Kulathache Kalan (English Version)
कुळथाची उसळ बनवण्यासाठी कुळीथ शिजवून घ्यावे लागतात. कुळीथ शिजवल्यावर उरलेल्या पाण्यापासून चवदार कळण बनवता येते, त्याची हि कृती
साहित्य:
१ वाटी कुळीथाचे पाणी
(कुळीथ शिजवून उरलेले पाणी)
१ वाटी आंबट ताक
१ हिरवी मिरची
१/२ टिस्पून साजूक तूप
१/४ टिस्पून जिरे
चिमूटभर हिंग
मीठ
१ चमचा चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) एका पातेल्यात कुळथाचे पाणी घ्यावे. मध्यम आचेवर कोमट करावे. नंतर त्यात तयार ताक घालावे.
२) मिरची चिरावी व थोडे मिठ घालून चुरडून घ्यावी. चुरडलेली मिरची कुळथाच्या पाण्यात घालावी. चवीनुसार मिठ वाढवावे.
३) लहान कढल्यात तूप गरम करून जिरं, हिंग घालून फोडणी करावी. कोमटसर कुळथाच्या पाण्याला हि फोडणी वरून घालावी व पिण्याइतपतच गरम करावे. खुप गरम करू नये.
४) कोथिंबीर घालावी. हे कळण नुसते प्यायला आणि भाताबरोबरही छान लागते.
टीप:
१) आवडत असल्यास फोडणीत कढीपत्ता घालू शकतो.
Labels:
Kulathache Kalan, Horse Gram Soup, Soup Recipe, Maharashtrian Soup Recipe, Kulith Kalan
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment