Showing posts with label K - O. Show all posts
Showing posts with label K - O. Show all posts

Thursday, January 15, 2009

काळ्या वाटाण्याची आमटी - Kala Vatana Amti

Kalya Vatanyachi Amati in English

Kalya vatanyachi Amati, Indian spicy curry, homemade Indian food, Maharashtrian food, Upma recipe
साहित्य:
एक कप काळे वाटाणे
कांदा-नारळ पेस्टसाठी: १/४ कप खवलेला ओला नारळ, १/२ कप कांदा, उभा चिरून, १ टेस्पून तेल
फोडणीसाठी
२ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, ४ कढीपत्ता पाने
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
३ आमसुलं
१ टिस्पून गूळ
१ टेस्पून काळा मसाला
चवीपुरते मिठ

कृती:
१) काळे वाटाणे ८ ते १० तास भिजवावेत. नंतर पाणी काढून टाकावे आणि मोड येण्यासाठी सुती कापडात गच्चं बांधून ठेवावेत (कमीतकमी १० ते १२ तास).
२) पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे. कांदा नीट परतून घ्यावा. कांदा व्यवस्थित शिजला पाहिजे, कच्चा राहू देऊ नये. नंतर नारळ घालून परतून घ्यावे. (टीप) हे मिश्रण थोडे गार झाले कि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.
३) लहान कूकरमध्ये २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात भिजवून मोड आलेले वाटाणे घालून एक मिनीटभर परतावे. नंतर त्यात धणेजिरेपूड घालून परतावे. गरजेपुरते पाणी घालावे (साधारण १ ते दिड कप). चवीपुरते मिठ, काळा मसाला आणि आमसुलं घालावीत. मिक्स करून कूकर बंद करावा आणि ५ ते ७ शिट्टया किंवा वाटाणे शिजेपर्यंत शिट्ट्या कराव्यात.
४) कूकर थंड झाला कि उघडावा त्यात कांदा-नारळ पेस्ट घालून उकळी काढावी. आता गुळ घालावा. गरजेनुसार पाणी वाढवावे. चव पाहून तिखट आणि मिठ अड्जस्ट करावे.
हि वाटाण्याची आमटी गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करावी.

टीप:
१) जर सुके खोबरे वापरायचा असेल तर कांदा परतायच्या आधी सुका नारळ परतावा नंतर कांदा घालावा.
२) काही जणांना कडधान्याची आमटी फोडणीला टाकून प्रेशर कूक करायला आवडत नाही. अशावेळी, आधी प्रेशरकूकरमध्ये फक्त वाटाणे मिठ घालून शिजवून घ्यावेत. आणि नेहमीच्या फोडणीसारखे, कढईत फोडणीस टाकावेत.
३) ताजा खोवलेला नारळ वापरत असाल तर आवडीनुसार जास्त घातला तरी चालेल.
४) सुके खोबरे तेलात चांगले भाजून घेतल्याने त्याचा खमंगपणा या आमटीला छान लागतो. मी ओला नारळ व सुके खोबरे वापरून दोन्ही पद्धतीने आमटी बनवली. ओल्या नारळापेक्षा सुके खोबरे या आमटीत जास्त चांगले लागते, फक्त खोबरे तेलात छान खमंग भाजले गेले पाहिले.

Labels:
Kala Vatana Amati, Vatanyachi Amti, Maharashtrian Amti, Kalya vatanyache sambhar

Tuesday, January 6, 2009

मेथी थेपला - Methi Thepla

Methi Thepla in English

वाढणी: ४ ते ५ (५ ते ६ इंचाचे)

healthy indian food, low calorie food, paratha, thepla, methi, fenugreek recipes
साहित्य:
१ कप बारीक चिरलेली मेथी
१/२ कप कणिक
२ टेस्पून दही
१/२ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून ओवा
१ टिस्पून जिरेपूड
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून लाल तिखट
२-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
थोडेसे तेल
चवीपुरते मिठ

कृती:
१) एका भांड्यात चिरलेली मेथी आणि साधारण १/२ टिस्पून मिठ घालून किंचीत कुस्करून घ्यावी. १५-२० मिनीटे झाकून ठेवावे. थोड्यावेळात मेथीला किंचीत पाणी सुटेल.
२) मेथीमध्ये जिरे, ओवा, जिरेपूड, हळद, लाल तिखट, हिरव्या मिरच्या घालावे आणि मिक्स करावे. कणिक, किंचीत मिठ आणि दही घालून मळून घ्यावे. अजून दही लागणार नाही पण जर पिठ घट्ट झाले तर किंचीत दही घालून मळावे, पाणी वापरू नये. मळलेले पिठ १/२ तास झाकून ठेवावे.
३) १/२ तासाने पिठ एकदा परत मळून घ्यावे आणि ४ ते ५ गोळे करून घ्यावे. तवा गरम करावा. पोळ्या करतो तसे लाटून घ्यावे. थोडे तेल घालून दोन्ही बाजू निट भाजून घ्याव्यात.
गरम गरम थेपला चटणीबरोबर सर्व्ह करावा.

Labels:
Methi Thepla, Fenugreek Roti, Fenugreek Thepla

Tuesday, December 23, 2008

मेक्सिकन राईस - Mexican Rice

Mexican Rice in English

वाढणी २ जणांसाठी

Mexican Cuisine is famous for flavorful and colorful dishes. Previously I had posted few Mexican recipes like Mexican Salad, Red Beans with Rice and Quesadilla which are little Indianised way. Today I am posting recipe of Mexican Rice which is sauteed in Pure Ghee. Because of Ghee Rice becomes more flavorful and delectable.

