करावे. भाजलेल्या रव्यामध्ये घोळवून, मध्यम आचेवर हे कटलेट शालो फ्राय करावेत.

टीप:
१) जर लसणीचा फ्लेवर आवडत असेल तर १/२ टिस्पून लसणीची पेस्ट फोडणीत घालावी.
२) भाजलेल्या रव्याऐवजी कोटींगसाठी ब्रेड क्रम्ससुद्धा वापरू शकतो.

Labels:
Nutrela Granules, Soya Granules Cutlet, Healthy Cutlet

Thursday, October 2, 2008

पनीर वेजिटेबल पिझ्झा - Paneer Vegetable Pizza

Paneer Vegetable Pizza in English

वाढणी: १ मध्यम पिझ्झा (थिन क्रस्ट)

Pizza base, Pizza sauce, Indian style Pizza, Veggie Pizza, homemade Pizza dough, Pizza sauce, gourmet pizza
साहित्य:
पिझ्झा बेस:- इथे क्लिक करा

पिझ्झा सॉससाठी:- इथे क्लिक करा

टॉपिंगसाठी:
पनीर ७५ ते १०० ग्राम (साधारण १२-१५ लहान तुकडे)
१ टेस्पून दही
१/२ टिस्पून तंदूरी मसाला
१/२ टिस्पून आलेलसूण पेस्ट
१/४ ते १/२ कप कांदा, पातळ उभा चिरून
१/४ कप हिरवी भोपळी मिरची, पातळ उभी चिरून
१/४ कप लाल भोपळी मिरची, पातळ उभी चिरून
१/२ ते पाऊण कप किसलेले चिज

कृती:
पिझ्झा बेस:- इथे क्लिक करा
पिझ्झा सॉस:- इथे क्लिक करा

पनीरचे टॉपिंग
१) पनीरचे साधारण १२-१५ मध्यम तुकडे घ्यावेत.
१ टेस्पून दही + १/२ टिस्पून तंदूरी मसाला + १/२ टिस्पून आलेलसूण पेस्ट असे मिश्रण तयार करून यात पनीर घोळवून ठेवावेत साधारण १५ मिनीटे.

सर्व पदार्थांचे एकत्रिकरण (स्टेप बाय स्टेप इमेजेस)
१) सर्व पदार्थ तयार झाले कि ओव्हन ४८० F (२५० C) प्रिहिट करावे.
२) पिझ्झा बेसला तयार सॉस लावून घ्यावा त्यावर थोडे चिज घालावे.
३) त्यावर चिरलेल्या भोपळी मिरच्या आणि कांदा घालावा.( भाज्यांना आधी थोडे मिठ लावावे.)
४) नंतर मॅरिनेट केलेले पनीर घालावे, उरलेले चिज घालावे आणि साधारण ७-८ मिनीटे, किंवा चिज अगदी किंचीत ब्राऊन होईस्तोवर बेक करावे.

Labels:
Paneer Pizza, How to bake Pizza, homemade pizza, thin crust pizza recipe

पिझ्झा सॉस - Pizza Sauce

Pizza Sauce in English

साहित्य:
२ मोठे टॉमेटो, लालबुंद
१/४ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून साखर
१ लहान तुकडा दालचिनी
१/२ टिस्पून आलेलसूण पेस्ट
चवीपुरते मिठ

कृती:
१) टॉमेटो स्वच्छ धुवून घ्यावेत. पातेल्यात टॉमेटो बुडतील इतपत पाणी गरम करून त्यात टॉमेटो घालावेत ५ मिनीटे उकळवावेत. नंतर गॅस बंद करून ५ मिनीटे झाकून ठेवावेत.
२) साले आणि बिया काढून टाकाव्यात आणि टॉमेटोची प्युरी करून घ्यावीत.
३) एका नॉनस्टीक पॅनमध्ये टॉमेटोची प्युरी घालावी आणि त्यात लाल तिखट, साखर, दालचिनी, आलेलसूण पेस्ट, चवीपुरते मिठ घालून मंद आचेवर १० मिनीटे परतावे. दाटसर सॉस तयार झाला कि दालचिनी काढून टाकावी.

