Showing posts with label desserts. Show all posts
Showing posts with label desserts. Show all posts

Friday, October 10, 2008

दहीवडा - Dahi vada

Dahi Wada in English

वाढणी: साधारण १० मध्यम वडे

dahi wada, chat food, North Indian Snack, starter, appetizer
साहित्य:
::::वड्यांसाठी::::
पाउण कप उडदाची डाळ
१/४ कप ओल्या खोबर्‍याचे पातळ तुकडे
४-५ मिरं
चवीपुरते मिठ
२ कप पातळ ताक
तळण्यासाठी तेल
::::दही बनवण्यासाठी::::
दिड कप दही, ५-६ टेस्पून साखर, १ टिस्पून मिठ
::::वरून भुरभूरवण्यासाठी::::
मिरपूड, लाल तिखट, चाट मसाला

कृती:
१) उडीद डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. ४-५ तासानंतर डाळ उपसून ठेवावी. आणि पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. वाटलेले मिश्रण आपल्याला घट्टसर हवे आहे. पण अगदी गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे. त्यात मिठ, ठेचलेले मिरं, आणि खोबर्‍याचे पातळ काप घालावेत.
२) वडे मध्यम आचेवर गोल आकारात किंवा मेदूवड्याच्या आकारात तळून घ्यावे. वड्यांचा आकार खुप मोठा ठेवू नये. काहीवेळेस वडे आतून कच्चे राहू शकतात.
३) पातळ ताकात थोडी साखर आणि किंचीत मिठ घालावे. यामध्ये तळलेले वडे साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवावे.
४) तोवर वरून घालायचे दही तयार करून घ्यावे. वाडग्यात दही घ्यावे, रवीने नुसतेच घुसळून घ्यावे. मग किंचीत पाणी घालून आवश्यक तेवढा पातळपणा द्यावा. त्यात चवीनुसार साखर आणि मिठ घालावे. ढवळून घ्यावे. आणि थोडावेळ फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवावे.
सर्व्ह करताना ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घालावेत. त्यावर दही घालून वरती चाट मसाला, मिरपूड, आणि लाल तिखट घालावे.

Labels:
Dahi Vada, Chat food, Indian Wedding Food, Dahi wada recipe, Indian Chat food

Thursday, September 18, 2008

शिंगाडा पिठाचे लाडू - Shingada Pithache Ladu

Shingada Flour Laddoo in English

हे लाडू करायला सोप्पे आणि चविष्ट असतातच तसेच उपवासालाही चालतात.

वाढणी : ५ ते ६ लाडू

shingada recipe, fasting recipe, laddu recipe, ladu recipe, ladoo recipe, maharashtrian laddu recipe, upvas recipe
साहित्य:
१/४ कप घट्ट तूप (पातळ असेल तर १/४ कपपेक्षा जास्त आणि १/२ कपपेक्षा थोडे कमी)
१/२ कप शिंगाडा पिठ
१/२ कप साखर
१/२ टिस्पून वेलचीपूड
१ टेस्पून खारीक पूड (ऐच्छिक)
१ टेस्पून सुकं भाजलेले खोबरे (ऐच्छिक)

कृती:
१) कढईत तूप गरम करून त्यात शिंगाडा पिठ खमंग भाजून घ्यावे. शेवटी सुके खोबरे आणि खारीकपूड घालून एखाद मिनीट परतावे.
२) भाजलेले पिठ गरम असतानाच त्यात साखर, वेलचीपूड घालून लाडू वळावेत.

Label:
laadu recipe, Laddu recipe, Shingada Pithache ladu, Upvas recipe, Fasting recipe

Tuesday, September 16, 2008

शाही टुकडा - Shahi Tukda

Shahi Tukda (English Version)

dessert, sweets, indian sweets, cold dessert, gain weight, target weight, festival food, delicacies, Pakistani food, grocery, bread Pudding

साहित्य:
३ ब्रेडचे स्लाईस
३ कप दूध (होल मिल्क)
१/२ कप कंडेन्स मिल्क (sweetened)dessert dishes, gourmet dessert, quick and easy dessert, party sweets, dessert ideas
२ टेस्पून साखर
१ टेस्पून पिस्त्याचे काप (अनसॉल्टेड आणि रोस्टेड)
१ टिस्पून वेलचीपूड
चिमूटभर केशर
तळण्यासाठी तूप