Mexican Rice recipes, Bean Rice, Spanish Food, Tex mex food, corn and bean rice
साहित्य:
१/२ कप तांदूळ
३ कप वेजिटेबल स्टॉक
२ टेस्पून तूप
१ टेस्पून लसूणपेस्ट
१ कप कांदा, पातळ उभा चिरून (लांबी एक इंच)
१/२ कप भोपळी मिरची, लहान चौकोनी तुकडे
१/२ टिस्पून लाल तिखट
१ मोठा किंवा २ मध्यम टॉमेटो [१/२ ते ३/४ कप Canned Chopped Tomatoes]
१/२ कप कोबी, उभी चिरून
१/२ कप पाती कांदा, बारीक चिरून
१/४ कप ड्राय रेड बिन्स [१/२ कप कॅन्ड बिन्स]
२ टेस्पून उकडलेले मक्याचे दाणे [२ टेस्पून कॅन्ड मक्याचे दाणे]
१ तमालपत्र
चवीनुसार मिठ
किसलेले चिज (ऐच्छिक)

easy mexican rice recipe, authentic mexican food, mexican red rice
कृती:
१) जर कॅनमधील बिन्स वापरणार असाल तर तुम्ही लगेच हा भात करू शकता. पण ड्राय रेड बिन्स वापरणार असाल तर ६ ते ७ तास बिन्स भिजवून ठेवाव्यात. नंतर थोडे मिठ घालून प्रेशर कूकरमध्ये मध्यम शिजवून घ्याव्यात. बिन्स अख्ख्या राहिल्या पाहिजेत.
२) तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावा. पॅनमध्ये स्टॉक गरम करावा. त्यात धुतलेले तांदूळ घालावे. थोडे मिठ आणि तेल घालून तांदूळ मोकळा शिजवून घ्यावा. भात शिजला कि गाळून घ्यावा. परातीत किंवा ताटलीत मोकळा करून गार करावा.
३) खोलगट पॅनमध्ये पाणी गरम करावे. उकळत्या पाण्यात टॉमेटो घालावे. ४५ सेकंदांनंतर गॅस बंद करावा. लगेच टॉमेटो बाहेर काढून गार पाण्यात घालावेत, यामुळे टॉमेटोची साले निघतील. ती काढून आतला गर अलगद काढून सुरीने बारीक चिरून घ्यावा.
४) नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात तमालपत्र आणि लसूणपेस्ट परतावी. लाल तिखट आणि कांदा घालून परतावे. कांदा १/२ मिनीटंच परतावा आणि लगेच भोपळी मिरची घालावी. अर्धवट शिजवावे आणि त्यात टॉमेटो घालून थोडावेळ परतावे. तमालपत्र काढून टाकावे.
५) नंतर शिजवलेल्या बिन्स आणि मक्याचे दाणे घालून १/२ ते १ मिनीट परतावे. शिजवलेला भात घालून मोठ्या आचेवर परतावे. गरजेपुरते मिठ घालावे.
६) कोबी आणि थोडा पाती कांदा घालून परतावे. सर्व्ह करताना किसलेले चिज आणि पाती कांदा घालावा.

टीप:
१) वेजिटेबल स्टॉक नसेल किंवा करायला वेळ नसेल तर तांदूळ साध्या पाण्यातही शिजवू शकतो.

Labels:
Mexican Corn and beans rice, Mexican veg Red rice, texmex food

Tuesday, November 25, 2008

मेथीची आमटी - Methichi Amati

Methichi Amti in English

वाढणी: ३ जणांसाठी

methichi amti, amati recipe, maharashtrian food recipe, dal, dhal recipe, homemade dhal, high carb food
साहित्य:
१ ते दिड कप बारीक चिरलेली मेथीची पाने
१/२ ते ३/४ कप शिजवलेले घट्ट वरण (तूरडाळ)
फोडणीसाठी:
१ टेस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून लाल तिखट किंवा २-३ हिरव्या मिरच्या
४-५ कढीपत्ता पाने
१ टिस्पून गोडा मसाला
२-३ आमसुलं
१ टिस्पून गूळ
चवीनुसार मिठ

कृती:
१) कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात नेहमीप्रमाणे मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. आवडीनुसार तिखट किंवा मिरच्या घालाव्यात. कढीपत्ता पाने घालून काही सेकंद परतावे.
२) नंतर बारीक चिरलेली मेथी घालून परतावे. गॅस मध्यम ठेवून मेथी शिजू द्यावी. मेथी शिजताना कढईवर झाकण ठेवू नये. साधारण २-३ मिनीटे मेथी परतावी. नंतर त्यात शिजवलेली डाळ घालावी. गरजेनुसार पाणी घालावे. गॅस मिडीयम हायवर ठेवावा.
३) गोडा मसाला, आमसुलं घालून ढवळावे. १ उकळी आली कि मिठ आणि गूळ घालून अजून एक-दोन वेळ उकळी काढावी.
हि मेथीची आमटी, गरमगरम तूप-भाताबरोबर खावे.

टीप:
१) आंबटपणासाठी कोकमाऐवजी चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रसही वापरू शकतो.
२) गोडा मसाला नसल्यास इतर कोणताही करी मसाला वापरू शकतो.

Labels:
Methi Amati, Maharashtrian Dal, Amti recipe, Fenugreek recipe

Wednesday, October 22, 2008

रिकोटा चिजपासून खवा - Khava from Ricotta Cheese

Khava from Ricotta Cheese in English

साहित्य:
४२५ ग्राम रिकोटा चिज
१/२ टिस्पून तूप

कृती:
नॉनस्टीक पॅनमध्ये तूप घालावे, तूप पातळ झाले कि रिकोटा चिज घालावे. अगदी मध्यम आचेवर परतावे. सुरूवातीला चिज पातळ होते. रिकोटा चिज सारखे ढवळत राहावे, तळाला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. हळूहळू रिकोटा चिज घट्ट होवून त्याचा खवा तयार होतो. या कृतीत रिकोटा चिज आळत जाते. मी खवा केला तेव्हा ४२५ ग्राम रिकोटा चिजचा २०० ग्राम खवा तयार झाला होता. या कृतीला अंदाजे २५-३० मिनीटांचा कालावधी लागतो. खवा थंड झाला कि मळून घ्यावा.

खव्यापासून बनवलेले पेढे आणि मावा कुल्फी

pedha, Indian Sweets, Peda, Pedhe, malai pedasweets, Indian mithai, mithai recipe, kulfi, Indian Icecream recipe, Indian dessert







Labels:

Khava, Khoya, Khawa recipe, how to make Khava from Ricotta cheese

Thursday, October 16, 2008

ओल्या नारळाच्या करंज्या - Karanji

Coconut Karanji in English

वाढणी: साधारण ११ करंज्या
वेळ: साधारण १ तास
Diwali Faral, Karanjya, Olya Naralachya Karanjya, Coconut Karanji, Gujia, how to make karanjiदिवाळीसाठी ड्रायफ्रुट बेक करंजी

साहित्य:
::::सारण::::
सव्वा कप खोवलेला ओला नारळ
पाउण कप किसलेला गूळ
१/२ टिस्पून वेलची पूड
::::करंजी पिठ::::
पाउण कप मैदा
पाव कप रवा
१ टिस्पून साजूक तूप, पातळ केलेले
१/२ ते पाउण कप दूध
तळण्यासाठी तेल

कृती:
१) गूळ व नारळ एकत्र करून पातेल्यात, मध्यम आचेवर शिजवावे. वेलचीपूड घालावी आणि घट्टसर मिश्रण करावे. मिश्रण ओलसर असू नयेत नाहीतर करंज्या नरम पडतात.
२) करंजीच्या आवरणासाठी एका भांड्यात रवा आणि मैदा एकत्र करावा. तूप कडकडीत गरम करून मोहन घालावे. थोडे थंड झाले कि मोहन घातलेले तूप सर्व मैद्याला लागेल असे मिक्स करावे. अंदाजे घेत घेत गार दूध घालावे आणि घट्ट मळून घ्यावे. थोडा वेळ झाकून ठेवून द्यावे.
३) १५-२० मिनीटांनी थोडे दूधाचा हबका मारून पिठ जरा कुटून घ्यावे. पिठाचे एकेक इंचाचे गोळे करून घ्यावेत.
४) करंज्या वाळू नयेत म्हणून एक ताटली आणि एक ओला, पिळून घेतलेला कपडा तयार ठेवावा.
५) करंज्या करण्यासाठी पिठाची एक गोळी निट मळून घ्यावी. गोल आणि पातळसर पुरी लाटून घ्यावी. मध्यभागी एक चमचाभर नारळाचे सारण ठेवावे. पुरीच्या अर्ध्या कडेला किंचीत दूध लावावे म्हणजे दोन्ही कडा निट चिकटतील आणि तळताना करंजी फुटणार नाही. उरलेली रिकामी अर्धी बाजू दूध लावलेल्या बाजूवर आणून चिकटवावी. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. कातणाने अधिकचे पिठ कापून घ्यावे. [माझ्याकडे कातण नव्हते म्हणून काट्याने (Fork) कडेवरती थोडे डिझाईन केले.]
६) करंजी करून झाली कि ती ताटलीत ठेवून वरून ओला कपडा टाकून झाकावी म्हणजे करंजी सुकणार नाही. अशाप्रकारे सर्व करंज्या करून घ्याव्यात.
७) तळणीसाठी तेल गरम करावे. मध्यम आचेवर करंज्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.

Labels:
Olya Naralachya Karanjya, Karanji recipe, Gujia Recipe, nevri, karjikayi, karanji

Monday, September 15, 2008

मेथीच्या देठाची भजी - Methichi Bhaji

Methichya Dethachi Bhajji (English version)

Chinese, Mexican, Chinese Horoscope, cancun mexico, Thai Food, Indian Spicy Food, North Indian Food, Chinese Restaurant

साहित्य:
१ वाटी बारीक चिरलेली मेथीची देठं
१ मध्यम कांदा
अर्धी वाटी चणाडाळ
१ चमचा भरून तांदूळपिठ
१ चमचा कणिक
५-६ हिरव्या मिरच्यांची पेस्ट
३-४ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
१ चमचा जिरं
मिठ
तळणीसाठी तेल

कृती:
१) चणाडाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. नंतर अगदी थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट बनवून घ्यावी.
२) कांदा बारीक चिरावा. एका वाडग्यात मेथीची चिरलेली देठं, चिरलेला कांदा, चणाडाळ पेस्ट, चवीप्रमाणे हिरवी मिरची, तांदूळ पिठ, कणिक, जिरं, लसूण आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे. मिश्रण भज्यांची बोंडं तेलात सोडता येतील इतपत घट्ट ठेवावे.
३) कढईत तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाची बोंडं तळून घ्यावी.
चिंच गूळाच्या चटणीबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर हि भजी मस्त लागते.

