Showing posts with label Sauce/Chutney. Show all posts
Showing posts with label Sauce/Chutney. Show all posts

Tuesday, February 3, 2009

कैरीचे इंस्टंट गोड लोणचे - Sweet Mango Pickle

Instant Mango Pickle in English

वाढणी: ३/४ कप
Mango Pickle, Sweet Mango Pickle, Ambyache Lonache, aamka achar, meetha achar recipe,aam aur gudh ka achara
साहित्य:
१/२ ते पाउण कप साल काढलेल्या फोडी (१ सेमी आकाराच्या फोडी)
१/२ कप किसलेला गूळ
१ टेस्पून लाल तिखट
१ टिस्पून मिठ
फोडणीसाठी: १ ते दिड टेस्पून तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद

कृती:

१) फोडींना आधी १० मिनीटे मिठ चोळून ठेवावे.
२) गूळ एका पातेल्यात घेऊन त्यात एक टेस्पून पाणी घालावे. गूळ पातळ करावा. गूळ पातळ झाला कि लगेच गॅसवरून उतरवावा, कोमट होवू द्यावा. गूळ कोमट झाला कि फोडींवर घालावा, तिखट घालावे आणि ढवळावे.
३) कढल्यात फोडणी करताना, तेल गरम करावे त्यात मोहोरी, हिंग व हळद घालावी. हि फोडणी जरा कोमट झाली कि लोणच्यात घालावी.

हे लोणचे फार दिवस टिकत नाही त्यामुळे थोड्या प्रमाणातच करावे.

Label:
Mango Pickle, Kairiche Lonache, Tangy Pickle

Thursday, October 2, 2008

पिझ्झा सॉस - Pizza Sauce

Pizza Sauce in English

साहित्य:
२ मोठे टॉमेटो, लालबुंद
१/४ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून साखर
१ लहान तुकडा दालचिनी
१/२ टिस्पून आलेलसूण पेस्ट
चवीपुरते मिठ

कृती:
१) टॉमेटो स्वच्छ धुवून घ्यावेत. पातेल्यात टॉमेटो बुडतील इतपत पाणी गरम करून त्यात टॉमेटो घालावेत ५ मिनीटे उकळवावेत. नंतर गॅस बंद करून ५ मिनीटे झाकून ठेवावेत.
२) साले आणि बिया काढून टाकाव्यात आणि टॉमेटोची प्युरी करून घ्यावीत.
३) एका नॉनस्टीक पॅनमध्ये टॉमेटोची प्युरी घालावी आणि त्यात लाल तिखट, साखर, दालचिनी, आलेलसूण पेस्ट, चवीपुरते मिठ घालून मंद आचेवर १० मिनीटे परतावे. दाटसर सॉस तयार झाला कि दालचिनी काढून टाकावी.

पिझ्झा बेसची कृती (Pizza Base)

पिझ्झाची कृती (Paneer Pizza Recipe)

झटपट ब्रेड पिझ्झा

Labels:
Pizza Suace, Tomato Pizza Sauce, How to Make Pizza Sauce

Tuesday, September 2, 2008

हुम्मूस - Hummus

Hummus and pita bread (English Version)

हुम्मुस (Hummus) हा पदार्थ मिडल इस्टमध्ये बनवला जाणारा चटणीसारखा पदार्थ आहे. या पदार्थात काबुली चणे (छोल्याचे चणे) हे मुख्यत्वे वापरले जातात.
हुम्मुसमध्ये "ताहिनी" (Sesame Paste) म्हणजेच भाजलेले तिळ व ऑलिव्ह ऑइल (Olive Oil) एकत्र वाटून केलेली पेस्ट वापरली जाते, पण थोडे बदल करून खालील कृतीत मी फक्त भाजलेल्या तिळाचा वापर केला आहे.
हुम्मुसबरोबर जोडीला पिटा ब्रेड सर्व्ह केला जातो. पिटा ब्रेडच्या कृतीसाठी इथे क्लिक करा.

वाढणी : साधारण १/२ कप

hummus, middle eastern food, hummus pita bread, baking, how to bake, chutney recipe, tahina sauce, tahini, recipe for pita bread, healthy protein food, Mediterranean food, heart healthy recipe

साहित्य:
१-२ लसूण पाकळ्या
३/४ कप मऊसर शिजवलेले काबुली चणे
१ ते २ टिस्पून भाजलेले तिळ
१ टेस्पून लिंबाचा रस
१/४ कप पाणी
१ टिस्पून ऑलिव्ह ऑइल (टीप १)
१/४ टिस्पून मिरपूड
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मिठ

कृती:
१) वरील सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. डब्यात बंद करून फ्रिजमध्ये काही तास थंड करावे.