कृती:
१) दूध मध्यम आचेवर उकळत ठेवावे. आटवून दिड ते पाऊणेदोन कप करावे. कंडेन्स मिल्क घालून ५ मिनीटे उकळवावे. २ टेस्पून साखर घालावी. गरजेनुसार साखर कमी किंवा जास्त करावी. यात वेलचीपूड आणि केशर घालावे. पिस्त्याचे काप घालावेत, थोडे सजावटीसाठी ठेवावेत.
२) ब्रेड स्लाईसच्या कडा काढून टाकाव्यात. ब्रेडचे त्रिकोणी किंवा आवडत्या आकारात तुकडे करावे. तुपात तळून किंवा मंद आचेवर शालो फ्राय करून घ्यावेत. ब्रेडचे स्लाईस कुरकूरीत आणि बाहेरून थोडे ब्राउन करून घ्यावेत.
३) सर्व्हींग प्लेटमध्ये तळलेले ब्रेडचे स्लाईस ठेवावेत त्यावर आटवलेले दूध घालून आणि फ्रिजमध्ये थंड करत ठेवावेत. थंड झाल्यावर दुध छान घट्ट होते. वरून पिस्त्याचे काप घालून सजवावे.

टीप:
१) ब्रेडचे स्लाईस तेलात शालोफ्राय केलेले चालतात. तळून झाल्यावर यातील सर्व अधिकचे तेल निघून गेल पाहिजे नाहीतर खाताना तेलाची चव लागते. त्यासाठी तळल्यावर ब्रेडचे स्लाईस काहीवेळ पेपर टॉवेलवर वर काढून ठेवावेत.

Labels:
Shahi Tukada, recipe for Shahi Tukda, Indian Shahi Tukda, Indian Sweets recipe, Dessert

Tuesday, July 29, 2008

बदाम कुल्फी - Badam Kulfi

Badam Mava Kulfi (English Version)

वाढणी: २-३ जणांसाठी

Kulfi recipe, Icecream recipe, Badam Kulfi, Restaurant style Kulfi recipe, frozen dessert with less fuss, easy dessert recipe, indian grocery, try almond topped indian dessert
साहित्य:
३ कप दुध (होल मिल्क)
१/४ कप ताजा मावा (साधारण ४ टेस्पून)
१/२ ते पाउण कप साखर
१/३ कप बदामाचे काप
२ टिस्पून कॉर्न फ्लोअर
१/२ टिस्पून वेलची पूड
चिमूटभर केशर

indian food recipe, indian dessert recipe, kulfi, almond kulfi, malpova, mango icecream, jalebi recipe, kheer
कृती:
१) बदामाची पूड करून घ्यावी. दूध गरम करून आटवावे. आटवतानाच ३-४ मिनीटांनी साखर घालावी.
२) साधारण अर्धे होईल इतपत आटवावे. आटवताना सारखे ढवळत राहावे ज्यामुळे दूध भांड्याच्या तळाला लागणार नाही.
३) मावा हाताने मोकळा करून घ्यावा. त्यातील गुठळ्या हाताने मोडाव्यात.
४) दोन टेस्पून गार दूधात कॉर्न फ्लोअर मिक्स करावे, हे दूध आटवलेल्या दूधात घालावे व ढवळावे. हळूहळू दुध घट्टसर होईल.
५) दुध घट्टसर झाले कि वेलची पूड, केशर, मावा दुधात घालावा. थोडे गरम करावे. सर्व निट मिक्स करावे. मिश्रण थोडे कोमट झाले कि कुल्फीपात्रात किंवा हिंडालियमच्या पात्रात मिश्रण ओतून फ्रिजरमध्ये सेट करण्यास ठेवावे.
६) कुल्फी घट्ट झाली सर्व्ह करावे.

Labels:
kulfi recipe, matka kulfi, badam Malai Kulfi, Mava Kulfi, Indian Icecream

Thursday, July 3, 2008

गाजर हलवा - Gajar ka Halwa

Gajar Halwa - Carrot Pudding (English version)

Gajar halwa, gajaracha halava, gajar halva, Carrot Pudding, carrot indian pudding, indian dessert recipe, indian grocery