टीप:
१) मेथी निवडताना ताजी व कोवळी मेथी निवडावी. यामुळे मेथीची देठं कोवळी मिळतील. खुप जून मेथी असेल तर देठातील धागे भजी खाताना तोंडात येतात.
२) आवडीनुसार तिखट कमीजास्त करावे.

चकली

Labels:
Methichi bhajji, methi Bonda, fenugreek pakoda, Methi Pakora, Methichya Dethachi Bhaji, Methi Pakoda

Thursday, September 11, 2008

लसणीचे वरण - Lasaniche Varan

Garlic Dal in English

वाढणी: साधारण दिड ते २ कप (२ जणांसाठी)


Garlic Dal, Dal Tadka, Garlic flavored dal, Indian dal recipe, Grocery, Target, Food, Indian food, Vegetarian diet food, soup

साहित्य:
१/२ कप तुरडाळ
२ लसूण पाकळ्या
३ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
३-४ कढीपत्ता पाने
फोडणीसाठी: १ टिस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
२ टिस्पून लिंबाचा रस
मिठ

कृती:
१) १/२ कप तुरडाळ स्वच्छ धुवून प्रेशर कूकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावी.नंतर रवीने किंवा चमच्याने घोटून घ्यावे.
२) लसणीच्या पाकळ्या सोलून बारीक चिरून घ्याव्यात. मिरच्या उभ्या चिरून घ्याव्यात.
३) कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि मिरच्या

फोडणीत घालून १५ सेकंद परतावे. कोथिंबीर घालावी आणि ५-७ सेकंद परतून घोटलेली डाळ घालावी.आवश्यकतेनुसार पाणी घालावे.मिठ घालावे. १-२ वेळा उकळी काढावी. लिंबाचा रस घालावा.
हे लसणीचे वरण गरम गरम तूप-भाताबरोबर वाढावे.

Labels:
Dal Tadka, phodaniche varan, lasun dal, lasoon dal, Maharashtrian Dal

Tuesday, September 9, 2008

मिरचीचे लोणचे - Mirchiche Lonche

Indian chili Pickle in English

Lonache, Mirchiche Lonache, Chili Pickle, Indian Pickles recipe, how to make pickle, hot and spicy, condiments, indian food, local restaurant, pickle recipes
साहित्य:
१ ते सव्वा कप हिरव्या मिरचीचे तुकडे (१ सेमी)
३ टेस्पून मिठ किंवा चवीनुसार
१/३ कप मोहोरी पावडर (लाल मोहोरी)
१/२ टेस्पून हिंग
फोडणी: १/४ कप तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद
१०-१२ मेथी दाणे

कृती:
१) मिरचीला आधी मिठ, हिंग लावून ठेवावे.
२) तेल तापवावे. त्यात आधी मेथीदाणे तळून घ्यावेत. बाहेर काढून कुटावेत आणि मिरचीमध्ये घालावेत.
३) त्याच तेलात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. हि फोडणी थंड होवू द्यावी.
४) फोडणी थंड झाली कि मिरचीमध्ये ओतावी, मोहोरी पावडर घालावी. सर्व निट मिक्स करून घ्यावे.
५) स्वच्छ व कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीत हि मिरची भरून ठेवावी. ८ ते १० दिवस मुरू द्यावी.
सर्व्ह करताना आयत्यावेळी लिंबाचा रस घालावा.

Labels:
Mirchi Lonache, Chili pickle, hot and spicy chili pickle, indian style chili pickle

Thursday, September 4, 2008

नारळाचे लाडू - Naralache Ladu

Coconut ladu in English

सोपे आणि पटकन होणारे लाडू..

वाढणी : साधारण ८ छोटे लाडू

coconut Laddu, laddu dessert recipe, sweets recipe, nariyal ke laddu, naralache ladu, coconut recipe, Indian laddu recipe, sweets, quick and easyसाहित्य:
२ कप खवलेला ताजा नारळ
१/२ कप साखर
१/२ कप दूध
१/२ टिस्पून वेलचीपूड
२ टेस्पून बदामाचे काप

कृती:
१) एका पातेल्यात खवलेला नारळ आणि दूध एकत्र करावे. मध्यम आचेवर उकळत ठेवावे.
२) घट्टसर होत आले कि साखर घालावी. पातेल्याच्या तळाला नारळ चिकटू नये म्हणून ढवळत राहावे.
३) वेलचीपूड आणि बदामाचे काप घालावे. मिश्रण घट्टसर होत आले कि गॅस बंद करावा आणि पातेले गॅसवरून उतरवावे.
४) मिश्रण थोडे कोमटसर होवू द्यावे. गरज पडल्यास थोडा तुपाचा हात घेऊन लाडू वळावेत.

टीप:
१) हे लाडू नरमसर होतात. जर थोडा घट्टपणा हवा असेल तर थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवावेत आणि मग खावेत.

