Showing posts with label Upvaas. Show all posts
Showing posts with label Upvaas. Show all posts

Thursday, December 18, 2008

बटाटापूरी - Batata Puri

Batata Puri in English

In India, Sabudana or Sago has a unique importance during Fasting. Khichdi, Vada, Kheer (Pudding) , Thalipith (Pancakes) made of Sabudana taste just amazing. Sabudana Vada is favorite in India, especially in Maharashtra because of its delicious taste and crispy texture.
Batata Puri (Potato Puri) is a version of Sabudana Vada. But Batata Puris are more crispy than Sabudana Vada. This recipe would be a nice alternative who fasts once in a week and searching something new to try other than routine fasting food.

उपवासाला आपण घरी साबुदाणे वडे बर्‍याचदा करतो, बटाटापुरी हि साबुदाणा वड्याच्या साहित्यापासूनच बनवली जाते पण पदार्थांचे प्रमाण आणि पद्धत थोडी निराळी असते. तसेच चवीलाही थोडी वेगळी आणि खुसखूशीत लागते. नक्की करून पाहा !!

वाढणी: मध्यम १२ पुर्‍या

Potato Recipe, Indian Food, Fasting vegetarian recipe, Upaas, Marathi Recipeसाहित्य:
२ मोठे बटाटे, उकडलेले
१/२ कप साबुदाणा
७ ते ८ मिरच्या
१/४ कप कोथिंबीर, चिरून
१/२ टिस्पून जिरे
३ टेस्पून शेंगदाणा कूट
१ टिस्पून जिरेपूड
१ ते २ टेस्पून शिंगाडा पिठ (टीप)
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) १/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे.
२) मिक्सरमध्ये ७-८ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मिठ घालून बारीक करावे. पाणी घालू नये. जर मिक्सर नसेल तर मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
३) शिजवलेले बटाटे किसून घ्यावे. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवावा. चव पाहुन, लागल्यास मिठ घालावे.
४) साधारण दिड इंचाचे गोळे करावे. तेल तापत ठेवावे. तेल तापले कि आच मिडीयम हायवर ठेवावी. एक प्लास्टिकचा जाड तुकडा घ्यावा. त्याला तेलाचा हात लावावा. प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापावा आणि मध्यभागी बोटाने भोक पाडावे. पातळ थापू नये, नाहीतर तेलात टाकल्यावर पुरी तुटते आणि विरघळते. (टीप)
५) पुरी तेलात टाकल्यावर ती झार्‍याने अजिबात पलटू नये. पुरी पलटली ती हमखास तुटते. पुरी जरा तळली गेल्यावर थोडा firmness येतो. त्यावेळी झार्‍याने अलगद तेलात बुडवावी म्हणजे वरच्या बाजूलाही छान ब्राऊन रंग येईल.
तळलेल्या पुर्‍या चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.
टीप:
१) पुरी तेलात टाकल्यावर तुटत असेल तर मळलेल्या पिठात एखादा चमचा शिंगाडा पिठ वाढवावे.
२) शिंगाडा पिठ घरात available नसेल आणि उपवासही नसेल तर शिंगाड्याऐवजी तांदूळाचे पिठ वापरले तरी चालते.
३) साबुदाणा खुप चिकट भिजवू नये, पुर्‍या तळताना त्या तेलात विरघळतात.
4) तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरच्यांचे प्रमाण कमीजास्त करावे.

Tuesday, December 2, 2008

रताळे किस - Ratale Kis

Ratale Kis in English

वाढणी: २-३ जणांसाठी

ratalyacha kis, ratale kis, fasting food, fasting recipe, high carb food, low calorie food
साहित्य:
साडेचार कप रताळ्याचा किस (३ मोठी रताळी)
१ टेस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
४ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून किंवा २-३ सुक्या लाल मिरच्या
१/४ कप कोथिंबीर
१/२ टिस्पून जिरेपूड
3 टेस्पून शेंगदाण्याचा कूट
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून साखर
२ टेस्पून कोथिंबीर
१ टेस्पून लिंबाचा रस
२ टेस्पून ओल्या नारळाचा चव