साहित्य:
३ कप गाजर किस
१ कप दूध
१/२ कप साखर
२ टेस्पून साजूक तूप
१/२ टिस्पून वेलचीपूड
बदामाचे काप

gajar halwa, gajaracha halva, halwa

कृती:
१) बदाम ३-४ तास पाण्यात भिजवून त्याची साले काढावीत. आणि त्याचे पातळ काप काढावेत. गाजर सोलून किसून घ्यावीत. पातेल्यात २ चमचे तूप गरम करावे. ३ कप गाजराचा किस त्यात घालून २-३ मिनीटे परतावे.
२) २-३ मिनीटांनंतर दूध घालावे. ढवळून मध्यम आचेवर पातेल्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे. साधारण १० मिनीटे शिजू द्यावे.
३) दुध बर्‍यापैकी आटले कि त्यात साखर घालावी व ढवळावे. गॅस मोठा ठेवावा आणि आटू द्यावे. वेलचीपूड घालावी. व्यवस्थित आटले कि गॅस बंद करावा.
गाजर हलवा गरम तसेच गारसुद्धा छान लागतो. वेनिला आईसक्रिम आणि गाजर हलवा यांचे कॉम्बिनेशनसुद्धा मस्त लागते.

टीप:
१) जर घरात बदाम उपलब्ध नसतील तर ७-८ शेंगदाणे भिजवून त्याची साले काढून काप करावेत.

Labels:
gajar Halwa, Gajar Halva, Gajaracha Halwa, Carrot Pudding, Corrot Halwa, Carrot Sweet dish, Indian Dessert

Thursday, May 15, 2008

वरी तांदूळाची खांडवी - Vari Tandul Khandavi

Upavasachi Khandvi (English Version)

Chinese, Fasting Food, Indian Food, Indian Cuisine, Religious Food, Rice Recipe, Small grain Rice Recipe, Healthy Food, Weight Loss
साहित्य:
१/२ कप वरी तांदूळ
१/२ कप किसलेला गूळ
दिड कप पाणी
२ चमचे तूप
१ लहान चमचा वेलची पूड
१/४ कप ओले खोबरे

कृती:
१) वरी तांदूळ पाण्याखाली धुवून निथळत ठेवावा. सर्व पाणी निघून जावू द्यावे.
२) पातेल्यात २ चमचे तूप गरम करून त्यावर हे तांदूळ थोडे भाजून घ्यावे. दुसर्‍या पातेल्या दिड कप पाणी उकळत ठेवावे.
३) भाजलेल्या तांदूळात उकळलेले पाणी घालून ढवळावे १-२ वेळा वाफ काढावी. कधी कधी तांदूळ सर्व पाणी शोषून कोरडे होतात त्यामुळे थोडे पाणी वाढवावे लागते. त्याची काळजी घ्यावी. वरी तांदूळ निट शिजले आहेत कि नाही हे चव घेऊन बघावे.
४) तांदूळात पाणी शोषले गेले कि गूळ, नारळ आणि वेलचीपूड घालावी व ढवळावे. १-२ वेळा वाफ काढावी. तूप लावलेली थाळी तयार ठेवावी. मिश्रण दाटसर झाले कि थाळीत घालून थापावे व १ सेंमी चा थर करावा.
वरून खवलेला नारळ घालावा व वड्या पाडाव्यात.

Labels:
Khandavi Recipe, Sweet Khandavi, Vari Tandul Khandavi, Bhagar khandavi, vari tandool khandavi

Friday, January 25, 2008

रव्याचा केक - Ravyacha Cake

Ravyacha Cake (English Version)

rava cake recipe, ravyacha cake, rava recipe, farina recipe, semolina cake recipe
rava cake recipe, ravyacha cake, rava recipe, farina recipe, semolina cake recipe
साहित्य:
१ वाटी रवा
१ वाटी दही
१ वाटी दूध (दूध गरम नसावे)
१ वाटी साखर
१-२ चमचे तूप
१ चिमूटभर बेकिंग सोडा
वेलचीपूड / दालचिनी पावडर
सुकामेवा
बेक करण्यासाठी पसरट ओव्हन सेफ भांडे (eg. Pie Bakeware)