टीप:
१) हुम्मुसमध्ये ऑलिव्ह ऑइल हा महत्त्वाचा पदार्थ आहे. मी ऑलिव्ह ऑइल वापरले नव्हते तरीही चव छान लागली, त्यामुळे आपल्या आवडीनुसार याचा वापर करावा.
२) हुम्मुस २-३ दिवस फ्रिजमध्ये सहज टिकते.

Labels:
hummus, pita bread, dip recipe, how to make hummus, chickpea hummus,hummus without oilve oil

Monday, September 1, 2008

हिरवी चटणी, चिंचगूळाची चटणी - Hirvi chatani Chichagulachi Chatani

Green and Tamarind Chutney in ENGLISH

::::हिरवी चटणी::::

वाढणी: १/४ कप

साहित्य:
१/२ कप चिरलेली कोथिंबीर,
६-७ हिरव्या मिरच्या
१/२ टिस्पून जिरेपूड
मीठ

कृती:
१) हिरवी चटणी: मिरची, कोथिंबीर, जिरेपूड आणि मीठ मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटून घ्यावे.

**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**
::::चिंचगूळाची चटणी::::

साहित्य:
१/४ ते १/२ कप चिंच
१/२ ते ३/४ कप गूळ
१ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून धणेपूड
१ कप पाणी
किंचीत मिठ

कृती:
चिंच १ कप पाण्यात घालून ३ मिनीटे उकळवून घ्यावी. गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवावे. नंतर गूळ घालून ठेवावा. चिंच-गुळाचे पाणी गार झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे आणि गाळण्याने गाळावे. धणे-जिरेपूड आणि मिठ घालून मिक्स करावे.

**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**--**

वरील रेसिपी मध्ये खजूरसुद्धा घालू शकतो. पण वेगळी घट्टसर खजुराची चटणी हवी असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा. - आंबट-गोड खजुराची चटणी

Thursday, August 21, 2008

शेजवान सॉस - Schezwan Sauce

Schezwan Sauce in English

वाढणी : साधारण अर्धा कप

हा शेजवान सॉस चायनिज स्टर फ्राईड वेजिटेबल्स बरोबर सर्व्ह करावा तसेच इतर चायनिज पदार्थातही याचा वापर करता येतो.

chinese food, oriental market, chinese cuisine, chinese restaurant,asian, indo china
साहित्य:
१ टिस्पून लसूण पेस्ट
२ टिस्पून चिरलेले लसूण
२ टेस्पून पाती कांदा
१ टेस्पून पाती कांद्याची पाती
१ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ टेस्पून चुरडलेल्या लाल मिरच्या
दिड टेस्पून लाल तिखट
१/३ कप टोमॅटो प्युरी
१ टेस्पून सोया सॉस
दिड टेस्पून व्हिनेगर
२ टेस्पून तेल
१ टिस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ टिस्पून साखर
१/४ टिस्पून मिरपूड
चवीनुसार मिठ

शेजवान सॉस याही पद्धतीने करता येईल - Schezwan Sauce

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण फोडणीस घालावे, थोडा रंग बदलला पाती कांदा, कोथिंबीर आणि चुरडलेल्या लाल मिरचीची पूड घालून मिक्स करावे. १ ते २ मिनीटे परतावे.
२) नंतर लाल तिखट, टोमॅटो प्युरी, सोया सॉस, व्हिनेगर घालून निट मिक्स करावे. साखर, मिरपूड आणि मिठ घालावे. सर्व एकत्र ढवळून घ्यावे.
३) १ टिस्पून कॉर्न फ्लोअरमध्ये २ टेस्पून पाणी घालावे आणि मिक्स करावे. हे मिश्रण सॉसमध्ये घालावे व ढवळून मध्यम आचेवर १-२ मिनीटे उकळू द्यावे.
सॉस दाटसर झाला कि गॅसवरून उतरवावा. वरून चिरलेल्या पाती घालून मिक्स करावे.

टीप:
१) हा सॉस खुप तिखट असतो त्यामुळे वापरताना गरजेपुरताच वापरावा किंवा लाल तिखटाचे प्रमाण कमी करावे.
२) उरलेला शेजवान सॉस लहान डब्यात भरून फ्रिजमध्ये ६-७ दिवस सहज टिकतो.