कृती:
१) रताळी स्वच्छ धुवून घ्यावीत. मी शक्यतो साले काढत नाही फक्त रताळ्यावर काळपट डाग असतील तेवढे सुरीने काढून टाकते. पण जर वाटले तर साल काढून मग किसावे. रताळी किसताना जवळ एक गार पाणी भरलेले पातेले तयार ठेवावे. अर्धे रताळे किसले कि या पाण्यात टाकावे म्हणजे किसलेले रताळे काळे पडणार नाही.
२) कढईत तूप गरम करावे त्यात जिरे, मिरच्या घालून फोडणी करावी. तसेच १/४ कप कोथिंबीर फोडणीस घालावी. लगेच पाण्यात घातलेले रताळे किस दोन्ही हातांनी पिळून कढईत टाकावे. जिरेपूड घालून निट परतावे. आधी मिठ घालू नये कारण रताळ्याचा किस शिजत आला कि बराच आळतो आणि मिठाचा अंदाज चुकू शकतो.
३) मध्यम आचेवर रताळ्याचा किस झाकण न ठेवता शिजू द्यावा. कालथ्याने निट ढवळावे. ६-७ मिनीटांत रताळ्याचा किस आळतो तसेच अर्धवट शिजतो. त्यात थोडे मिठ, साखर, शेंगदाण्याचा कूट घालून परतावे. थोडावेळ झाकण ठेवून शिजू द्यावे.
रताळ्याचा किस तयार झाला कि त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालून दह्याबरोबर सर्व्ह करावे.

Labels:
Ratalyacha Kis, Potato hash, Indian sweet Potato hash, ratale kees

Tuesday, November 4, 2008

भोपळा भरीत - Lal Bhoplyache Bharit

Bhoplyache Bharit in English

वाढणी: २ ते ३ जणांसाठी

Healthy Raita recipe, Pumpkin Raita, Bhopla Bharit, Raita Recipe, Yogurt Raita recipe, Koshimbir
साहित्य:
२ कप लाल भोपळ्याच्या मध्यम फोडी (साल काढून)
१/२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१/२ ते ३/४ कप दही
चवीनुसार मिठ, साखर

कृती:
१) भोपळ्याच्या फोडी कूकरमध्ये उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर चमच्याने मॅश करून घ्याव्यात. खुप गुठळ्या राहू देवू नये.
२) लहान कढल्यात तूप गरम करावे. तूप गरम झाले कि जिरे आणि मिरच्या घालून फोडणी करून उकडलेल्या भोपळ्यात घालावी. चवीनुसार मिठ आणि किंचीत साखर घालावी. दही आणि कोथिंबीर घालून निट मिक्स करावे.

टीप:
१) हे भरीत उपवासालाही चालते. उपवासाव्यतिरिक्त दिवशी फोडणीत हळद, हिंग, मोहोरी घातली तरी चालते.
२) शेंगदाण्याचा कूट घातल्यास चव छान येते.

Labels:
Bhoplyache Bharit, Bhopala Bharit, Pumpkin Raita, Kaddu Raita

Thursday, September 18, 2008

शिंगाडा पिठाचे लाडू - Shingada Pithache Ladu

Shingada Flour Laddoo in English

हे लाडू करायला सोप्पे आणि चविष्ट असतातच तसेच उपवासालाही चालतात.

वाढणी : ५ ते ६ लाडू

shingada recipe, fasting recipe, laddu recipe, ladu recipe, ladoo recipe, maharashtrian laddu recipe, upvas recipe
साहित्य:
१/४ कप घट्ट तूप (पातळ असेल तर १/४ कपपेक्षा जास्त आणि १/२ कपपेक्षा थोडे कमी)
१/२ कप शिंगाडा पिठ
१/२ कप साखर
१/२ टिस्पून वेलचीपूड
१ टेस्पून खारीक पूड (ऐच्छिक)
१ टेस्पून सुकं भाजलेले खोबरे (ऐच्छिक)

कृती:
१) कढईत तूप गरम करून त्यात शिंगाडा पिठ खमंग भाजून घ्यावे. शेवटी सुके खोबरे आणि खारीकपूड घालून एखाद मिनीट परतावे.
२) भाजलेले पिठ गरम असतानाच त्यात साखर, वेलचीपूड घालून लाडू वळावेत.

