Showing posts with label Salad. Show all posts
Showing posts with label Salad. Show all posts

Tuesday, February 10, 2009

पाइनॅपल मँगो सलाड - Pineapple Mango Salad

Pineapple Mango Salad in English

वाढणी: २ जणांसाठी

ananasache salad, pineapple raita, healthy salad recipe, fruit salad, Mango salad
साहित्य:
१/४ कप अननसाचे लहान तुकडे
३/४ कप आंब्याचे पातळ उभे काप (आंबा आधी सोलून घ्यावा)
१/२ टिस्पून लिंबाचा रस
१/८ टिस्पून चाट मसाला
१/८ टिस्पून काळे मिठ
१/८ टिस्पून मिरपूड
१ टिस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/८ टिस्पून सुक्या लाल मिरचीचा चुरा
चवीपुरते मिठ
सजावटीसाठी १ लेट्युसचे पान

कृती:
१) एका वाटीत लिंबाचा रस, चाट मसाला आणि काळे मिठ मिक्स करावे.
२) एका वाडग्यात अननसाचे चौकोनी तुकडे आणि आंब्याच्या कापट्या हलक्या हाताने मिक्स करावे. लिंबूरसाचे मिश्रण यात घालून हळू हळू मिक्स करावे. चव पाहून गरज पडल्यास मिठ घालावे.
३) सर्व्हींग प्लेटमध्ये लेट्युसचे पान ठेवावे त्यात तयार सलाड घालावे. मिरपूड आणि कोथिंबीरीने सजवावे. तासभर फ्रिजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करावे.

Labels:
Pineapple Salad, Mango Pineapple Salad, Tangy Mango Salad

Tuesday, January 27, 2009

पाइनॅपल रायता - Pineapple Raita

Pineapple Raita in English

वाढणी : २ जणांसाठी

pineapple raita, yogurt raita recipe, healthy raita, Pineapple salad, Pineapple yogurt saladसाहित्य:
३/४ कप अननस लहान फोडी
१ कप दही
१/८ टिस्पून जिरेपूड
चवीपुरते मिठ
१ टेस्पून साखर
१ लहान हिरवी मिरची (ऐच्छिक)
१ टिस्पून कोथिंबीर
१ चेरी सजावटीसाठी (ऐच्छिक)
४ ते ५ अननसाचे लहान तुकडे सजावटीसाठी

कृती:
१) दही चांगले फेटून घ्या. त्यात साखर आणि थोडे मिठ घालावे. जर थोडा तिखटपणा हवा असेल तरच मिरची घालावी.
२) फेटलेल्या दह्यात अननसाच्या फोडी घालाव्यात. चव पाहून साखर मिठ आवडीनुसार वाढवावे, मिक्स करावे. सर्व्हींग बोलमध्ये घालून त्यावर जिरेपूड भुरभूरावी. नंतर अननसाच्या फोडी, कोथिंबीर आणि चेरीने सजवावे. थोडावेळ थंड करून सर्व्ह करावे.

टीप:
१) जर फक्त गोड रायते हवे असेल तर हिरवी मिरची वगळावी.
२) काही जणांना गोड रायते आवडते. त्यांनी आवडीनुसार साखर वाढवावी.
३) किंचीत मिरपूड घातल्याने छान स्वाद येतो. फक्त ती सर्व्ह करण्याआधी दह्यात मिसळू नये, त्यामुळे दह्याचा रंग बदलेल. म्हणून जिरपूडसारखीच वरून भुरभूरावी.