Labels: laddu recipe, coconut laddu recipe, naralache ladu, naral ladu

Thursday, July 31, 2008

खमंग काकडी - Khamang Kakdi

Khamang Kakadi (English version)

वाढणी : ३-४ जणांसाठी

cucumber salad, indian salad, indian raita, kakadichi koshimbir, koshimbir, kachumbar, khamang kakdi, Low calorie salad recipe

साहित्य:
२ कप चोचवलेली काकडी (कृती - क्र. १)
३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ टिस्पून लिंबाचा रस
१/२ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
३ ते ४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ

कृती:
१) काकडीची शेवटची दोन टोके कापावीत, आधी काकडी कडू नाहीये ना! हे चव घेवून पाहावे. नंतर काकडी सोलून चोचवून घ्यावी. चोचवलेल्या काकडीला थोडे मिठ चोळून एका वाडग्यात ठेवावे. मिठामुळे काकडीला पाणी सुटेल. हे पाणी काढून टाकावे तसेच चोचवलेली काकडी दोन्ही हाताने पिळून त्यातील अधिकचे पाणी काढून टाकावे. अशी पाणी काढून पिळलेली टाकलेली काकडी आपल्याला २ कप लागेल.
२) ही काकडी वाडग्यात घेऊन त्यात शेंगदाण्याचा कूट, चिरलेली कोथिंबीर, साखर घालून मिक्स करावे.
३) कढल्यात तूप गरम करून त्यात जिरे आणि चिरलेल्या मिरच्यांतील थोडी मिरची घालून फोडणी करावी व काकडीत घालावी.
४) उरलेली मिरची एका वाटीत घ्यावी. त्यात अगदी किंचीत मिठ घालावे (कारण आधीच काकडीला मिठ लावले आहे). चमच्याने किंवा हाताने चुरडावी आणि काकडीला लावावी. लिंबाचा रस घालून मिक्स करावे.
हि चविष्ट अशी खमंग काकडी उपवासाला किंवा इतर दिवशीही कोशिंबीर म्हणून जेवणात समाविष्ट करू शकतो.

Labels:
Cucumber Salad, kakadi Koshimbir recipe, Cucumbar Raita, Indian cucumber Raita

Thursday, July 24, 2008

फडतरे यांची "कोल्हापूरी मिसळ" - Phadtare Misal

Phadtare's Kolhapuri Misal

कोल्हापूरातील फडतरे यांची मिसळ खुपच प्रसिद्ध आहे. मी त्यापद्धतीची मिसळ घरी बनवली होती. खुपच चविष्ट आणि चमचमीत पाककृती आहे.
त्याचा व्हिडीओ खाली दिला आहे. पण फडतरे यांनी hotel style सारखी जास्त प्रमाणावर हि मिसळ दाखवली आहे, म्हणून मी जशी मिसळ बनवली होती त्याचे प्रमाण दिलेले आहे.
पण त्यातील दोन चार जिन्नस (बडी इलायची, जाड मिठ, बेडगी मिरची तिखट, दगडफूल) घरात उपलब्ध नव्हते. त्यामुळे व्हिडिओ आणि खाली दिलेले प्रमाण याची सांगड घालून हि चविष्ट मिसळ नक्की करून पाहा.

वाढणी : ४ प्लेट

साहित्य:
::::बटाटा भाजी::::
२ ते अडीच कप बटाट्याच्या फोडी (शिजवून आणि सोलून)
३/४ कप कांदा (उभा चिरून)
२ टेस्पून तेल
फोडणीसाठी : १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/२ टिस्पून हळद
३ ते ४ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
चवीपुरते मिठ
::::मटकी उसळ::::
३/४ कप मटकी (भिजवून मोड काढल्यावर दिड कप)
३/४ कप चिरलेला कांदा
१/२ कप चिरलेला टोमॅटो
१/२ टिस्पून हळद
२ टिस्पून लाल तिखट
१ टेस्पून धणेजिरे पूड
२ टिस्पून तेल
३/४ टिस्पून साखर
चवीनुसार मिठ
::::कट::::
४ टेस्पून तेल
३/४ कप उभा चिरलेला कांदा
१/२ कप चिरलेला टोमॅटो
१/२ टिस्पून हळद
२ टिस्पून लाल तिखट
१/४ कप ओला नारळ
गरम मसाला पेस्ट:
२ टेस्पून सुके खोबरे, ३ लवंगा, १ दालचिनीची लहान काडी, चिमूटभर जायफळ पूड, २ वेलची, ४ लसूण पाकळ्यांची पेस्ट, १ टिस्पून आलेपेस्ट, ३ हिरव्या मिरच्या, १ टिस्पून जिरे



Labels:
kolhapuri Misal, misal recipe, maharashtrian misal recipe, misal recipe video

Thursday, July 17, 2008

कोबीची वडी - Kobichi vadi

Kobichi wadi (English version)

kobichi vadi, gobi pakoda, cabbage pakoda, cabbage fritters,restaurant style appetizers,desi restaurants, indian diet, fried food and health

साहित्य:
२ कप बारीक चिरलेली कोबी
१ टेस्पून लसूणपेस्ट high fat food, calorie conscious, calorie counting, cabbage recipe, leftover cabbage recipe, tasty bites
२ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून जिरं
१/२ टिस्पून हळद
२ टेस्पून तांदूळ पिठ
४ टेस्पून ज्वारीचे पिठ
२ टेस्पून बेसन
चवीपुरते मिठ
२ टेस्पून + वड्या शालो फ्राय करण्यासाठी तेल