कृती:
१) रवा, दही, दूध, साखर, तूप एकत्र करून २०-२२ मिनीटे फेटावे. साखर व्यवस्थित विरघळली पाहिजे. हे सर्व मिश्रण २-३ तास झाकून ठेवून द्यावे.
२) २-३ तासांनी ओव्हन ३७५ F (१९० C) प्रिहीट करायला लावावा. मधल्यावेळात ओव्हनसेफ भांड्याला तूपाचा हात लावून घ्यावा. नंतर १ चमचा पाण्यात चिमटीभर बेकिंग सोडा घालावा, मिक्स करून फेटलेल्या मिश्रणात घालावा.आवडीनुसार वेलचीपूड किंवा दालचिनी पावडर घालावी. मिश्रण १ मिनीट ढवळावे.
३) मिश्रण ओव्हनसेफ भांड्यात ओतावे. वरून काजू बदाम पिस्त्याचे तुकडे पसरावे. आणि ३७५ F ( १९० C) वर १८ ते २० मिनीटे बेक करावे. बेक करताना १०-१२ मिनीटानंतर मधेमधे ओव्हनमधील लाईट लावून केक चेक करावा.
४) केकच्या कडा ब्राऊन रंगाच्या होतात तसेच केकचा छान गंध सुटला कि केक झाला असे समजावे. ओव्हन बंद करून १-२ मिनीटांनी केक बाहेर काढावा. गरम गरम खायला छान लागतोच तसेच २ दिवस टिकतोसुद्धा !

टीप:
१) जर केकच्या आतसुद्धा सुकामेवा आवडत असेल तर बेक करायच्या आधी काजू बदामाचे तुकडे घालून ढवळावे मग मिश्रण बेकिंगच्या भांड्यात ओतून बेक करावे.

Labels:
Semolina cake, eggless cake, Rava cake, Farina Cake, Semolina dessert recipe

Monday, November 26, 2007

गोडाचा शिरा - Godacha Shira

Godacha Shira

godacha shira, godacha sanja, rava recipe, semolina recipe, dessert recipe, indian dessert recipe, healthy food, diet food, food, target
साहित्य:
१ वाटी रवा
१ वाटी साखर
१ वाटी दूध
१ वाटी पाणी
३-४ चमचे तूप
१ लहान चमचा वेलचीपूड
काजू-बदामचे पातळ काप

कृती:
१) कढईत तूप गरम करावे. त्यात रवा मध्यम आचेवर गुलाबी रंगाचा होईस्तोवर भाजून घ्यावा.
२) रवा भाजत असतानाच दुसर्या गॅसवर दूध आणि पाणी एकत्र करून गरम करावे. रवा व्यवस्थित भाजला कि त्यात गरम केलेले दूध आणि पाणी घालावे. गुठळ्या न होवू देता ढवळावे. ढवळून ३-४ मिनीटे वाफ काढावी.
३) रवा चांगला शिजला कि त्यात साखर घालावी, वेलचीपूड घालावी, व्यवस्थित ढवळावे. मध्यम आचेवर वाफ काढावी. काजू-बदामाचे काप घालावे.

टीप:
१) साखरेचे प्रमाण आपल्या गरजेनुसार कमी किंवा जास्त घ्यावे.
२) शिर्‍यामध्ये आवडीप्रमाणे सुकामेवा घालता येतो. त्यामुळे शिरा अधिक रूचकर लागते. तसेच तुपाचे प्रमाण थोडे जास्त घेतल्यास शिरा अधिक चविष्ठ लागतो.

Labels:
Godacha Shira, Suji halwa, Sujika Halwa recipe, Recipe for Semolina Pudding, Sira recipe, Maharashtrian Recipe, Ravyacha god shira

Wednesday, November 7, 2007

काकडीचा केक - Kakadicha Cake

Kakadicha Cake

हा काकडीचा केक बराचसा तवसळी नावाच्या कोकणी पदार्थासारखा आहे. सणासुदीला गोडधोड म्हणून काकडीचा केक नक्की करून पाहा.

cucumber cake, kakadi cake, kakadi recipe

साहित्य:
२ वाट्या काकडीचा किस
१ वाटी रवा
१ वाटी गूळ
४ टेस्पून बटर
१ चमचा तूप
१ लहान चमचा वेलची पूड
बदामाचे काप

कृती:
१) काकडी सोलून किसून घ्यावी. दोन्ही हाताने दाबून त्यातले पाणी काढून टाकावे.
२) रवा तूपावर भाजून घ्यावा. मध्यम आचेवर कढईत बटर घालावे. त्यात रवा, गूळ आणि काकडीचा किस घालून ढवळत राहावे. ५-१० मिनीटांत रवा, गूळ, काकडीचा किस यांचे मिश्रण मिळून येते. त्यात वेलची पूड घालून ढवळावे.
३) ओव्हन ३७५ F ला प्रिहिट करावे. बेकिंग ट्रे मध्ये तूपाचा हात लावावा. त्यात तयार मिश्रणाचा १ इंचाचा थर करावा. त्यावर बदामाचे काप घालावे. १५-१८ मिनीटे बेक करावे. केकच्या कडा थोड्या गोल्डन ब्राऊन झाल्या कि केक तयार झाला असे समजावे.
४) केक ट्रेमधून काढावा सुरीने चौकोनी वड्या कराव्यात.