Labels:
Schezwan Sauce, szechwan, Sichuan sauce, Chinese Food

Thursday, June 5, 2008

आमसूल चटणी - Amsool Chatani

Amsool Chutney (English Version)

Kokum chutney, chutney recipe, Spicy Chutney Recipe, Amsool Recipe, healthy reicpe, diet food recipe, Indian Grocery

साहित्य:
५-६ आमसुलं
आमसुल गोळ्याच्या दुप्पट गूळ
३-४ मिरच्या
जिरं
मीठ

कृती:
१) आमसुलं १५-२० मिनीटे पाव वाटी गरम पाण्यात भिजत ठेवावीत. किंवा आमसुलाचे सार करून झाल्यावर उरलेली आमसुलं वापरावीत.
२) भिजवलेली आमसुलं, गूळ, मिरच्या, जिरं, मिठ एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी.

Labels:
amsool chutney, amsoolachi chutney, Kokum Chutney

Friday, April 25, 2008

वाटली डाळ

Vatali Chana Dal (English Version)

healthy recipes, healthy dinner recipe, healthy food recipes, easy healthy recipes, healthy fast food, low fat recipes, diet food, healthy snack recipes, healthy breakfast recipes, heart healthy food, reduce body fat, healthy diet recipes, cheap healthy recipes, healthy recipes for kids, healthy food list, fast healthy recipes, whole foods diet, easy low fat recipes, healthy salad recipes, how to reduce fat, health food center, low fat fast food

साहित्य:
१ वाटी चणाडाळ
फोडणीसाठी: ४ टेस्पून तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/२ टिस्पून हिंग, १ टिस्पून हळद, ४-५ कढीपत्त्याची पाने
३-४ हिरव्या मिरच्या
चवीपुरते मीठ
१/२ टिस्पून साखर
१/२ वाटी ओले खोबरे
लिंबाचा रस
कोथिंबीर

कृती:
१) चणा डाळ पाण्यात ३-४ तास भिजवावी. हि चणाडाळ पाणी न घालता भरडसर वाटून घ्यावी.
२) कढईत तेल गरम करावे. हिंग, हळद, मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून फोडणी करावी. वाटलेली चणाडाळ फोडणीस घालावी. चणाडाळ मध्यम आचेवर परतत राहावी. चवीनुसार मिठ, साखर घालावे.
३) चणाडाळीला ३-४ वेळा वाफ काढावी. वाफ काढताना चणाडाळीला पाण्याचा हबका मारावा.
४) चणाडाळ निट शिजली कि थोडे ओलं खोबरं, कोथिंबीर घालावी.
वाढताना लिंबाचा रस घालून ढवळावे.

चकली

Labels:
Chana Dal, Vatali Dal, vatli Chana Dal, Spicy Chana Dal, Instant Chana Dal Recipe, Vatali Dal Recipe.

Monday, April 21, 2008

शेंगदाणा सुकी चटणी - Shengdanyachi Chutney

Shengadana Chutney (English Version)

Shengdana Chutney, Peanut chutney, healthy recipe, side dish recipe, Indian Recipe, Heart healthy recipe, fat free recipes, low calorie recipe

साहित्य:
१/२ कप शेंगदाणे (भाजून सालासकट)
१/३ कप भाजलेले तिळ
१/४ कप भाजलेला खोबर्याचा किस
१ चमचा आमचूर पावडर
५-६ लाल सुक्या मिरच्या
१ चमचा तेल
चवीपुरते मिठ

कृती:
१) शेंगदाणे खमंग भाजावेत. भाजलेल्या शेंगदाण्याच्या सालांचा एक छान स्वाद असतो. जर नको असेल तर साले काढून टाकावीत.
२) १/३ कप भाजलेले तिळ घ्यावे.
३) सुक्या मिरच्या तोडून घ्याव्यात जर तिखटपणा कमी हवा असेल तर त्यातील बिया काढून टाकाव्यात. १ चमचा तेलावर त्या थोड्या भाजून घ्याव्यात.
४) खोबर्याचा किस भाजून घ्यावा त्यातील १/४ कप किस घ्यावा.
५) सर्व जिन्नस वरील प्रमाणात एकत्र करून मिक्सरवर बारीक वाटून चटणी बनवावी.