Label:
laadu recipe, Laddu recipe, Shingada Pithache ladu, Upvas recipe, Fasting recipe

Friday, August 1, 2008

शेंगदाण्याची उसळ - Shengadanyachi Usal

Peanuts Curry (English Version)

वाढणी : २ जणांसाठी
हि शेंगदाणा उसळ उपवासाच्या फराळी मिसळीमध्ये उत्तम लागते. फराळी मिसळीच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा.

peanut curry, peanut sauce, Indian Peanuts curry, Curry recipe, vegetarian recipeसाहित्य:
३/४ कप शेंगदाणे
१ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१/२ कप पाणी
२ आमसुलं
२-३ हिरव्या मिरच्या
१ टिस्पून गूळ
चवीपुरते मिठ

कृती:
१) शेंगदाणे ५-६ तास भिजवून ठेवावे. नंतर प्रेशर कूकरमध्ये शिजवून घ्यावे. शिजवलेल्या शेंगदाण्याची उसळ करून घ्यावी.
२) उसळीसाठी आधी ४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट आणि १/२ कप पाणी एकत्र मिक्सरमध्ये फिरवावे, यामुळे हे मिश्रण दाटसर होईल आणि उसळीला थोडा दाटपणा येईल.
३) नंतर पातेल्यात तूप गरम करून त्यात जिरे मिरचीची फोडणी करावी. त्यात कूटाचे मिश्रण घालावे. आवडीप्रमाणे थोडे पाणी वाढवून पातळ करून घ्यावे. यात आमसुलं, मिठ आणि गूळ घालून एक उकळी येऊ द्यावी. नंतर शिजलेले शेंगदाणे घालून मध्यम आचेवर उकळी काढावी. या उसळीला थोडा रस ठेवावा.

टीप:
१) जर तुम्ही नुसती उसळ खाणार असाल तर फोडणीमध्ये उकडलेला बटाटा किंव रताळे घातल्यास अधिक चविष्ट लागेल.

Labels:
peanut curry, shengdana usal, upavas usal

Thursday, July 31, 2008

खमंग काकडी - Khamang Kakdi

Khamang Kakadi (English version)

वाढणी : ३-४ जणांसाठी

cucumber salad, indian salad, indian raita, kakadichi koshimbir, koshimbir, kachumbar, khamang kakdi, Low calorie salad recipe

साहित्य:
२ कप चोचवलेली काकडी (कृती - क्र. १)
३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ टिस्पून लिंबाचा रस
१/२ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
३ ते ४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ

कृती:
१) काकडीची शेवटची दोन टोके कापावीत, आधी काकडी कडू नाहीये ना! हे चव घेवून पाहावे. नंतर काकडी सोलून चोचवून घ्यावी. चोचवलेल्या काकडीला थोडे मिठ चोळून एका वाडग्यात ठेवावे. मिठामुळे काकडीला पाणी सुटेल. हे पाणी काढून टाकावे तसेच चोचवलेली काकडी दोन्ही हाताने पिळून त्यातील अधिकचे पाणी काढून टाकावे. अशी पाणी काढून पिळलेली टाकलेली काकडी आपल्याला २ कप लागेल.
२) ही काकडी वाडग्यात घेऊन त्यात शेंगदाण्याचा कूट, चिरलेली कोथिंबीर, साखर घालून मिक्स करावे.
३) कढल्यात तूप गरम करून त्यात जिरे आणि चिरलेल्या मिरच्यांतील थोडी मिरची घालून फोडणी करावी व काकडीत घालावी.
४) उरलेली मिरची एका वाटीत घ्यावी. त्यात अगदी किंचीत मिठ घालावे (कारण आधीच काकडीला मिठ लावले आहे). चमच्याने किंवा हाताने चुरडावी आणि काकडीला लावावी. लिंबाचा रस घालून मिक्स करावे.
हि चविष्ट अशी खमंग काकडी उपवासाला किंवा इतर दिवशीही कोशिंबीर म्हणून जेवणात समाविष्ट करू शकतो.