पिझ्झा बेसची कृती (Pizza Base)

पिझ्झाची कृती (Paneer Pizza Recipe)

झटपट ब्रेड पिझ्झा

Labels:
Pizza Suace, Tomato Pizza Sauce, How to Make Pizza Sauce

पिझ्झा बेस - Pizza Base

Pizza Base in English

वाढणी : १ थिन क्रस्ट पिझ्झा बेस

Pizza, Mozzarella Cheese, Vegetable Pizza Recipe, Indian style Pizza, Cheese Pizza
साहित्य:
३/४ कप मैदा
१ टिस्पून ड्राय यिस्ट
१/२ टिस्पून साखर
१/२ टिस्पून मिठ
१/४ कप कोमट पाणी
थोडा सुका मैदा पिझ्झा लाटताना

कृती:
१) एका बोलमध्ये २ टेस्पून कोमट पाणी घ्यावे, त्यात १ टिस्पून ड्राय यिस्ट व १/२ टिस्पून साखर घालून मिक्स करावे. हे मिश्रण १० मिनीटे झाकून ठेवावे. ५ ते १० मिनीटात हे मिश्रण फेसाळेल.
२) ३/४ कप मैदा वाडग्यात घेऊन हे फेसाळलेले मिश्रण त्यात घालावे, मिठ आणि थोडे तेल घालावे. गरजेनुसार थोडे कोमट पाणी घेऊन पिठ एकदम मऊसर मळून घ्यावे (साधारण ७-८ मिनीटे) . मळलेले पिठ एकदम Elastic झाले पाहिजे. मळलेल्या पिठाच्या गोळ्याला तेलाचा हात लावून एका काचेच्या किंवा इतर कोणत्याही, बर्‍यापैकी खोलगट (साधारण ६-७ इंच ) भांड्यात ठेवून वरून निट झाकावे. उबदार ठिकाणी हे भांडे दिड तास ठेवावे म्हणजे पिठ फुगून येईल.
३) मळलेले पिठ व्यवस्थित फुगले कि ओव्हन ४८० F (२५० C) वर प्रिहीट करावे. यिस्टमुळे पिठात हवेचे बुडबुडे तयार होतात, म्हणून पिठ परत एकदा निट मळून घ्यावे (३ मिनीटे). मळताना थोडा तेलाचा हात लावावा.
४) सुका मैदा भुरभूरवून जाडसर पोळी लाटावी (१ सेमी). काट्याने (Fork) पूर्ण पोळीवर टोचावे म्हणजे बेक करताना फुगणार नाही. पोळीला वरून थोडे तेल लावावे.
५) साधारण ६-८ मिनीटे बेक करून घ्यावे.

पिझ्झा सॉसची कृती (Pizza Sauce)
पनीर पिझ्झाची कृती (Paneer Pizza)

Labels:
Pizza Base, Easy Pizza Base Recipe, Pizza Dough

Thursday, September 25, 2008

पनीर कोफ्ता करी - Paneer Kofta Curry

Paneer Kofta Curry in English

kofta curry, kofta recipes, malai kofta curry, north indian recipes, curry recipe, Indian Curry Recipe, asian food, Paneer Kofta curry, Paneer Recipes, how to make paneer

साहित्य:
::::कोफ्ता::::
कोफ्त्याच्या साहित्यासाठी इथे क्लिक करा
::::करी::::
३/४ कप कांदा पेस्ट (स्टेप १)
१/२ कप टॉमेटो प्युरी (स्टेप २)
१ टेस्पून आलेलसूण पेस्ट
१/२ टिस्पून गरम मसाला
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
१/४ कप दूध (होल मिल्क)
१ टेस्पून तेल
७-८ पनीरचे लहान तुकडे
मिठ
सजावटीसाठी:
१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरलेली
३-४ द्राक्षं, अर्धे तुकडे करून