Labels:
Shengadana Chutney, shengdana chatani, recipe of shengdana chutney, peanut chutney, spicy peanuts chutney, chatani, chutney recipe

Monday, April 14, 2008

स्प्रिंग रोल डिपींग सॉस - Spring Roll Dipping Sauce

Spring Roll Dipping Sauce (English Version)

Healthy Recipe, Heart healthy recipe, Chinese spring roll, low calorie food, low calorie, healthy heart recipe
वाढणी: साधारण एक वाटी

साहित्य:
३ चमचे तेल
४ लसणीच्या पाकळ्या
१ लहान चमचा साखर
थोडे पाणी वाटण बनवण्यासाठी
१ लहान चमचा व्हिनेगर
१ चमचा सोयासॉस
१/२ कप टोमॅटो पेस्ट
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप बारीक चिरलेला पाती कांदा
१ लहान चमचा आले पेस्ट
४-५ लाल सुक्या मिरच्या
चवीपुरते मिठ
फ्रेश मिरपूड
गरजेनुसार लाल तिखट
स्प्रिंग रोलची कृती

कृती:
१) टोमॅटो पेस्ट, लाल मिरच्या, चिरलेल्यातील अर्धा कांदा, आले पेस्ट, लसणीच्या पाकळ्या हे सर्व साहित्य एकत्र करावे. शक्यतो कॅनमधील टोमॅटो पेस्ट किंवा बाजारातील रेडीमेड पेस्ट वापरावी. घरगुती बनवलेल्या पेस्टमुळे डिपींग सॉसला हवा तसा रंग आणि चव येत नाही. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक करून घ्यावे. मिश्रण घट्टसरच हवे आहे त्यामुळे अगदी बेताचे पाणी घालावे.
२) कढईत तेल तापवावे, बाकी राहिलेला कांदा आणि पाती कांदा घालावा. आपण हा कांदा शिजवणार नाही आहोत ज्यामुळे सॉसमध्ये कांद्याचा आवश्यक असा करकरीतपणा राहील.
३) लगेच सोयासॉस घाला. त्यावर साखर घालावी. ३-४ सेकंद परतून लगेच तयार लाल पेस्ट घालावी. या पेस्टला तेल सुटेपर्यंत परतावे (साधारण १ ते २ मिनीटे).
४) पेस्टला तेल सुटले कि त्यात व्हिनेगर घालावे आणि गॅस बंद करावा.
५) सॉसची चव बघावी. हा सॉस चांगला झणझणीत आणि तिखट असावा. आवश्यकतेनुसार मिठ, व्हिनेगर आणि लाल तिखट घालावे. थोडी मिरपूड घालावी आणि मिक्स करावे.

Labels:
Spring roll dipping sauce, recipe for dipping sauce, Asian dipping sauce, hot dipping sauce recipe, hot and spicy sauce, homemade dipping sauce

Sunday, March 30, 2008

आंबेडाळ - Ambadal

Amba Dal (English Version)

Great tasting Maharashtrian salad made from green mango and chana dal.

amba Dal, ambadal recipe, amba dal recipe, raw mango and dal chutney, maharashtrian traditional recipe, maharashtrian recipe, seasonal food recipe
वाढणी : २ मध्यम बोल

साहित्य:
१ वाटी चणाडाळ
१/२ वाटी कैरीचा किस
३-४ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी: ४ चमचे तेल, १ लहान चमचा मोहोरी, १ लहान चमचा हिंग, १ लहान चमचा हळद
१/२ लहान चमचा साखर
मीठ
कोथिंबीर

कृती:
१) चणाडाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावी. भिजल्यावर सर्व पाणी काढून टाकावे. मिक्सरवर भरडसर वाटून घ्यावी. २ मिरच्या डाळीबरोबरच वाटून घ्याव्यात. उरलेल्या मिरच्यांचा ठेचा करून ठेवावा.
२) कढल्यात तेल गरम करावे त्यात मोहोरी, हिंग, हळद घालावे. हि फोडणी वाटलेल्या चणाडाळीत घालावी. मिठ, साखर घालावे. गरजेनुसार मिरचीचे तिखट घालावे. कैरीचा किस आणि कोथिंबीर घालून निट मिक्स करावे.

टीप:
१) जर अगदीच कैरी नाही मिळाली तर लिंबाचा रस घालूनसुद्धा ही डाळ बनवता येते. म्हणजे ज्यांना हि डाळ आवडते ते adjustment म्हणून असे करू शकतात.