Labels:
Cucumber Salad, kakadi Koshimbir recipe, Cucumbar Raita, Indian cucumber Raita

Wednesday, July 30, 2008

उपासाची बटाटा भाजी - Batata Bhaji

Upvasachi Batata Bhaji in English

वाढणी : २ ते ३ जणांसाठी

potato curry, Maharashtra curry recipe, Indian curry recipe, suki bhaji, grocery, Idaho potato, quick n easy
साहित्य:
२ कप शिजलेल्या बटाट्याच्या फोडी
१ टिस्पून साजूक तूप
१/२ टिस्पून जिरे
३-४ हिरव्या मिरच्या
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून लिंबाचा रस
१/२ ते १ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ

कृती:
१) बटाटे शिजवून घ्यावेत. बटाटे सोलून त्याच्या मध्यम फोडी कराव्यात.
२) कढईत १ टिस्पून तूप गरम करावे. त्यात जिरे आणि चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. यात बटाट्याच्या फोडी घालून मध्यम आचेवर परतावे. चवीपरते मिठ आणि साखर घालावी, दाण्याचा कूट घालावा. झाकण ठेवून वाफ काढावी. २-३ मिनीटांनंतर त्यात लिंबू रस घालून मिक्स करावे.

टीप:
१) आवडीनुसार ताजा ओला नारळही घालू शकतो.

Labels:
Maharashtrian Recipe, upvas recipe, fasting recipe, batata bhaji, Potato Bhaji, Potato Sabji

Tuesday, July 15, 2008

फराळी मिसळ - Farali Misal

Farali Misal (English Version) (स्टेप बाय स्टेप इमेजेससाठी इथे क्लिक करा)

वाढणी : ३-४ प्लेट

misal recipe, indian food, marathi food, diet food, healthy diet food, farali misal recipe

साहित्य:
::::शेंगदाण्याच्या उसळीसाठी::::
३/४ कप शेंगदाणे
१ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१/२ कप पाणी
२ आमसुलं
२-३ हिरव्या मिरच्या
१ टिस्पून गूळ
चवीपुरते मिठ
::::बटाट्याची भाजी::::
२ कप शिजलेल्या बटाट्याच्या फोडी
१ टिस्पून साजूक तूप
१/२ टिस्पून जिरे
३-४ हिरव्या मिरच्या
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून लिंबाचा रस
१/२ ते १ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ
::::साबुदाण्याची खिचडी::::
३/४ कप साबुदाणा
२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
३-४ हिरव्या मिरच्या
२ टेस्पून ओला नारळ
दिड ते २ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
चवीपुरती साखर आणि मिठ
१ टिस्पून लिंबाचा रस
इतर साहित्य:
बटाटा सळी
चिरलेली कोथिंबीर
मिरचीचा ठेचा (मिरची + मिठ + थोडीशी जिरेपूड)
दही

Indian Food, Farali Misal, fasting food, diet food, healthy recipes, weight gain recipes, restaurant food

कृती:
१) सर्वप्रथम शेंगदाणे ७-८ तास पाण्यात भिजत घालावेत. मिठ घालून कूकरमध्ये शिजवावेत.
२) साबुदाणे ४-५ तास भिजवावेत. उरलेले पाणी काढून टाकावे व साबुदाणे झाकून ठेवावे.

३) बटाट्याची भाजी - इथे क्लिक करा

४) शेंगदाण्याची उसळ - इथे क्लिक करा


बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची उसळ आधी करून ठेवली तरी चालते, पण साबुदाणा खिचडी आयत्यावेळी करावी कारण साबुदाण्याची खिचडी थंड झाली कि तिची चव उतरते.

५) साबुदाणा खिचडी -
भिजवलेल्या साबुदाण्याला साखर आणि मिठ अगोदरच लावून घ्यावे. कढईत तूप गरम करून त्यात जिरे आणि चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. साबुदाणे घालून परतावे. नंतर नारळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून परतावे. १ वाफ काढावी. लिंबाचा रस घालून ढवळावे.

मिसळ करताना सर्व पदार्थ गरम करावेत.
प्लेट किंवा बोलमध्ये आधी १ डाव बटाट्याची भाजी, खिचडी आणि मग दाण्याची उसळ अशा क्रमाने वाढावे. लिंबू पिळावे. त्यावर बटाटा सळी घालावी कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. तसेच सर्व्ह करताना बाजूला दही वाढावे.
जर तिखटपणा हवा असेल तर मिरचीचा ठेचा घालावा.