कृती:
कोफ्ता करी करताना आधी करी करून घ्यावी. म्हणजे कोफ्ते नरम पडणार नाहीत.
::::करी::::
१) साधारण २ कांदे प्रेशर कूकरमध्ये २-३ शिट्ट्या करून शिजवून घ्यावेत. मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी.
२) २ मोठे लालबुंद टॉमेटो शिजवून त्याची साले काढावीत, बिया काढून टाकाव्यात. मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यावीत.
३) कढईत तेल गरम करावे. त्यात आलेलसूण पेस्ट परतावी. हळद, लाल तिखट घालावे व ढवळावे. नंतर कांद्याची पेस्ट घालून मंद आचेवर ५ मिनीटे वाफ काढावी.
४) नंतर टॉमेटो प्युरी घालून ढवळावे.धणेपूड आणि मिठ घालून मंद आचेवर कढई झाकून वाफ काढावी. शेवटी गरम मसाला टाकून वाफ काढावी.
५) अशी ग्रेव्ही तयार करून ठेवावी आणि कोफ्ते घालायच्या आधी त्यात दूध घालून मंद आचेवर ५ मिनीटे उकळवावे.

कोफ्ता
कोफ्त्याच्या कृतीसाठी इथे क्लिक करा

ग्रेव्ही मंद आचेवर गरम करावी व त्यात दूध घालून मिक्स करावे. कढईवर झाकण ठेवून ५ मिनीटे मंद आचेवर उकळू द्यावे, आयत्यावेळी पनीरचे तुकडे घालावे.

तयार कोफ्ते सर्व्हींग प्लेटमध्ये ठेवावेत त्यावर गरम ग्रेव्ही घालावी. कोथिंबीर आणि द्राक्षं घालून सजवावे. नान, रोटी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.

Labels:
Paneer Kofta Recipe, North Indian food, Indian Curry Recipes, Kofta recipe, Paneer Recipe

कोफ्ता - Kofta

Kofta in English

Paneer Recipes, Paneer kofta curry, Indian curry recipes, Indian food, Indian restaurant style curry, Indian recipes, Paneer Kofta curry, Kofta recipes
साहित्य:
१ कप शिजवून किसलेला बटाटा (साधारण २ मध्यम)
१ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ ते १/२ कप किसलेले पनीर
२ टेस्पून बारीक चिरलेला कांदा
१० ते १२ मनुके/बेदाणे
१ टेस्पून काजूचे तुकडे
१ हिरवी मिरची
१ टिस्पून बटर
तळण्यासाठी तेल
मिठ
कोफ्ता करीच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:
१) एका लहान कढई मध्यम आचेवर तापवून १ टिस्पून बटर घालावे.त्यात २ टेस्पून चिरलेला कांदा घालून तो ब्राऊन होईस्तोवर परतावा. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, काजूचे तुकडे, मनुके घालून १ मिनीट परतावे. शेवटी पनीर आणि मिठ घालून थोडावेळ परतावे आणि हे मिश्रण एका छोट्या वाडग्यात काढावे. थोडे कोमट होवू द्यावे.
२) शिजवून किसलेले बटाटे, १ टेस्पून कॉर्न फ्लोअर आणि थोडे मिठ एकत्र करून निट मळून झाकून ठेवावे.
३) बटाट्याच्या मिश्रणाचे साधारण १० गोळे करावे (१ इंच). प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावून या मिश्रणाची पुरी लाटावी किंवा हातानेच मोदकासाठी करतो तशी पारी करावी. त्यात आवश्यक तेवढे पनीरचे मिश्रण मध्यभागी ठेवून पुरी सर्व बाजूनी बंद करावी. आणि हे कोफ्ते मध्यम आचेवर गोल्डन रंगावर तळून काढावे.

Labels:
Kofta balls, Paneer Stuffed Potato Balls, Golden brown fried Indian Paneer

Thursday, September 18, 2008

शिंगाडा पिठाचे लाडू - Shingada Pithache Ladu

Shingada Flour Laddoo in English

हे लाडू करायला सोप्पे आणि चविष्ट असतातच तसेच उपवासालाही चालतात.

वाढणी : ५ ते ६ लाडू

shingada recipe, fasting recipe, laddu recipe, ladu recipe, ladoo recipe, maharashtrian laddu recipe, upvas recipe
साहित्य:
१/४ कप घट्ट तूप (पातळ असेल तर १/४ कपपेक्षा जास्त आणि १/२ कपपेक्षा थोडे कमी)
१/२ कप शिंगाडा पिठ
१/२ कप साखर
१/२ टिस्पून वेलचीपूड
१ टेस्पून खारीक पूड (ऐच्छिक)
१ टेस्पून सुकं भाजलेले खोबरे (ऐच्छिक)

कृती:
१) कढईत तूप गरम करून त्यात शिंगाडा पिठ खमंग भाजून घ्यावे. शेवटी सुके खोबरे आणि खारीकपूड घालून एखाद मिनीट परतावे.
२) भाजलेले पिठ गरम असतानाच त्यात साखर, वेलचीपूड घालून लाडू वळावेत.