कृती:
१) एका भांड्यात चिरलेली कोबी घ्यावी त्यात वरील सर्व जिन्नस घालावेत. थोडेसे पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे. नंतर तेल घालून थोडे मळून घ्यावे.
::::जर कूकर असेल तर::::
२) त्या कूकरच्या आतील डब्याला आतून तेल लावून घ्यावे व मळलेले पिठ त्यात घालावे व हाताने दाबून सपाट करावे. या डब्यावर झाकण ठेवावे आणि कूकर बंद करून वड्यांचे पिठ शिजवून घ्यावे.
३) वड्यांचे शिजवलेले पिठ थंड झाले कि त्याच्या वड्या पाडाव्यात. आवडीनुसार शालो फ्राय किंवा डिप फ्राय कराव्यात.
::::जर कूकर नसेल तर:::: (Images)
४) मोठे पातेले घ्यावे त्यात १ ते २ लिटर पाणी गरम करत ठेवावे. एका स्टिलच्या भांड्याला आतून तेल लावून घ्यावे. मळलेल्या पिठाचे २ ते ३ उंडे (रोल) करावेत व भांड्यात किंचीत अंतराने ठेवावे.
५) वरून झाकण ठेवावे. झाकणाला पंचा किंवा सुती कपडा बांधावा ज्यामुळे वाफेचे पाणी पिठात पडणार नाही. मोठ्या आचेवर १२-१५ मिनीटे वाफवावे. गॅस बंद करावा. ८-१० मिनीटांनी झाकण उघडून उंडे बाहेर काढावे. वड्या पाडून आवडीनुसार शालो फ्राय किंवा डिप फ्राय कराव्यात.

Labels:
Cabbage Pakoda, Kobi vadi, Kobichi wadi, gobhi pakora,kobiche wade, kobichya vadha, maharashtrian cabbage recipes

Tuesday, July 15, 2008

फराळी मिसळ - Farali Misal

Farali Misal (English Version) (स्टेप बाय स्टेप इमेजेससाठी इथे क्लिक करा)

वाढणी : ३-४ प्लेट

misal recipe, indian food, marathi food, diet food, healthy diet food, farali misal recipe

साहित्य:
::::शेंगदाण्याच्या उसळीसाठी::::
३/४ कप शेंगदाणे
१ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१/२ कप पाणी
२ आमसुलं
२-३ हिरव्या मिरच्या
१ टिस्पून गूळ
चवीपुरते मिठ
::::बटाट्याची भाजी::::
२ कप शिजलेल्या बटाट्याच्या फोडी
१ टिस्पून साजूक तूप
१/२ टिस्पून जिरे
३-४ हिरव्या मिरच्या
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून लिंबाचा रस
१/२ ते १ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ
::::साबुदाण्याची खिचडी::::
३/४ कप साबुदाणा
२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
३-४ हिरव्या मिरच्या
२ टेस्पून ओला नारळ
दिड ते २ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
चवीपुरती साखर आणि मिठ
१ टिस्पून लिंबाचा रस
इतर साहित्य:
बटाटा सळी
चिरलेली कोथिंबीर
मिरचीचा ठेचा (मिरची + मिठ + थोडीशी जिरेपूड)
दही

Indian Food, Farali Misal, fasting food, diet food, healthy recipes, weight gain recipes, restaurant food

कृती:
१) सर्वप्रथम शेंगदाणे ७-८ तास पाण्यात भिजत घालावेत. मिठ घालून कूकरमध्ये शिजवावेत.
२) साबुदाणे ४-५ तास भिजवावेत. उरलेले पाणी काढून टाकावे व साबुदाणे झाकून ठेवावे.

३) बटाट्याची भाजी - इथे क्लिक करा

४) शेंगदाण्याची उसळ - इथे क्लिक करा


बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची उसळ आधी करून ठेवली तरी चालते, पण साबुदाणा खिचडी आयत्यावेळी करावी कारण साबुदाण्याची खिचडी थंड झाली कि तिची चव उतरते.

५) साबुदाणा खिचडी -
भिजवलेल्या साबुदाण्याला साखर आणि मिठ अगोदरच लावून घ्यावे. कढईत तूप गरम करून त्यात जिरे आणि चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. साबुदाणे घालून परतावे. नंतर नारळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून परतावे. १ वाफ काढावी. लिंबाचा रस घालून ढवळावे.

मिसळ करताना सर्व पदार्थ गरम करावेत.
प्लेट किंवा बोलमध्ये आधी १ डाव बटाट्याची भाजी, खिचडी आणि मग दाण्याची उसळ अशा क्रमाने वाढावे. लिंबू पिळावे. त्यावर बटाटा सळी घालावी कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. तसेच सर्व्ह करताना बाजूला दही वाढावे.
जर तिखटपणा हवा असेल तर मिरचीचा ठेचा घालावा.

टीप:
१) जर बटाटा सळी नसेल किंवा त्याऐवजी दुसरे काही वापरायचे असेल तर घरगुती बटाट्याचा चिवडा वापरावा. तसेच बटाटा चिवडा विकतही आणू शकतो.
२) या मिसळीत बरेच वेरिएशन्स करता येतात. जसे बटाट्याच्या भाजीसारखीच सुरण-भोपळ्याची भाजी करता येते. तसेच खमंग काकडीही बनवून मिसळीत घालू शकतो.

Labels:
Maharashtrian Recipe, marathi recipe, fasting food, upvas recipe, Potato recipe, Indian food recipe

Thursday, June 26, 2008

मसाला दुध - Masala Dudh

Masala Dudh in English

Masala dudh, Masala Doodh recipe, Marathi Recipe Masala Dudh, India Tradition, Kojagiri pournima, Desi Recipe, Desi Groceryसाहित्य:
२ कप दुध
३ टेस्पून साखर
मसाल्यासाठी साहित्य:
१/४ कप बदामाची पूड
१ टेस्पून पिस्ता पूड
१/२ टिस्पून वेलचीपूड
चिमूटभर जायफळ पूड
१ चिमूटभर केशर

कृती:
१) मसाला बनवताना न खारवलेले पिस्ता आणि बदाम वापरावेत. त्याची पूड करावी. बदाम पिस्ता पूड, वेलची आणि जायफळ पूड आणि केशर एकत्र मिक्सरवर एकत्र करून घ्यावेत.
२) २ कप दूध गरम करावे. त्यात ३ टेस्पून किंवा आवडीनुसार साखर घालावी. बनवलेला २-३ टिस्पून मसाला घालून ढवळावे. थोडे उकळू द्यावे व गरम गरम सर्व्ह करावे.