टीप:
१) जर बटाटा सळी नसेल किंवा त्याऐवजी दुसरे काही वापरायचे असेल तर घरगुती बटाट्याचा चिवडा वापरावा. तसेच बटाटा चिवडा विकतही आणू शकतो.
२) या मिसळीत बरेच वेरिएशन्स करता येतात. जसे बटाट्याच्या भाजीसारखीच सुरण-भोपळ्याची भाजी करता येते. तसेच खमंग काकडीही बनवून मिसळीत घालू शकतो.

Labels:
Maharashtrian Recipe, marathi recipe, fasting food, upvas recipe, Potato recipe, Indian food recipe

Thursday, June 26, 2008

मसाला दुध - Masala Dudh

Masala Dudh in English

Masala dudh, Masala Doodh recipe, Marathi Recipe Masala Dudh, India Tradition, Kojagiri pournima, Desi Recipe, Desi Groceryसाहित्य:
२ कप दुध
३ टेस्पून साखर
मसाल्यासाठी साहित्य:
१/४ कप बदामाची पूड
१ टेस्पून पिस्ता पूड
१/२ टिस्पून वेलचीपूड
चिमूटभर जायफळ पूड
१ चिमूटभर केशर

कृती:
१) मसाला बनवताना न खारवलेले पिस्ता आणि बदाम वापरावेत. त्याची पूड करावी. बदाम पिस्ता पूड, वेलची आणि जायफळ पूड आणि केशर एकत्र मिक्सरवर एकत्र करून घ्यावेत.
२) २ कप दूध गरम करावे. त्यात ३ टेस्पून किंवा आवडीनुसार साखर घालावी. बनवलेला २-३ टिस्पून मसाला घालून ढवळावे. थोडे उकळू द्यावे व गरम गरम सर्व्ह करावे.

टीप:
१) मसाला बनवताना इतरही सुकामेवा आवडीनुसार वापरू शकतो.
२) यामध्ये अख्ख्या चारोळ्याही घालू शकतो.
३) मसाल्यात जायफळ प्रमाणातच वापरावे. कारण मसाला दुधाला जायफळाचा जास्त फ्लेवर आला तर ते उग्र लागते.

Thursday, May 15, 2008

वरी तांदूळाची खांडवी - Vari Tandul Khandavi

Upavasachi Khandvi (English Version)

Chinese, Fasting Food, Indian Food, Indian Cuisine, Religious Food, Rice Recipe, Small grain Rice Recipe, Healthy Food, Weight Loss
साहित्य:
१/२ कप वरी तांदूळ
१/२ कप किसलेला गूळ
दिड कप पाणी
२ चमचे तूप
१ लहान चमचा वेलची पूड
१/४ कप ओले खोबरे

कृती:
१) वरी तांदूळ पाण्याखाली धुवून निथळत ठेवावा. सर्व पाणी निघून जावू द्यावे.
२) पातेल्यात २ चमचे तूप गरम करून त्यावर हे तांदूळ थोडे भाजून घ्यावे. दुसर्‍या पातेल्या दिड कप पाणी उकळत ठेवावे.
३) भाजलेल्या तांदूळात उकळलेले पाणी घालून ढवळावे १-२ वेळा वाफ काढावी. कधी कधी तांदूळ सर्व पाणी शोषून कोरडे होतात त्यामुळे थोडे पाणी वाढवावे लागते. त्याची काळजी घ्यावी. वरी तांदूळ निट शिजले आहेत कि नाही हे चव घेऊन बघावे.
४) तांदूळात पाणी शोषले गेले कि गूळ, नारळ आणि वेलचीपूड घालावी व ढवळावे. १-२ वेळा वाफ काढावी. तूप लावलेली थाळी तयार ठेवावी. मिश्रण दाटसर झाले कि थाळीत घालून थापावे व १ सेंमी चा थर करावा.
वरून खवलेला नारळ घालावा व वड्या पाडाव्यात.

