Showing posts with label Baked. Show all posts
Showing posts with label Baked. Show all posts

Thursday, October 2, 2008

पिझ्झा बेस - Pizza Base

Pizza Base in English

वाढणी : १ थिन क्रस्ट पिझ्झा बेस

Pizza, Mozzarella Cheese, Vegetable Pizza Recipe, Indian style Pizza, Cheese Pizza
साहित्य:
३/४ कप मैदा
१ टिस्पून ड्राय यिस्ट
१/२ टिस्पून साखर
१/२ टिस्पून मिठ
१/४ कप कोमट पाणी
थोडा सुका मैदा पिझ्झा लाटताना

कृती:
१) एका बोलमध्ये २ टेस्पून कोमट पाणी घ्यावे, त्यात १ टिस्पून ड्राय यिस्ट व १/२ टिस्पून साखर घालून मिक्स करावे. हे मिश्रण १० मिनीटे झाकून ठेवावे. ५ ते १० मिनीटात हे मिश्रण फेसाळेल.
२) ३/४ कप मैदा वाडग्यात घेऊन हे फेसाळलेले मिश्रण त्यात घालावे, मिठ आणि थोडे तेल घालावे. गरजेनुसार थोडे कोमट पाणी घेऊन पिठ एकदम मऊसर मळून घ्यावे (साधारण ७-८ मिनीटे) . मळलेले पिठ एकदम Elastic झाले पाहिजे. मळलेल्या पिठाच्या गोळ्याला तेलाचा हात लावून एका काचेच्या किंवा इतर कोणत्याही, बर्‍यापैकी खोलगट (साधारण ६-७ इंच ) भांड्यात ठेवून वरून निट झाकावे. उबदार ठिकाणी हे भांडे दिड तास ठेवावे म्हणजे पिठ फुगून येईल.
३) मळलेले पिठ व्यवस्थित फुगले कि ओव्हन ४८० F (२५० C) वर प्रिहीट करावे. यिस्टमुळे पिठात हवेचे बुडबुडे तयार होतात, म्हणून पिठ परत एकदा निट मळून घ्यावे (३ मिनीटे). मळताना थोडा तेलाचा हात लावावा.
४) सुका मैदा भुरभूरवून जाडसर पोळी लाटावी (१ सेमी). काट्याने (Fork) पूर्ण पोळीवर टोचावे म्हणजे बेक करताना फुगणार नाही. पोळीला वरून थोडे तेल लावावे.
५) साधारण ६-८ मिनीटे बेक करून घ्यावे.

पिझ्झा सॉसची कृती (Pizza Sauce)
पनीर पिझ्झाची कृती (Paneer Pizza)

Labels:
Pizza Base, Easy Pizza Base Recipe, Pizza Dough

Tuesday, September 2, 2008

हुम्मूस - Hummus

Hummus and pita bread (English Version)

हुम्मुस (Hummus) हा पदार्थ मिडल इस्टमध्ये बनवला जाणारा चटणीसारखा पदार्थ आहे. या पदार्थात काबुली चणे (छोल्याचे चणे) हे मुख्यत्वे वापरले जातात.
हुम्मुसमध्ये "ताहिनी" (Sesame Paste) म्हणजेच भाजलेले तिळ व ऑलिव्ह ऑइल (Olive Oil) एकत्र वाटून केलेली पेस्ट वापरली जाते, पण थोडे बदल करून खालील कृतीत मी फक्त भाजलेल्या तिळाचा वापर केला आहे.
हुम्मुसबरोबर जोडीला पिटा ब्रेड सर्व्ह केला जातो. पिटा ब्रेडच्या कृतीसाठी इथे क्लिक करा.

वाढणी : साधारण १/२ कप

hummus, middle eastern food, hummus pita bread, baking, how to bake, chutney recipe, tahina sauce, tahini, recipe for pita bread, healthy protein food, Mediterranean food, heart healthy recipe

साहित्य:
१-२ लसूण पाकळ्या
३/४ कप मऊसर शिजवलेले काबुली चणे
१ ते २ टिस्पून भाजलेले तिळ
१ टेस्पून लिंबाचा रस
१/४ कप पाणी
१ टिस्पून ऑलिव्ह ऑइल (टीप १)
१/४ टिस्पून मिरपूड
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मिठ

कृती:
१) वरील सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. डब्यात बंद करून फ्रिजमध्ये काही तास थंड करावे.