टीप:
१) मसाला बनवताना इतरही सुकामेवा आवडीनुसार वापरू शकतो.
२) यामध्ये अख्ख्या चारोळ्याही घालू शकतो.
३) मसाल्यात जायफळ प्रमाणातच वापरावे. कारण मसाला दुधाला जायफळाचा जास्त फ्लेवर आला तर ते उग्र लागते.

Tuesday, June 24, 2008

मठ्ठा - Mattha

Mattha Spiced Buttermilk (English Version)

Mattha, Spiced Buttermilk, Maharashtrian Buttermilk, spicy buttermilk, Indian buttermilk recipe, low calorie diet

साहित्य:
१/२ कप दही
१ कप पाणी
१ टेस्पून कोथिंबीर
२ चिरलेली पुदीना पाने
१/४ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून किसलेले आले
चवीनुसार मिठ

कृती:
१) प्रथम दही रवीने घोटून घ्यावे. मग त्यात पाणी घालून घुसळून घ्यावे.
२) खलबत्त्यात घालून जिरे भरडसर कुटून घ्यावे. कुटलेले जिरे आणि किसलेले आले, घुसळलेल्या ताकात घालावे.
३) एका वाटीत १ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेली पुदीना पाने घ्यावीत. त्यात २ चिमटी मिठ घालून कुस्करून घ्यावे, म्हणजे मठ्ठा पिताना त्याची पाने तोंडात येणार नाहीत. हि कुस्करलेली कोथिंबीर व पुदीना पाने मठ्ठ्यात घालावी. चवीनुसार मिठ वाढवावे.
सर्व एकत्र ढवळून जेवणानंतर सर्व्ह करावे.

टीप:
१) किंचीत तिखटपणा हवा असेल तर अगदी चिमूटभर मिरचीची पेस्ट घालावी.

Labels:
Spiced Buttermilk, buttermilk recipes, Mattha recipe, how to make Mattha

Tuesday, June 17, 2008

कोबीची भजी - Kobichi Bhaji

Kobi Pakoda (English Version)

gobi pakora, kobi bhuji, gobhi pakora recipe, gobhi recipe, quick and easy, kobichee recipe, recipy

साहित्य:
३/४ कप बारीक चिरलेली कोबी
१/४ कप बारीक चिरलेली भोपळी मिरची
४ टेस्पून बेसन
१ टेस्पून कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोअर
२ हिरव्या मिरच्या
३ लसणीच्या पाकळ्या
१ टिस्पून जिरे
१/२ टिस्पून हिंग
१ टिस्पून हळद
१ टिस्पून लाल तिखट
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) प्रथम चिरलेली कोबी आणि भोपळी मिरची एका वाडग्यात एकत्र करावे. त्याला थोडे मिठ चोळावे ज्यामुळे भाज्यांना थोडे पाणी सुटेल.
२) मिरच्या आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरवर वाटून घ्याव्यात. किंवा मिरचीची आणि लसणीची पेस्ट उपलब्ध असेल तर ती वापरावी.
३) मिठ लावलेल्या भाज्यांमध्ये वर दिलेले सर्व साहित्य घालून मिक्स करावे. अगदी थोडे पाणी घालून कांदा भजीला भिजवतो तितपत घट्टसर भिजवावे.
४) तेल गरम करून भिजवलेल्या पिठाची लहान लहान बोंडं तळून घ्यावीत. भजी तळताना मध्यम आचेवर तळावीत नाहीतर भजी आतमध्ये कच्ची राहण्याचा संभव असतो.

Labels:
bhajee, bhajji, Bonda, Gobhi Pakoda, kobiche wade, kobi wade, pakora recipe, gobi pakora recipe

Thursday, May 29, 2008

मिनी उत्तप्पा - Mini Uttappa

Mini Uthappa (English Version)

uthappa recipe, Uttappa recipe, South Indian Uthappa, Onion Uthappa, Masala Uthappa

साहित्य:
१/२ कप उडीद डाळ
सव्वा ते दिड कप तांदूळ
चवीपुरते मिठ
१ कांदा
१ टोमॅटो
१ टीस्पून मिरचीचा ठेचा (ऑप्शनल)
कोथिंबीर
१/२ वाटी तेल