Friday, November 21, 2008

बुंदी रायता - Boondi Raita

Boondi Raita in English

वाढणी: ३-४ जणांसाठी

North Indian food, dahi boondi, boondi raita, bundi raita, rayta recipe, Indian restaurant style food, loose weight, low calorie food
साहित्य:
१ कप बुंदी (साधी)
३/४ कप पातळ ताक
३/४ कप दही
१/४ कप दूध
चवीपुरते मिठ
१/४ टिस्पून मिरपूड
::इतर जिन्नस::
१/२ टिस्पून जिरेपूड
१/४ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून चाट मसाला
२ टेस्पून बुंदी (न भिजवलेली)
थोडीशी कोथिंबीर

कृती:
१) सर्वप्रथम बुंदी ताकामध्ये साधारण २० मिनीटे भिजवून ठेवावी. २० मिनीटांनंतर बुंदी चेपून त्यातील ताक काढून टाकावे. खुप जास्त जोरात पिळू नये नाहीतर बुंदी मोडू शकते. ताक पुढील वापरासाठी ठेवून द्यावे.
२) ३/४ कप दही फेटून घ्यावे त्यात दूध, चवीपुरते मिठ आणि मिरपूड घालून निट ढवळून घ्यावे. मिठ थोडे कमीच घालावे कारण विकतच्या बुंदीमध्ये अगोदरच थोडे मिठ असते. दह्यात बुंदी घालून मिक्स करावे. जर मिश्रण खुप घट्ट वाटले तर किंचीत उरलेले घालून मिक्स करावे.
३) चव पाहून रायते सर्व्हींग प्लेटमध्ये घालावे. वरून जिरेपूड व किंचीत लाल तिखट भुरभूरवावे. मध्यभागी थोडी बुंदी घालावी. रायते खाताना मधेमधे थोडी कुरकूरीत बुंदी छान लागते. कुरकूरीत बुंदीवर अजून थोडे लाल तिखट, चाट मसाला व कोथिंबीर भुरभूरवावी. अर्धा एक तास फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवावे.
जेवताना थंड असे बुंदी रायते सर्व्ह करावे.

टीप:
१) जर आवडत असेल तर रायते आणि seasonings एकत्र मिक्स करू शकतो, पण रायत्याचा रंग लालसर होतो, चवीत फार फरक पडत नाही.
२) रायते थंड आवडत नसेल तर रेफ्रिजरेट न करताही सर्व्ह करू शकतो, छानच लागते.

Labels:
Boondi Raita, Dahi Boondi, Bundi raita, yogurt and fried gram flour snack

Tuesday, September 23, 2008

बिटाची कोशिंबीर - Beetachi Koshimbir

Beetroot salad in English

beetroot recipe, indian beetroot recipe, beetachi koshimbir, healthy salad recipe, oilfree food recipe, oilfree recipes
साहित्य:
३/४ कप किसलेले बिट (साधारण १ बिट)
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप बारीक चिरलेला टोमॅटो
१/२ टिस्पून जिरेपूड
१ टेस्पून शेंगदाणा कूट
१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१ टिस्पून लिंबाचा रस
मिठ साखर चवीनुसार

कृती:
१) बिट शक्यतो कच्चेच घ्यावे, पण कच्च्या बिटाची चव आवडत नसेल तर कूकरमध्ये १ शिट्टी करून अगदी थोडेच शिजवून घ्यावे. जास्त शिजवू नये.
२) बिटाचे साल काढून बिट किसून घ्यावे. त्यामध्ये वरील जिन्नस एकत्र करून चमच्याने एकजीव करून घ्यावे.

जेवणात हि बिटाची कोशिंबीर तोंडीलावणी म्हणून छान लागते.

Labels:
Beetroot raita, Beetachi koshimbir, beetroot recipe, beetroot salad recipe

Tuesday, August 12, 2008

रशियन सलाड - Russian Salad

Russian Salad (English Version)