टीप:
१) हुम्मुसमध्ये ऑलिव्ह ऑइल हा महत्त्वाचा पदार्थ आहे. मी ऑलिव्ह ऑइल वापरले नव्हते तरीही चव छान लागली, त्यामुळे आपल्या आवडीनुसार याचा वापर करावा.
२) हुम्मुस २-३ दिवस फ्रिजमध्ये सहज टिकते.

Labels:
hummus, pita bread, dip recipe, how to make hummus, chickpea hummus,hummus without oilve oil

पिटा ब्रेड - Pita Bread

Pita Bread (English Version)

वाढणी : १ ब्रेड (६ इंची)

hummus, middle eastern food, cuisine, hummus pita bread, baking, how to bake, oil free, hummus tahini, recipe for pita bread, healthy protein food, Mediterranean food, healthy diet, healthy nutrition
साहित्य:
१/४ कप मैदा
१ टिस्पून ड्राय यिस्ट (Active Dry Yeast)
३ टेस्पून कोमट पाणी (टीप १)
१/२ टिस्पून मिठ
१/२ टिस्पून साखर
१ टेस्पून ऑलिव्ह ऑइल

कृती:
१) प्रथम कोमट पाण्यात साखर घालून ढवळून घ्यावे. लगेच ड्राय यिस्ट घालून ढवळावे. हे मिश्रण १० मिनीटे झाकून ठेवावे ज्यामुळे यिस्ट active होईल आणि हे मिश्रण फेसाळेल.
२) मैदा एका वाडग्यात घ्यावा व त्यात मिठ घालून निट मिक्स करावे. त्यात यिस्टचे मिश्रण घालून मळून घ्यावे. आपल्याला हे पिठ एकदम सैलसर मळायचे आहे त्यामुळे गरज लागल्यास चमच्याने अजून थोडे कोमट पाणी घालून मळावे.
३) पिठ एकदम इलास्टिक होईस्तोवर मळावे. मळताना पिठ हाताला चिकटून नये म्हणून थोडे ऑलिव्ह ऑइल किंवा साधे तेल वापरावे. पिठ मळून एका भांड्यात ठेवावे.पूर्ण गोळ्याला वरून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ सुकणार नाही. मळलेले पिठ झाकून उबदार जागी साधारण तासभर ठेवावे.
४) तासाभराने पिठ फुलून दुप्पट आकाराचे झाले असेल. परत एकदा मळून त्यात तयार झालेले हवेचे बुडबुडे काढून टाकावेत. साधारण २-४ मिनीटे मळावे. मळताना शक्यतो अजून मैदा घालू नये.
५) ओव्हन ४५० F वर प्रिहीट करावे. ओव्हन प्रिहीट होईस्तोवर मळलेल्या पिठाची थोड्या मैदयाच्या सहाय्याने १/४ इंच जाडसर पोळी लाटावी. या पोळीवरील सुके पिठ अलगद झटकून टाकावे. पोळीचा पृष्ठभाग प्लेन असावा ज्यामुळे ब्रेड बेक केल्यावर फुलेल.
६) पोळीवर किंचित ऑलिव्ह ऑइलने ब्रशिंग करावे आणि baking sheet वर ठेवावी.ओव्हन प्रिहीट झाल्यावर हि पोळी ३-४ मिनीटे बेक करावी. बाहेर काढून बाजू पलटावी व दुसर्‍या बाजूने २-३ मिनीटे बेक करावी.
तयार पिटा ब्रेड हुम्मुसबरोबर सर्व्ह करावा.

टीप:
१) पाणी कोमटच असावे, गरम पाणी घेतल्यास यिस्ट मरते आणि हे पाणी वापरून जर पिठ भिजवले तर पिठ फुलणार नाही आणि त्यामुळे ब्रेड हलका होणार नाही.

Label:
Pita bread Hummus recipe Chickpea Humus recipe Pitta bread

Thursday, August 28, 2008

नानखटाई (शॉर्ट ब्रेड) - Nankatai (Shortbread)

Short Bread in English

nanakhatai, short bread, cookie recipe, baking recipe, biscuits recipe, how to make shortbread, indian grocery, indian sweet recipeसाहित्य:
५ १/२ टेस्पून बटर
१/४ कप साखर (सुपरफाईन)
१/२ कप + १/८ कप मैदा
१/४ कप तांदूळ पिठ
१/८ टिस्पून बेकिंग पावडर
चिमूटभर मिठ