Labels:
Khandavi Recipe, Sweet Khandavi, Vari Tandul Khandavi, Bhagar khandavi, vari tandool khandavi

Wednesday, April 30, 2008

उपवासाचे घावन - Upavasache Ghavan

Upavasache Ghavan (English Version)

healthy recipes, dinner recipe, healthy food recipes, easy recipes, fast food, low fat recipes, diet food, snack recipes, breakfast recipes, heart healthy food, reduce body fat, healthy recipes for kids, food list, whole foods diet, easy low fat recipes, salad recipes, how to reduce fat, health food center, low fat fast food, fasting, fast food, sago, vari tandul

साहित्य:
१ वाटी वरी तांदूळ
१ वाटी साबुदाणे
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे नारळाचा चव
२ चमचे दाण्याचे कूट
१ चमचा जिरे
चवीपुरते मिठ
साजूक तूप

कृती:
१) साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे.
२) दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे.
३) नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू निट होवू द्यावी.
गरम गरम घावन नारळाच्या चटणी सर्व्ह करावे.

टीप:
१) कधी कधी साबुदाणा चिकट असला तर वाफ काढल्याने घावन गदगदलेले होते आणि घावन कालथ्याने उलथायला सुद्धा त्रास होतो. म्हणून पहिल्या घावनाला वाफ काढून पाहावी. जर घावन चिकट होत असेल तर वाफ न काढता मध्यम आचेवर दोन्ही बाजू निट भाजून घ्याव्यात.
२) घावनात थोडीशी चिरलेली कोथिंबीर सुद्धा छान लागते.
3) मिरची आवडीनुसार कमीजास्त वापरावी.

चकली

Labels:
Fasting Recipes, Sabudana Ghavan, Sago Recipes, Fasting meal, Fasting food. Vari Tandul recipe, sabudana recipe

Monday, March 3, 2008

साबुदाणा चिवडा - Sabudana Chiwada

Sabudana Chiwada (English Version)


chiwada recipe, sabudana recipe, sago recipe, vegetarian recipe, sabudana chiwada recipe, shabudana recipe, chiwda recipe, maharashtrian chiwda recipe

साहित्य:
१ वाटी नायलॉन साबुदाणा
पाउण वाटी शेंगदाणे

पाव वाटी सुके खोबरे (ऑप्शनल)
तळण्यासाठी तेल
१ लहान चमचा जिरेपूड
लाल तिखट
चवीपुरते मीठ
चवीपुरती साखर

कृती:
१) सर्वप्रथम साबुदाणे तळून घ्यावेत. एका पेपर टॉवेलवर काढून मग एखाद्या पसरट भांड्यात काढावे.
२) नंतर शेंगदाणे आणि सुक्या खोबर्याचे पातळ काप तळून घ्यावे. दोन्ही पेपर टॉवेलवर काढून अधिकचे तेल काढून टाकावे.
३) तळलेल्या साबुदाण्याला चवीपुरते मीठ, साखर, लाल तिखट, जिरेपूड लावून घ्यावे. त्यात तळलेले शेंगदाणे, खोबर्याचे काप घालावे. सर्व निट मिक्स करावे.

टीप:
१) लाल तिखटाऐवजी जर हिरवी मिरची घालायची असेल तर २-३ मिरच्या तळून घ्याव्यात व त्या चुरून घालाव्यात.


Labels:
Sabudana chiwada, Sabudana Chiwda, Chiwda recipe, Upvaas recipe

Monday, December 17, 2007

बटाट्याचा किस - Batata kis

Batata kis (English Version)

batatyacha kis, batata kis recipe, batata kees recipe, potato recipe
साहित्य:
२ बटाटे
१ टेस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
२-३ हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट
चवीपुरते मिठ, साखर
कोथिंबीर
लिंबू

कृती:
१) बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्यावे. मध्यम छिद्रे असलेल्या किसणीवर किसून घ्यावेत. किसलेला बटाटा गार पाण्यात घालावा.
२) कढईत १ ते दिड चमचा तूप गरम करावे. १/२ टिस्पून जिरे घालावे. मिरचीचे तुकडे घालावे.
३) किसलेला बटाटा दोन्ही हातांनी पिळून त्यातील पाणी काढून टाकावे आणि कढईत घालावा. निट परतून घ्यावा. मध्यम आचेवर वाफ काढावी. ३-४ मिनीटांनी शेंगदाण्याचा कूट घालावा. मधेमधे कालथ्याने ढवळावे जेणेकरून बटाटा कढईला चिकटणार नाही. बटाटा शिजेस्तोवर वाफ काढावी. मिठ घालावे, थोडी साखर घालावी. पाणी घालू नये नाहीतर बटाट्याचा किस चिकट होतो.
५) कोथिंबीर घालावी, दही किंवा लिंबू बरोबर गरम गरम खावे. जर लिंबाचे गोड लोणचे उपलब्ध असेल तर मस्तच !!