Label:
laadu recipe, Laddu recipe, Shingada Pithache ladu, Upvas recipe, Fasting recipe

Tuesday, September 16, 2008

शाही टुकडा - Shahi Tukda

Shahi Tukda (English Version)

dessert, sweets, indian sweets, cold dessert, gain weight, target weight, festival food, delicacies, Pakistani food, grocery, bread Pudding

साहित्य:
३ ब्रेडचे स्लाईस
३ कप दूध (होल मिल्क)
१/२ कप कंडेन्स मिल्क (sweetened)dessert dishes, gourmet dessert, quick and easy dessert, party sweets, dessert ideas
२ टेस्पून साखर
१ टेस्पून पिस्त्याचे काप (अनसॉल्टेड आणि रोस्टेड)
१ टिस्पून वेलचीपूड
चिमूटभर केशर
तळण्यासाठी तूप

कृती:
१) दूध मध्यम आचेवर उकळत ठेवावे. आटवून दिड ते पाऊणेदोन कप करावे. कंडेन्स मिल्क घालून ५ मिनीटे उकळवावे. २ टेस्पून साखर घालावी. गरजेनुसार साखर कमी किंवा जास्त करावी. यात वेलचीपूड आणि केशर घालावे. पिस्त्याचे काप घालावेत, थोडे सजावटीसाठी ठेवावेत.
२) ब्रेड स्लाईसच्या कडा काढून टाकाव्यात. ब्रेडचे त्रिकोणी किंवा आवडत्या आकारात तुकडे करावे. तुपात तळून किंवा मंद आचेवर शालो फ्राय करून घ्यावेत. ब्रेडचे स्लाईस कुरकूरीत आणि बाहेरून थोडे ब्राउन करून घ्यावेत.
३) सर्व्हींग प्लेटमध्ये तळलेले ब्रेडचे स्लाईस ठेवावेत त्यावर आटवलेले दूध घालून आणि फ्रिजमध्ये थंड करत ठेवावेत. थंड झाल्यावर दुध छान घट्ट होते. वरून पिस्त्याचे काप घालून सजवावे.

टीप:
१) ब्रेडचे स्लाईस तेलात शालोफ्राय केलेले चालतात. तळून झाल्यावर यातील सर्व अधिकचे तेल निघून गेल पाहिजे नाहीतर खाताना तेलाची चव लागते. त्यासाठी तळल्यावर ब्रेडचे स्लाईस काहीवेळ पेपर टॉवेलवर वर काढून ठेवावेत.

Labels:
Shahi Tukada, recipe for Shahi Tukda, Indian Shahi Tukda, Indian Sweets recipe, Dessert

Tuesday, September 2, 2008

हुम्मूस - Hummus

Hummus and pita bread (English Version)

हुम्मुस (Hummus) हा पदार्थ मिडल इस्टमध्ये बनवला जाणारा चटणीसारखा पदार्थ आहे. या पदार्थात काबुली चणे (छोल्याचे चणे) हे मुख्यत्वे वापरले जातात.
हुम्मुसमध्ये "ताहिनी" (Sesame Paste) म्हणजेच भाजलेले तिळ व ऑलिव्ह ऑइल (Olive Oil) एकत्र वाटून केलेली पेस्ट वापरली जाते, पण थोडे बदल करून खालील कृतीत मी फक्त भाजलेल्या तिळाचा वापर केला आहे.
हुम्मुसबरोबर जोडीला पिटा ब्रेड सर्व्ह केला जातो. पिटा ब्रेडच्या कृतीसाठी इथे क्लिक करा.