कृती:
१) मैदा, तांदूळ पिठ, बेकिंग पावडर आणि मिठ हे सर्व एकत्र करून ५ वेळा चाळून घ्यावे ज्यामुळे सर्व जिन्नस एकसारखे मिक्स होतील.
२) मऊसर बटर आणि साखर एकत्र करून हॅण्डमिक्सरने फेसून घ्यावे. हे मिश्रण अगदी हलके झाले पाहिजे. साधारण ८ ते १० मिनीटे फेसावे.
३) ओव्हन ३२५ degree F वर प्रिहिट करावा. फेसलेल्या मिश्रणात हळूहळू चाळलेले पिठ घालून हॅण्डमिक्सरने एकत्र करून घ्यावे. मिश्रण नरमसर आणि हलके झाले पाहिजे.
४) ओव्हनसेफ भांड्यात (pie bakeware) या मिश्रणाचा १/२ इंचाचा थर द्यावा. थराचा पृष्ठभाग समान असावा. सुरीने अलगदपणे आवडीच्या शेपमध्ये आधीच कापून त्याच्या खुणा करून ठेवाव्यात. मिश्रण बेक केल्यावर कडक होईल आणि तेव्हा जर सुरीने कापले तर शॉर्ट ब्रेडचा चुरा पडेल.
५) मिश्रण ३० ते ३५ मिनीटे किंवा शॉर्ट ब्रेडचा रंग लाईट ब्राऊन होईस्तोवर बेक करावे. बेक करून झाले कि सुरीने ज्या खुणा केल्या आहेत, तिथून परत एकदा सुरी फिरवावी. शॉर्ट ब्रेड थंड होवू द्यावे. थंड झाल्यावर वेगळे करावेत.

Labels:
Short bread, Nankhatai, nankatai, shortbread cookie recipe

Wednesday, November 14, 2007

समोसा पफ - Samosa Puff

Samosa Puff In English

ही पाककृती खासकरून अमेरीकेतील समोसाप्रेमींसाठी आहे, Pillsbury चे रेफ्रिजरेटेड क्रेसेंट रोल्स कुठल्याही सुपरमार्केटमध्ये उपलब्ध असतात. क्रेसेंट रोल्स भारतात कुठे मिळतील याबद्दल मला फारशी कल्पना नाही.

samosa crescent rolls, samosa puff, crescent puff, masala puff
साहित्य:
रेफ्रिजरेटेड क्रेसेंट रोल्स (Crescent Rolls)
(कुठल्याही सूपर मार्केटमध्ये रेफ्रिजरेटेड सेक्शनमध्ये मिळते.)
स्टफिंगसाठी:
२ शिजवलेले बटाटे
१ वाटी शिजवलेले हिरवे वाटाणे
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ चमचा गरम मसाला
१ लहान चमचा आमचूर पावडर
१ चमचा धनेपूड
१ चमचा बडीशेप
१-२ चमचे तेल
फोडेणीसाठी मोहोरी, जिरे, हळद, कढीपत्ता
मीठ



कृती:
आपण समोसे बनवताना जसे सारण बनवतो तसेच सारण बनवायचे आहे.
१) बटाटे सोलून व्यवस्थित कुस्करून घ्यायचे.
२) कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हळद, कढीपत्ता, बडीशेप, मिरच्या घालाव्यात. वाटाणे घालून एक-दोन मिनीटे परतावे.
३) कुस्करलेले बटाटे घालावेत. गरम मसाला, धणेपूड, आमचूर पावडर आणि मिठ घालावे, व्यवस्थित मिक्स करावे.
४) क्रेसेंट रोल्सच्या "pipe shaped" पॅकमध्ये ८ त्रिकोणी चकत्या असतात. त्या अलगदपणे सेपरेट कराव्यात. त्यातील लहान बाजूवर १ ते दिड चमचा सारण ठेवावे. रोल करावा. चित्रात दाखवल्याप्रमाणे.
५) ओव्हन ३७० F वर प्रिहीट करावे. तयार केलेले रोल्स १५ -१८ मिनीटे बेक करावे.

टीप:
१) आपण आपल्या आवडीचे स्टफिंग बनवून व्हरायटी पफ बनवू शकतो.
२) तिखटपणा जास्त हवा असेल तर मिरचीचा ठेचा वापरावा.