कृती:
१) तांदूळ आणि उडीद डाळ पाण्यात साधारण ७-८ तास भिजत घालावे. नंतर मिक्सरमध्ये थोडे बारीक वाटून घ्यावे. मिश्रण एकदम पातळ किंवा घट्टं नसावे. मध्यमसरच वाटावे, त्यानुसार वाटताना पाणी घालावे. मिक्सरमध्ये डाळ व तांदूळ वाटताना १ चमचाभर मिठ घालावे.
२) वाटलेले मिश्रण आंबवण्यासाठी उबदार ठिकाणी किमान १०-१२ तास झाकून ठेवावे. जर वातावरण खुप थंड असेल तर ओव्हन २-३ मिनीटे प्रिहीट करून बंद करावा व मिश्रण झाकून ओव्हनमध्ये ठेवावे. तेवढ्या उबेवर पिठ आंबते. आवश्यकतेनुसार आंबवलेल्या पिठात मिठ घालावे.
३) पिठ आंबले कि कांदा पातळ आणि उभा चिरावा. कांद्याला थोडे मिठ चोळून घ्यावे. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
४) नॉनस्टीक तवा गरम करावा. १/२ चमचा तेल घालावे. आंबवलेल्या पिठापैकी १ डाव पिठ तव्यावर घालून थोडे जाडसर पसरवावे. त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आवडत असल्यास किंचीत मिरचीचा ठेचा लावावा.
५) मध्यम आचेवर तव्यावर झाकण ठेवून थोडी वाफ काढावी. एक बाजू शिजली कि सावकाशपणे कालथ्याने बाजू पलटावी कारण वरच्या बाजूवर आपण कांदा टोमॅटो घातले आहेत. दुसरी बाजू शिजू द्यावी. गरम गरम मिनी उत्तपा, सांबार आणि चटणीबरोबर सर्व्ह करावे.


टीप:
१) मसाला डोसा बनवताना जी बटाट्याची भाजी करतो ती भाजी, उत्तप्प्यावर कांदा टोमॅटो घालून एक वाफ काढली कि पसरवावी आणि हि बाजू शेकवावी. हा मसाला उत्तप्पाही मस्त लागतो.

Labels:
Mini Uttappa, Onion Uttappa, Tomato Uthappa, South Indian Recipe, Onion Tomato Uthappa

Thursday, May 22, 2008

मसूर उसळ - Masoor Usal

Masoor Usal (Egnlish Version)

masoorachi usal, masoor usal, lentils, legumes, Lentil curry, hot curry recipe, new york style curry, healthy food, quick recipe
साहित्य:
१ वाटी मसूर
१ कांदा
१/४ कप ओलं खोबरं
फोडणीसाठी : २ चमचे तेल,१/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट
२-३ कढीपत्ता पाने
१-२ आमसुलं
१ टिस्पून साखर
मीठ
चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) १ वाटी मसूर रात्रभर पाण्यात भिजवावे. पाणी काढून टाकावे व सुती कापडात मोड येण्यासाठी १०-१२ तास गच्चं बांधून ठेवावेत.
२) नंतर कांदा बारीक चिरून घ्यावा. कढईत २-३ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. कढीपत्ता घालावा, खवलेला नारळ घालावा, कांदा फोडणीस घालावा. मीठ घालावे.
३) कांदा परतावा. कांदा परतला गेला कि मग मोड आलेले मसूर आणि आमसुल घालावे. मध्यम आचेवर मसूर वाफेवरच शिजवावे, पाणी घालू नये. मधेमधे ढवळावे. साखर घालावी. मसूर वाफेवर छान शिजले कि कोथिंबीर घालावी.
गरम गरम पोळीबरोबर मसूराची उसळ सर्व्ह करावी.

टीप:
१) जर वातावरण फार थंड असेल तर भिजवलेल्या कडधान्याला मोड लगेच येत नाहीत. अशावेळी मसूर सुती कापडात गच्चं बांधून घ्यावेत. ओव्हन २ मिनीटं प्रिहीट करावा. ओव्हन off करावा आणि बांधलेले मसूर ओव्हनमध्ये ठेवावे. काही तासांनी व्यवस्थित मोड येतात. इतर कोणतेही कडधान्य असेल त्यांनासुद्धा अशाच पद्धतीने मोड काढता येतात.

Labels:
Masoor Usal, Maharashtrian Masoor Usal Recipe, Lentils

Tuesday, May 13, 2008

कुळथाचे कळण - Kulathache kalan

Kulathache Kalan (English Version)

कुळथाची उसळ बनवण्यासाठी कुळीथ शिजवून घ्यावे लागतात. कुळीथ शिजवल्यावर उरलेल्या पाण्यापासून चवदार कळण बनवता येते, त्याची हि कृती

Kulith Kalan, Horsegram recipe, Kulathache Kalan, healthy recipe, heart healthy food, soup recipe, indian soup recipe

साहित्य:
१ वाटी कुळीथाचे पाणी
(कुळीथ शिजवून उरलेले पाणी)
१ वाटी आंबट ताक
१ हिरवी मिरची
१/२ टिस्पून साजूक तूप
१/४ टिस्पून जिरे
चिमूटभर हिंग
मीठ
१ चमचा चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) एका पातेल्यात कुळथाचे पाणी घ्यावे. मध्यम आचेवर कोमट करावे. नंतर त्यात तयार ताक घालावे.
२) मिरची चिरावी व थोडे मिठ घालून चुरडून घ्यावी. चुरडलेली मिरची कुळथाच्या पाण्यात घालावी. चवीनुसार मिठ वाढवावे.
३) लहान कढल्यात तूप गरम करून जिरं, हिंग घालून फोडणी करावी. कोमटसर कुळथाच्या पाण्याला हि फोडणी वरून घालावी व पिण्याइतपतच गरम करावे. खुप गरम करू नये.
४) कोथिंबीर घालावी. हे कळण नुसते प्यायला आणि भाताबरोबरही छान लागते.

टीप:
१) आवडत असल्यास फोडणीत कढीपत्ता घालू शकतो.

Labels:
Kulathache Kalan, Horse Gram Soup, Soup Recipe, Maharashtrian Soup Recipe, Kulith Kalan