healthy salad, Russian salad recipe, salads, veggie salad

साहित्य:
१/४ कप मटार
१/४ कप गाजर, (सोलून लहान चौकोनी तुकडे)
१/४ कप शिजलेला बटाटा (सोलून लहान फोडी)
१/४ कप पाती कांदा (बारीक चिरून)
१/४ कप काकडी (सोलून लहान चौकोनी फोडी)
१/४ कप टोमॅटो, बारीक चिरून
१/४ कप लाल सफरचंद (चौकोनी लहान फोडी)
१/४ कप अननसाचे तुकडे (चौकोनी लहान फोडी)
२ टेस्पून साखर
१/४ टिस्पून मोहोरी पावडर
२ टेस्पून व्हाईट सॉस
२ टेस्पून मेयॉनिज (एगलेस)
१/४ टिस्पून मिरपूड
कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) मटार आणि गाजराचे तुकडे वाफवून घ्यावे.
२) व्हाईट सॉस, साखर, मोहोरी पावडर एकत्र करून निट मिक्स करून घ्यावे. सर्व चिरलेल्या भाज्या व फळे एकत्र एका वाडग्यात घ्यावे. व्हाईट सॉस, साखर, मोहोरी पावडरचे मिश्रण त्यात घालून निट मिक्स करावे. मेयॉनिज घालून मिक्स करावे.
३) वरून थोडी मिरपूड घालावी. सर्व्हींग बोलमध्ये घालून फ्रिजमध्ये किमान अर्धा तास थंड करावे. जेवणाच्या वेळी थंड असे रशियन सलाड सर्व्ह करावे.

टीप:
१) जर मेयॉनिज वापरायचे नसेल तर दही सुती फडक्यात बांधून, एक तासभर टांगून ठेवावे. त्यातील पाणी निघून गेले कि घट्टसर भाग मेयॉनिज म्हणून वापरावा. दही शक्यतो फार आंबट नसावे.

Labels:

Russian Salad, Salad Recipe, Russian salad Recipe, quick and easy salad, healthy salad recipe

Tuesday, August 5, 2008

दह्यातील रायते - Dahi Rayate

रायते (English Version)

Raita, Indian Raita recipe, Mix veg raita, koshimbir, Yogurt Raita, Fat free salad, salad recipe, healthy salad recipe, loose weight, healthy diet

साहित्य:
काकडी : १/४ कप (सोलून चोचवणे)
कांदा : १/८ कप, बारीक चिरून
सिमला मिरची: १/४ कप, एकदम लहान चौकोनी तुकडे
टोमॅटो : १/४ कप, एकदम बारीक चिरून
३/४ कप दही (Fatfree)
/ कप दूध (Skimmed)
१ हिरवी मिरची बारीक चिरून
कोथिंबीर : २ टेस्पून बारीक चिरून
१/४ टिस्पून साखर
१/८ टिस्पून चाट मसाला
१/८ टिस्पून जिरेपूड
चवीनुसार मिठ

कृती:
१) सोललेली काकडी, कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो एकाच आकारात बारीक चिरून घ्यावे.
२) दही घोटून घ्यावे. दही पातळ करण्यासाठी पाणी न वापरता दूध वापरावे ज्यामुळे रायतं पांचट लागणार नाही. घोटलेल्या दह्यात दूध घालून ते थोडे पातळ करून घ्यावे.
३) या दह्यात कोथिंबीर, साखर, चाट मसाला, जिरेपूड, चवीनुसार मिठ घालावे व निट मिक्स करून घ्यावे.
४) दह्याच्या मिश्रणात चिरलेले काकडी, कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो घालून ढवळावे. फ्रिजमध्ये थंड करण्यस ठेवावे.
हे रायते तवा पुलावबरोबर खुप मस्त लागते.

Labels:
Dahi Raita, Yogurt Raita, Dahyatli Koshimbir, Indian salad Recipe, Mix veg salad, Mix veg Raita recipe

Thursday, July 31, 2008

खमंग काकडी - Khamang Kakdi

Khamang Kakadi (English version)

वाढणी : ३-४ जणांसाठी

cucumber salad, indian salad, indian raita, kakadichi koshimbir, koshimbir, kachumbar, khamang kakdi, Low calorie salad recipe

साहित्य:
२ कप चोचवलेली काकडी (कृती - क्र. १)
३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ टिस्पून लिंबाचा रस
१/२ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
३ ते ४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ

कृती:
१) काकडीची शेवटची दोन टोके कापावीत, आधी काकडी कडू नाहीये ना! हे चव घेवून पाहावे. नंतर काकडी सोलून चोचवून घ्यावी. चोचवलेल्या काकडीला थोडे मिठ चोळून एका वाडग्यात ठेवावे. मिठामुळे काकडीला पाणी सुटेल. हे पाणी काढून टाकावे तसेच चोचवलेली काकडी दोन्ही हाताने पिळून त्यातील अधिकचे पाणी काढून टाकावे. अशी पाणी काढून पिळलेली टाकलेली काकडी आपल्याला २ कप लागेल.
२) ही काकडी वाडग्यात घेऊन त्यात शेंगदाण्याचा कूट, चिरलेली कोथिंबीर, साखर घालून मिक्स करावे.
३) कढल्यात तूप गरम करून त्यात जिरे आणि चिरलेल्या मिरच्यांतील थोडी मिरची घालून फोडणी करावी व काकडीत घालावी.
४) उरलेली मिरची एका वाटीत घ्यावी. त्यात अगदी किंचीत मिठ घालावे (कारण आधीच काकडीला मिठ लावले आहे). चमच्याने किंवा हाताने चुरडावी आणि काकडीला लावावी. लिंबाचा रस घालून मिक्स करावे.
हि चविष्ट अशी खमंग काकडी उपवासाला किंवा इतर दिवशीही कोशिंबीर म्हणून जेवणात समाविष्ट करू शकतो.

Labels:
Cucumber Salad, kakadi Koshimbir recipe, Cucumbar Raita, Indian cucumber Raita

Thursday, June 12, 2008

कॅबेज सलाड - Cabbage Salad

Cabbage Apple Salad (English Version)


chinese salad, cabbage sala, Chinese Cabbage  Salad, healthy recipe, healthy salad recipe, weight target
साहित्य:
दिड कप पातळ चिरलेली कोबी
१/२ कप लाल सफरचंदाच्या फोडी
१/४ कप बारीक चिरलेला पाती कांदा
१/२ टिस्पून किसलेले आले
२ टेस्पून भाजलेले शेंगदाणे
१/२ टिस्पून सोया सॉस
१/२ टिस्पून व्हिनेगर
१ टेस्पून साखर
१ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टिस्पून किंचीत भाजलेले तिळ
१/४ टिस्पून सुक्या लाल मिरचीचा चुरा (ऑप्शनल)

chinese salad, cabbage sala, Chinese Cabbage  Salad, healthy recipe, healthy salad recipe, weight target
कृती:
१) सफरचंद आधी कापून ठेवू नये. सर्वात आधी पुढीलप्रमाणे मिश्रण करून घ्यावे : १/२ टिस्पून सोया सॉस, १/२ टिस्पून व्हिनेगर, १ टेस्पून साखर, १/२ टिस्पून किसलेले आले सर्व एकत्र करून साखर विरघळेस्तोवर मिक्स करावे.
२) भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढून टाकावीत. त्याची अगदी पावडर करून नये, फक्त थोडे कुटून घ्यावे.
३) एका भांड्यात पातळ कापलेली कोबी घ्यावी. सफरचंदाचे तुकडे करावेत. सफरचंदाच्या फोडींमध्ये वरील मिश्रण मिक्स करावे, आणि कोबीमध्ये मिक्स करावे.
४) वरून भाजलेले तिळ, कोथिंबीर, कुटलेले शेंगदाणे, पाती कांदा आणि लाल मिरच्यांचा चुरा घालून सलाड सजवावे.

टीप:
१) सलाडसाठी कोवळी कोबी घ्यावी तसेच आतून करकरीत असलेले लालबुंद सफरचंद घ्यावे.
२) यामध्ये मिठ घालायची गरज नसते पण जर गरज असल्यास चिमूटभर मिठ घालावे.
३) हे सलाड आयत्यावेळी बनवावे, कारण सफरचंद आधीच कापून ठेवले तर ते काळे पडेल. म्हणून क्रमांक १ मध्ये दाखवलेले मिश्रण आधीच बनवून फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.