Labels:
Samosa Puff, Samosa stuffing recipe, samosa recipe, spicy samosa recipe

Wednesday, November 7, 2007

काकडीचा केक - Kakadicha Cake

Kakadicha Cake

हा काकडीचा केक बराचसा तवसळी नावाच्या कोकणी पदार्थासारखा आहे. सणासुदीला गोडधोड म्हणून काकडीचा केक नक्की करून पाहा.

cucumber cake, kakadi cake, kakadi recipe

साहित्य:
२ वाट्या काकडीचा किस
१ वाटी रवा
१ वाटी गूळ
४ टेस्पून बटर
१ चमचा तूप
१ लहान चमचा वेलची पूड
बदामाचे काप

कृती:
१) काकडी सोलून किसून घ्यावी. दोन्ही हाताने दाबून त्यातले पाणी काढून टाकावे.
२) रवा तूपावर भाजून घ्यावा. मध्यम आचेवर कढईत बटर घालावे. त्यात रवा, गूळ आणि काकडीचा किस घालून ढवळत राहावे. ५-१० मिनीटांत रवा, गूळ, काकडीचा किस यांचे मिश्रण मिळून येते. त्यात वेलची पूड घालून ढवळावे.
३) ओव्हन ३७५ F ला प्रिहिट करावे. बेकिंग ट्रे मध्ये तूपाचा हात लावावा. त्यात तयार मिश्रणाचा १ इंचाचा थर करावा. त्यावर बदामाचे काप घालावे. १५-१८ मिनीटे बेक करावे. केकच्या कडा थोड्या गोल्डन ब्राऊन झाल्या कि केक तयार झाला असे समजावे.
४) केक ट्रेमधून काढावा सुरीने चौकोनी वड्या कराव्यात.

टीप:
१) हा केक गरम खायला जास्त छान लागतो. त्यामुळे जर थोडा उरलाच तर खाताना मायक्रोवेवमध्ये गरम करून खावा.
२) केक बेक केल्यावर थोडे नारळाचे दूध घालावे छान टेस्ट येते.

Labels:
Eggless Cake, Cucumber Cake, Homemade Cake, Cake recipe, Cucumber Semolina Cake, Semolina Cake

Tuesday, August 28, 2007

मिक्स बेक्ड वेजिटेबल - Mixed Baked Vegetables

Mix Baked Vegetable in English

mix vegetables, mix veg recipe, baked vegetable, marathi mix bhaji साहित्य:
१ कप शिजलेल्या बटाट्याच्या फोडी
१/२ कप उभा बारीक चिरलेला कांदा
पाव कप गाजराच्या फोडी
पाव कप फरसबी चिरून (१ इंच)
पाउण कप अर्धवट शिजवलेले मटार + मका दाणे
१/२ कप भोपळी मिरची उभी चिरून
२ शिजलेल्या टोमॅटोची प्युरी
(मिक्सरवर प्युरी करताना पाणी घालू नये. प्युरी करताना मिक्सरमध्ये २ लसणीच्या पाकळ्या टाकाव्या)
८-१० काजू बी
३-४ कढीपत्ता पाने
२ लाल सुक्या मिरच्या
१ चमचा गरम मसाला
२ चमचे बटर
मीठ
३ टेस्पून कोथिंबिर
लिंबाचा रस

ओव्हनमध्ये बटाटा, गाजर, चिरलेल्या कांद्यातील थोडा कांदा, फरसबी, सिमला मिरची ३५० F वर १२-१४ मिनिटे बेक करावे. किंवा आपल्या घरातील ओव्हनच्या सेटींग प्रमाणे adjust करून भाज्या गोल्डन ब्राउन होवू द्याव्यात. त्यामुळे भाजीला छानसा स्वाद येतो.

कृती:
१) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये मध्यम आचेवर बटर घालावे. कढीपत्ता, बेक
न केलेला कांदा, काजू बी घालावी. कांदा परतला गेला की लाल मिरचीचे तुकडे, बेक केलेल्या भाज्या घालाव्यात.
२) भाज्यांना थोडी वाफ काढावी. गरम मसाला घालावा. टोमॅटो प्युरी आणि लसूण यांचे मिश्रण घालावे. २-३ मिनीटे वाफ काढावी. त्यात मटार, मका दाणे घालावे. २-३ मिनीटे वाफ काढावी. मिठ घालावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. लिंबाचा रस घालावा.गरम गरम भाजी पोळीबरोबर किंवा पावाबरोबर खावी.

Labels:
mix vegetable recipe, baked vegetable recipe, mixed veg recipe, north indian recipe