टीप:
१) हा केक गरम खायला जास्त छान लागतो. त्यामुळे जर थोडा उरलाच तर खाताना मायक्रोवेवमध्ये गरम करून खावा.
२) केक बेक केल्यावर थोडे नारळाचे दूध घालावे छान टेस्ट येते.

Labels:
Eggless Cake, Cucumber Cake, Homemade Cake, Cake recipe, Cucumber Semolina Cake, Semolina Cake

Thursday, October 4, 2007

फ्राईड नूडल्स विथ आईसक्रिम - Fried Noodles with Icecream

Fried Noodles with Icecream (English Version)

icecream dessert, sweet treat, noodles with icecream, noodles recipe, noodles dessert recipe, dessert recipe

साहित्य:
१/२ कप फ्लॅट नूडल्स
३-४ स्कूप वेनिला आईसक्रिम
२ टेस्पून बदाम, पिस्ता यांचे पातळ तुकडे
१ टिस्पून तिळ (ऑप्शनल)
तळण्यासाठी तेल
स्विट सॉससाठी:
२ टेस्पून मध
३ टिस्पून साखर
१/४ कप पाणी

कृती:
१) सर्वात आधी नूडल्स पाण्यात शिजवून घ्याव्यात. त्या आधी चाळणीत काढून त्यातील पाणी काढून घ्यावे. नूडल्स टिपकागदावर काढून ठेवाव्यात.
२) नूडल्स थंड झाल्यावर त्या तेलात गोल्डन ब्राऊन तळून घ्याव्यात.
३) नॉनस्टिक फ्राईंग पॅनमध्ये १/४ कप पाणी घ्यावे, त्यात ३ टिस्पून साखर घालून पाक करून घ्यावा गॅस बंद करावा, फ्राईंग पॅनमधून पाक दुसर्‍या भांड्यात काढून त्यात मध घालावे. घट्टसर सॉस बनवून घ्यावा.
४) फोटोत दाखवल्याप्रमाणे प्लेटमध्ये प्रथम नूडल्स पसरवावेत, त्यावर तयार केलेला सॉस घालावा. लगेच त्यावर आईसक्रिमचे स्कूप घालावेत. सर्व्ह करताना वरती बदाम पिस्ताचे काप घालावेत.


Labels:
Dessert Recipe, Ice Cream, Noodles with Icecream, Cold Dessert Recipe, quick and easy dessert recipe

Thursday, September 13, 2007

डाळीचे लाडू - Chanadal Ladu

Chana Dal Ladu in English

Indian sweets, chana dal laddu, lentil sweets
साहित्य:
१ वाटी चणा डाळ
१ ते सव्वा वाटी साखर
पाउण वाटी खवलेला ओला नारळ
६-७ चमचे तूप
अर्धा वाटी दूध
काजू, बदाम, पिस्ता यांचे काप, बेदाणे
१ चमचा वेलची पूड, केशर

कृती:

१) चणा डाळ ४-५ तास भिजवून ठेवावी. मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यावी.
२) कढईत तूप गरम करून वाटलेली डाळ गोल्डन ब्राउन होईस्तोवर परतून घ्यावी.
३) डाळ परतल्यावर त्यात नारळ आणि दूध घालून परतावे.
४) दुसर्या पातेल्यात साखर घालावी. ३-४ चमचे पाणी घालून दोन तारी पाक करून घ्यावा. त्यात सर्व ड्राय फ्रुट्स घालावी. वेलची पावडर, केशर घालावे.
५) परतलेली डाळ पाकात घालावी आणि ढवळावे.
६) दर १५-२० मिनीटांनी ढवळावे.
७) ५-६ तासांनी लाडू वळावे.

टीप : १) लाडू १-२ दिवसांनंतर चवीला चांगले लागतात. कारण पाक लाडवांमध्ये चांगला मुरतो.

Labels:
Chana Dal Ladu, Indian Sweet dessert, Chana Dal laddu