टीप:
१) मुठभर भिजवलेले (२-३ तास) साबुदाणे जर बटाट्याचा किस परतताना टाकले तरीही छान लागतात.

Labels:
Batata Kis, Batatyacha Kis, Upavasache batata kis, Upasache padartha, Potato Recipe, Maharashtrian Fasting Food

Sunday, November 25, 2007

साबुदाणा वडा - Sabudana Vada

Sabudana Vada in English

साधारण १५ मध्यम वडे
वेळ: ३० मिनीटे (साबुदाणा भिजवण्याचा वेळ वगळून)

sabudana vada, upasache padarthसाहित्य:
१ कप साबुदाणे
२ मोठे बटाटे उकडून
५-६ तिखट हिरव्या मिरच्या
१/४ कप चिरलेली कोथिंबीर
१/२ टिस्पून जीरे
१/४ ते १/२ कप शेंगदाण्याचा कूट
१/२ लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
वडे तळण्यासाठी तेल

कृती :
१) साबुदाणे पाण्यात भिजवावे. उरलेले पाणी काढून टाकावे. झाकण ठेवून ४ ते ५ तास भिजत ठेवावेत.
२) शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
३) मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात.
४) शेंगदाण्याचा कूट : शेंगदाणे भाजून त्याची साले काढावीत आणि मिक्सरवर भरडसर बारीक करावेत.
५) भिजवलेले साबुदाणे, बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.
६) भिजवलेल्या मिश्राणाचे छोटे गोळे तयार करावेत. कढईत तेल गरम करावे आणि मीडियम हाय गॅस वर गोल्डन ब्राउन तळावेत.

खवलेला नारळ, मिरची, आणि कोथिम्बीरच्या चटणीबरोबर वडे छान लागतात. चटणीच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा.

Labels:
Sabudana Vada, Sago Vada, sabudana wada

Tuesday, October 16, 2007

साबुदाणा खिचडी - Sabudana Khichdi

Sabudana Khichadi in English

sabudana recipe, sabudana khichadi, fasting, upaas recipe, upavas recipeसाहित्य:
दिड कप साबुदाणा
१/२ कप बटाट्याच्या काच‍र्‍या
१/२ कप शेंगदाण्याचा कूट
४-५ हिरव्या मिरच्या
२ टेस्पून साजूक तूप
१/२ टिस्पून जिरे
चवीपुरते साखर, मीठ
कोथिंबीर
१ लिंबू

Download:
FLVMP43GP


कृती:
१) साबुदाणे पाण्यात भिजवावे...उरलेले पाणी काढून टाकावे. ४-५ तास भिजत ठेवावेत.
२) कढईत २ चमचे तूप गरम करावे. त्यात जीरे आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात बटाट्याच्या काचर्‍य़ा घालून परताव्यात. वाफ काढावी.
३) बटाटा निट शिजला गेला कि त्यात साबुदाणे घालावेत. वाफ काढावी.साबुदाणा शिजला कि शेंगदाण्याचा कूट घालावा. मिक्स करून नारळ, लिंबाचा रस, चवीनुसार साखर मिठ व कोथिंबीर घालावी आणि दह्याबरोबर खावे. खिचडीबरोबर लिंबाचे गोड लोणचेही खुप छान लागते.