Labels:
Amba Dal, Raw Mango Dal, Chana Dal, Green Mango, kairi, Kairi Chutney, Maharashtrian Salad, Raw Mango Salad

Friday, March 28, 2008

मेतकूट - Metkut

Metkut (English Version)

मेतकूट हा मराठमोळा चविष्ठ पदार्थ !! मऊभात तूप आणि मेतकूट याची सर तर कशालाच नाही. दह्यात मेतकूट घालून तोंडीलावणी म्हणूनही खुप छान लागते. अशा या रूचकर मेतकूटाची ही कृती

metkut recipe, metakut recipe, maharashtrian side dish recipe, healthy food, low calorie food
साहित्य:
२ वाट्या चणाडाळ
१/२ वाटी उडीद डाळ
१/४ वाटी मूगडाळ
१/४ वाटी तांदूळ
१/४ वाटी गहू
१ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
१ चमचा हिंग
१ चमचा सुंठ पावडर
१ चमचा लाल मोहोरी

कृती:
१) सर्व डाळी, गहू, तांदूळ मध्यम आचेवर वेगवेगळे व कोरडेच भाजावे.
२) लाल मोहोरी मूग डाळीबरोबर भाजावी.
३) हळद, हिंग, तिखट, सुंठ पावडर एकत्र करावी. कढई गरम करावी. गॅस बंद करावा आणि हे सर्व जिन्नस थोडे शेकवून काढावे.
४) भाजलेल्या डाळी, तांदूळ, गहू, मोहोरी एकत्र अगदी बारीक दळून आणावे. हळद, हिंग, तिखट, सुंठ पावडर यांचे मिश्रण दळून आणलेल्या पिठात निट मिक्स करावे.

Labels:
Roast Dal and Spices Mixture, Maharashtrian spices, traditional spices

Wednesday, March 26, 2008

लसणीचे तिखट - Lasaniche Tikhat

Lasaniche Tikhat (English Version)

वाढणी : साधारण दिड कप चटणी

lasaniche tikhat, lasun tikhat, maharashtrian garlic chutney, spicy chutney, garlic chutney, lasun chatani, lasun chutney


साहित्य:
१/४ कप लसणीचे काप
१/४ कप शेंगदाणे
२/३ कप सुके खोबरे (भाजून)
१ चमचा मिठ
१ चमचा सुकी चिंच
१/४ कप लाल तिखट

कृती:
१) प्रथम शेंगदाणे चांगले भाजून घ्यावेत त्याची साले काढून घ्यावीत. त्याचा कूट करून घ्यावा.
२) सुके खोबरे किसून घ्यावे. चांगले खमंग भाजून घ्यावे. यातील २/३ कप भाजलेला किस घ्यावा.
३) मिक्सरमध्ये लसणीचे काप आणि मिठ वाटून घ्यावे. लसणीची बारीक पेस्ट करून घेतली कि चांगले, कारण लसणीसकट सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरवर वाटले तर त्यात लसणीचे बारीक तुकडे राहण्याचा संभव असतो.
४) आता शेंगदाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, लसणीची तयार केलेली पेस्ट, सुकी चिंच, लाल तिखट आणि गरज वाटल्यास मिठ असे सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक होईस्तोवर वाटावे.

हे लसणीचे तिखट तोंडीलावणी म्हणून मस्त लागते.

टीप:
१) चिंचेऐवजी आमचुर पावडरही वापरू शकतो.
२) शक्यतो रेडीमेड किसलेल्या खोबर्यापेक्षा सुक्या खोबर्याची वाटी आणून ती घरी किसावी. त्याचा स्वाद जास्त चांगला लागतो.
३) शेंगदाणे, खोबर्याचा किस खमंग भाजावे. नाहीतर लसणीचे तिखट जास्त टिकत नाही.

Friday, March 21, 2008

कांद्याची चटणी - Kanda Chutney

Kanda Chutney (English Version)

दाक्षिणात्य पद्धतीची हि चटणी डोसा किंवा उत्तप्प्याबरोबर छान लागते.