वाढणी : साधारण १/२ कप

hummus, middle eastern food, hummus pita bread, baking, how to bake, chutney recipe, tahina sauce, tahini, recipe for pita bread, healthy protein food, Mediterranean food, heart healthy recipe

साहित्य:
१-२ लसूण पाकळ्या
३/४ कप मऊसर शिजवलेले काबुली चणे
१ ते २ टिस्पून भाजलेले तिळ
१ टेस्पून लिंबाचा रस
१/४ कप पाणी
१ टिस्पून ऑलिव्ह ऑइल (टीप १)
१/४ टिस्पून मिरपूड
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मिठ

कृती:
१) वरील सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. डब्यात बंद करून फ्रिजमध्ये काही तास थंड करावे.

टीप:
१) हुम्मुसमध्ये ऑलिव्ह ऑइल हा महत्त्वाचा पदार्थ आहे. मी ऑलिव्ह ऑइल वापरले नव्हते तरीही चव छान लागली, त्यामुळे आपल्या आवडीनुसार याचा वापर करावा.
२) हुम्मुस २-३ दिवस फ्रिजमध्ये सहज टिकते.

Labels:
hummus, pita bread, dip recipe, how to make hummus, chickpea hummus,hummus without oilve oil

पिटा ब्रेड - Pita Bread

Pita Bread (English Version)

वाढणी : १ ब्रेड (६ इंची)

hummus, middle eastern food, cuisine, hummus pita bread, baking, how to bake, oil free, hummus tahini, recipe for pita bread, healthy protein food, Mediterranean food, healthy diet, healthy nutrition
साहित्य:
१/४ कप मैदा
१ टिस्पून ड्राय यिस्ट (Active Dry Yeast)
३ टेस्पून कोमट पाणी (टीप १)
१/२ टिस्पून मिठ
१/२ टिस्पून साखर
१ टेस्पून ऑलिव्ह ऑइल

कृती:
१) प्रथम कोमट पाण्यात साखर घालून ढवळून घ्यावे. लगेच ड्राय यिस्ट घालून ढवळावे. हे मिश्रण १० मिनीटे झाकून ठेवावे ज्यामुळे यिस्ट active होईल आणि हे मिश्रण फेसाळेल.
२) मैदा एका वाडग्यात घ्यावा व त्यात मिठ घालून निट मिक्स करावे. त्यात यिस्टचे मिश्रण घालून मळून घ्यावे. आपल्याला हे पिठ एकदम सैलसर मळायचे आहे त्यामुळे गरज लागल्यास चमच्याने अजून थोडे कोमट पाणी घालून मळावे.
३) पिठ एकदम इलास्टिक होईस्तोवर मळावे. मळताना पिठ हाताला चिकटून नये म्हणून थोडे ऑलिव्ह ऑइल किंवा साधे तेल वापरावे. पिठ मळून एका भांड्यात ठेवावे.पूर्ण गोळ्याला वरून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ सुकणार नाही. मळलेले पिठ झाकून उबदार जागी साधारण तासभर ठेवावे.
४) तासाभराने पिठ फुलून दुप्पट आकाराचे झाले असेल. परत एकदा मळून त्यात तयार झालेले हवेचे बुडबुडे काढून टाकावेत. साधारण २-४ मिनीटे मळावे. मळताना शक्यतो अजून मैदा घालू नये.
५) ओव्हन ४५० F वर प्रिहीट करावे. ओव्हन प्रिहीट होईस्तोवर मळलेल्या पिठाची थोड्या मैदयाच्या सहाय्याने १/४ इंच जाडसर पोळी लाटावी. या पोळीवरील सुके पिठ अलगद झटकून टाकावे. पोळीचा पृष्ठभाग प्लेन असावा ज्यामुळे ब्रेड बेक केल्यावर फुलेल.
६) पोळीवर किंचित ऑलिव्ह ऑइलने ब्रशिंग करावे आणि baking sheet वर ठेवावी.ओव्हन प्रिहीट झाल्यावर हि पोळी ३-४ मिनीटे बेक करावी. बाहेर काढून बाजू पलटावी व दुसर्‍या बाजूने २-३ मिनीटे बेक करावी.
तयार पिटा ब्रेड हुम्मुसबरोबर सर्व्ह करावा.

टीप:
१) पाणी कोमटच असावे, गरम पाणी घेतल्यास यिस्ट मरते आणि हे पाणी वापरून जर पिठ भिजवले तर पिठ फुलणार नाही आणि त्यामुळे ब्रेड हलका होणार नाही.

Label:
Pita bread Hummus recipe Chickpea Humus recipe Pitta bread