Labels:
sabudana Khichadi, Sabudana Recipe, sabudana Khichdi, Sago Khichdi, Fasting Food, Fasting Recipe, Maharashtrian Sabudana recipe

Tuesday, September 25, 2007

साबुदाणा थालिपीठ - Sabudana Thalipith

Sabudana Thalipeeth (English Version)

Sabudana Thalipith, Thalipith Recipe, Upavasache Thalipith, Thaleepith, Sago Recipe, fasting recipe, fast recipe, sago thalipith


साहित्य:
२ वाट्या साबुदाणा
२ मध्यम बटाटे (शिजवलेले)
१/२ वाटी शेंगदाण्यांचा कूट
५-६ हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
१ चमचा लिंबाचा रस
१ चमचा जीरे
१/२ चमचा जीरेपूड
चवीपुरते मिठ
तेल/ तूप
थालिपीठ थापण्यासाठी प्लास्टीकची शिट


कृती:
१) साबुदाणे पाण्यात भिजवावे.उरलेले पाणी काढून टाकावे. ३-४ तास भिजत ठेवावेत.
२) शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
३) मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात.
४) शेंगदाण्याचा कूट : शेंगदाणे भाजून त्याची साले काढावीत आणि मिक्सरवर बारीक करावेत.
५) भिजवलेला साबुदाणा, शिजवलेले बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, जीरेपूड, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावे.
६) प्लास्टीक शिटला तूपाचा हात लावून गोळे थापावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे.
७) नॉनस्टीक तव्यावर थोडे तूप सोडावे. मिडीयम हाय हिटवर थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे. दही, मिरचीचा ठेचा, किंवा लिंबाचे गोड लोणचे यांबरोबर हे थालिपीठ छान लागते.


चकली

Tuesday, September 4, 2007

बटाटा चिवडा - Batata Chiwada

Batata Chiwada in English

batata chiwada, Chuwda recipe, Chiwda recipe, maharashtrian recipe, potato hash, homemade potato hash
"हा बटाटा चिवडा करायला कडक ऊन असणे आवश्यक आहे." बटाटयाचा किस निट वाळणे आवश्यक असते. कोकणामध्ये उन्हाळ्यात हा बटाटयाचा किस वर्षभर पुरेल इतका वाळवून ठेवतात. खाली दिलेली कृती ९-१० डिशेस चिवडा
बनेल एवढे प्रमाण दिले आहे.

साहित्य:
४ मोठे बटाटे
मोठे छिद्रं असलेली किसणी
जाड प्लास्टिकची शिट (किमान ३ फुट x ३ फुट)
शेंगदाणे
तिखट
साखर
मीठ
बटाटयाचा किस तळण्यासाठी तेल

कृती:
१) रात्री बटाटे प्रेशर कूकरमध्ये ४-५ शिट्ट्या करून शिजवावे. कूकरमधून काढून पेपरवर काढून घ्यावे. रात्रभर बाहेर ठेवावेत. दुसर्या दिवशी सकाळी ९-९.३० च्या सुमारास उन्हात प्लास्टिकची शिट घालावी.
२) बटाटे सोलून घ्यावेत. बटाटे थेट प्लास्टिक शिटवरच किसावे. बटाटे किसताना किसणीवर वरून खाली अशीच डिरेक्शन ठेवावी. एकदा किसून झाले कि बटाटा किंचित किसणीपासून उचलावा आणि पुन्हा वरून खाली अशी डिरेक्शन ठेवावी. किसणी आणि प्लास्टिक शिटमध्ये १/२ फूट अंतर ठेवावे.
३) बटाटा किसताना प्रत्येक वरून खाली अशा डिरेक्शननंतर किसणी थोडी पुढे करावी. म्हणजे किसलेला किस मोकळा राहिल, एकावर एक पडणार नाही.
४) अशा प्रकारे १-२ उन्हं दाखवून किस कडक वाळवावा.
५) गरम तेलामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे तळून घ्यावे. शेंगदाणे बाजूला काढून बटाटा किस तळून घ्यावा. किचन टॉवेल किंवा टिश्यू पेपरवर अधिकचे तेल काढून टाकावे.
६) तळलेला किस थोडा गार झाला कि त्यात मीठ, पिठीसाखर, लाल तिखट आणि तळलेले शेंगदाणे घालून एकत्र करावे.

टीप: खाताना आवडत असल्यास खवलेला ओला नारळ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि थोडी जिरेपूड घालावी.

Labels:
Chiwda recipe, Chiwada recipe, chivada recipe, Maharashtrian Chiwada recipe, Fast recipe, Fasting snacks, Upvas snacks, faral recipe