Onion Chutney, onion chutney recipe, onion chutney recipe, kandyachi chatni recipe, kanda chutney

साहित्य:
१ मोठा कांदा
३ लाल सुक्या मिरच्या
१/२ चमचा उडीदडाळ
१/२ चमचा चणाडाळ
१/४ वाटी चिरलेली कोथिंबिर
१/२ चमचा जिरे
३ चमचे तेल
१/२ ते १ चमचा चिंचेचा कोळ
थोडे पाणी
मिठ

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात उडीदडाळ, चणा डाळ खमंग परतून घ्यावी. डाळी बाजूला काढून उरलेल्या तेलात कांदा, लाल मिरच्या आणि जिरे घालून परतावे. जर गरज वाटली तर कांदा परतताना १ चमचा तेल वाढवावे. चवीनुसार मिठ घालावे.
२) थोडे मिठ घालून कांदा शिजू द्यावा. कांदा गोल्डन ब्राऊन झाला कि एखाद्या भांड्यात काढून अगदी थोडा निवळू द्यावा.
३) परतलेला कांदा, डाळी, चिंचेचा कोळ, व कोथिंबीर मिक्सरमध्ये घालावे. थोडे कोमट पाणी घालून घट्टसर चटणी बनवावी.

टीप:
१) यामध्ये थोडा खवलेला नारळही छान लागतो.

Labels:
Onion Chutney, South Indian Chutney Recipe, Chutney Recipe, Chatani Recipe

Wednesday, September 26, 2007

पंचामृत - Panchamrut

Panchamrut (English Version)

Indian Chutney, chutney recipe, Panchamrut recipe, Panchamrut

लग्नात जेवणाच्या पंगतीत हमखास चाखायला मिळणारा पदार्थ म्हणजे "पंचामृत". खुपच चविष्ठ असा हा पदार्थ बनवायला सोपा आहे.

वाढणी : साधारण १ कप

साहित्य:
१/४ कप चिंच
१/२ कप सुकया खोबर्याचे पातळ काप
१/४ कप भाजलेल्या तीळाचा कूट
१/४ कप भाजलेले शेंगदाणे
७-८ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
१/४ कप मनुका, बेदाणे, काजू
२-३ टेस्पून किसलेला गूळ
२-३ टिस्पून गोडा मसाला (काळा मसाला)
२ टिस्पून तेल
चिमूटभर हिंग
१/२ टिस्पून हळद

कृती:
१)चिंचेचा घट्ट कोळ करून घ्यावा (साधारण एक वाटी).
२)पातेल्यात तेल तापवावे. त्यात हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी.त्यात खोबर्याचे काप परतून घ्यावे. चिंचेचा कोळ घालावा. एक उकळी आल्यावर त्यात गोडा मसाला, शेंगदाणे, बेदाणे, मनुका, काजू घालावे.
३)थोडे पाणी घालावे. तिळाचा कूट घालावा. गूळ घालून थोडे आटवावे.

टीप:
१)पंचामृत हवाबंद काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ७-८ दिवस टिकते.

Labels:
Panchamrut, panchamrit recipe, chutney recipe, panchamrut recipe, maharashtrian panchamrut chutney, chatani

Tuesday, August 21, 2007

शेजवान सॉस - Schezwan Sauce

Schezwan sauce in English

साहित्य:
१० लाल सुकया मिरच्या
१ टेस्पून लसूण एकदम बारीक चिरून
१ टेस्पून आले पेस्ट
१ टेस्पून कांदा (अगदी बारीक चिरलेला) / किंवा पाती कांदा सुद्धा वापरू शकतो.
१/२ टेस्पून कॉर्न फ्लोअर किंवा कॉर्न स्टार्च
१ टेस्पून व्हिनेगर (ब्राऊन किंवा व्हाईट)
साखर आणि मीठ चवीनुसार
३ टेस्पून तेल

कृती :
१)१ कप पाणी चांगले उकळावे. त्यात सुकया मिरच्या तुकडे करून घालाव्यात. ३ ते ४ तासांनी किंवा मिरच्या नरम झाल्यावर त्यातले पाणी कढुन टाकावे. मिरच्यांची मिक्सरवर पेस्ट करावी.
२)तेल गरम करावे. त्यात लसूण, कांदा, आले मध्यम आचेवर परतून घ्यावे. मिरची पेस्ट घालावी.व्हिनेगर आणि कॉर्न फ्लोअर एकत्र करून घ्यावे. तेल सुटायला लागल्यावर त्यात व्हिनेगर-कॉर्न फ्लोअरचे मिश्रण आणि मीठ घालावे. चांगल्याप्रकारे परतावे.
३)सगळ्यात शेवटी साखर घालावी. साखर लागली कडेला की गॅस बंद करावा.

टीप :
१) हा सॉस काचेच्या बाटलीत बंद करुन ठेवावा. ६-७ दिवस टिकतो. आणि Schezwan Fried Rice बनवायला सोपे पडते.

Labels:
schezwan Sauce, Indo chinese recipe, Schezwan Fried Rice, Scheshuan recipe, scheshuan sauce.