Labels:
Cabbage salad, Apple salad, Salad Recipe, healthy salad recipe

Monday, April 28, 2008

कोबीची पचडी - Kobichi Pachadi

Kobichi Pachadi (English version)

low calorie, chinese food, gourmet food, food pyramid, low carb food, low carb cookies, low carb diets, low carb products, baby food, world health organization, healthy recipes, health net, healthy living, low carb dieting
साहित्य:
२ कप किसलेली कोबी
२-३ चमचे शेंगदाणा कूट
२ चमचे तेल
१/२ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा लिंबाचा रस
१/२ चमचा साखर
चवीपुरते मिठ
१/४ कप चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) एका वाडग्यात किसलेली कोबी घ्यावी. लहान कढल्यात २ चमचे तेल गरम करावे. तेलात जिरे, हिंग, हळद आणि मिरचीचे तुकडे फोडणीस घालावे. हि फोडणी किसलेल्या कोबीत घालावी.
२) शेंगदाण्याचा कूट, चवीपुरते मिठ, साखर, लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर किसलेल्या कोबीत घालावे व नीट मिक्स करावे.
हि पचडी तोंडीलावणी म्हणून छान लागते तसेच पोळीबरोबरही खायला छान लागते.

चकली

Labels:
kobichi pachadi, cabbage salad, kobi salad, cabbage recipe, kobi recipe, gobhi recipe.

Friday, April 18, 2008

मेक्सिकन सलाड - mexican salad

Mexican Salad (English Version)

Red Beans salad, Mexican Salad, salad recipe, Instant salad recipe, Tasty Salad Recipe, Healthy Heart recipe, healthy salad recipe, oilfree recipe, low calorie recipe, diet food recipe, diet recipes

वाढणी: साधारण दिड कप

साहित्य:
१/२ कप उकडलेले मक्याचे दाणे
१/२ कप उकडलेला राजमा/ रेड बिन्स
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप चिरलेला पाती कांदा (पातीसह)
१/४ कप बारीक चिरलेला टोमॅटो
१ बारीक चिरलेली मिरची
२ चमचे ग्रिन चिली सॉस/ हॉट पेपर सॉस
२ चमचे टोमॅटो केचप
२ चमचे लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
मूठभर टॉर्टिया चिप्सचे तुकडे (ऑप्शनल)

कृती:
१) मक्याचे दाणे, राजमाचे दाणे, कांदा, टोमॅटो एका बोलमध्ये एकत्र करून हलक्या हाताने मिक्स करावे.
२) ड्रेसिंगसाठी चिली सॉस/ हॉट पेपर सॉस, टोमॅटो केचप, लिंबाचा रस, बारीक चिरलेली मिरची आणि मिठ एका छोटया वाटीत एकत्र करावे
३) सर्व्ह करायच्या आधी चमच्याने हे ड्रेसिंग तयार सलाडवर घालून चांगले मिक्स करावे.
४) वरती मूठभर टॉर्टिया चिप्सचे तुकडे घालावे आणि सर्व्ह करावे.

Labels:
Mexican salad, Simple Mexican Salad recipe, Vegetarian Mexican Salad, bean and corn salad, salad with pepper sauce, rajma salad.

Friday, April 4, 2008

मूग मटकी सलाड - Moog Matki Salad

Boiled Moong Matki Salad(English Version)


matki recipe, matki salad, salad recipe, recipe for salad, salad recipes, sprouted moong salad, sprout salad, moong salad, moong matki salad

वाढणी: १ मध्यम बोल

साहित्य:
१/२ कप उकडलेली मटकी
१/२ कप उकडलेले मूग
१/२ मध्यम कांदा, चिरलेला
१ मध्यम टोमॅटो, बिया काढून चिरावा
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
१ चमचा लिंबूरस
१ लहान चमचा चाट मसाला
चवीपुरते मिठ
२ चमचे चिरलेली कोथिंबीर
१ पाती कांदयाची काडी
सजावटीसाठी:
१ लहान गाजर

कृती:
१) १/२ कप उकडलेली मटकी आणि १/२ कप उकडलेले मूग बनवण्यासाठी प्रत्येकी १/४ कप मूग आणि मटकी घ्यावी. १०-१२ तास भिजत ठेवावे. मूग मटकी भिजल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे व मूग मटकीला थोडे मिठ चोळून घ्यावे. प्रेशरकूकरमध्ये पाणी घालावे. मूग आणि मटकी कूकरच्या डब्यात घ्यावी. या डब्यात पाणी घालू नये. फक्त कूकरमध्ये तळाला जे पाणी घालतो त्यावरच मूग मटकी शिजू द्यावी. मूग मटकी खुप जास्त शिजू देवू नये. जर त्या प्रमाणाबाहेर शिजल्या तर सलाडची चव बिघडेल.
२) शिजवलेले मूग मटकी, चिरलेला कांदा, थोडा पाती कांदा, चिरलेला टोमॅटो, मिरची मिक्स करून एका बोल मध्ये ठेवावे. बोलवरती झाकण ठेवून १/२ तास फ्रिजमध्ये ठेवावे.
३) एका वाटीत लिंबूरस, थोडे मिठ, चाट मसाला मिक्स करून ठेवावे. हे मिश्रण सलाड सर्व्ह करायच्या आधी त्यात मिक्स करावे. कोथिंबीर, बारीक केलेले गाजर आणि पाती कांदा याने सजवावे. यावर चवीसाठी थोडी फ्रेश मिरपूड घालावी.

टीप:
१) मूग आणि मटकीला मोड काढून हे सलाड अधिक पौष्टिक बनवू शकतो.

Labels:
Healthy Salad, Moong salad, Matki salad, moth salad, oilfree recipe, healthy heart, heart healthy diet, moth recipes, matki recipe, low calorie diet, low, calorie recipes, low calorie food, low calorie salad

Tuesday, April 1, 2008

कॉर्न अँड पाइनॅपल सलाड - Corn Pineapple Salad

Corn & Pineapple Salad (English Version)

Colorful and Delicious

मक्याचे हे सलाड चवीला छानच लागते ! आणि अननसाबरोबर याची चव तर अधिकच वाढते. तसेच करायलाही अगदी सोपे आहे. नक्की करून बघा हे सलाड आणि कळवा कसे झाले होते ते !!

corn salad, pineapple salad, salad recipes, healthy heart recipe, corn, pineapple, Fruit salad, salads, heart healthy recipes, easy recipe, easy salad recipes
वाढणी: साधारण दिड कप

साहित्य:
१ कप स्विट कॉर्न
१/४ कप हिरवी भोपळी मिरची, कॉर्न एवढ्या आकारात चौकोनी चिरलेली
१/४ कप लाल भोपळी मिरची, कॉर्न एवढ्या आकारात चौकोनी चिरलेली
२ अननसाचे काप, चौकोनी चिरलेले
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा लिंबाचा रस
२ चमचे अननसाचा रस
सजावटीसाठी कोथिंबीर
चवीपुरते मिठ
चवीपुरती मिरपूड

कृती:
१) पटकन सलाड बनवण्यासाठी कॅनमधील स्विट कॉर्न वापरावा. वापरण्यापुर्वी कॉर्न एकदा पाण्याखाली धुवून घ्यावे. जर कणीस आणून त्याचे दाणे वापरणार असाल तर पाण्यात थोडे मिठ घालून दाणे शिजवून घ्यावेत. नंतर त्यातील पाणी काढून थंड होवू द्यावेत.
२) हिरवी आणि लाल भोपळी मिरची कॉर्नच्याच साईजची चिरून घ्यावी.
३) अननसाचे १ इंचाचे तुकडे कापून घ्यावे.
४) हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घ्यावी.
५) चिरलेली भोपळी मिरची, अननस, कॉर्न एकत्र करावे त्यात लिंबाचा रस , अननसाचा रस, मिठ, मिरची घालून निट मिक्स करावे.
६) सर्व्ह करायच्या आधी फ़्रेश मिरपूड वरती भुरभुरावी. आणि कोथिंबीरीने सजवावे.

Labels:
Corn Salad, Pineapple Salad, Corn, Pineapple, Salad Recipe, Corn recipes,Heart Healthy Recipe, Diet Food, Diet Recipe, easy recipe, easy salad recipe, Low fat recipe, fat free diet recipe, fat free diet recipe