Showing posts with label Methi. Show all posts
Showing posts with label Methi. Show all posts

Tuesday, January 6, 2009

मेथी थेपला - Methi Thepla

Methi Thepla in English

वाढणी: ४ ते ५ (५ ते ६ इंचाचे)

healthy indian food, low calorie food, paratha, thepla, methi, fenugreek recipes
साहित्य:
१ कप बारीक चिरलेली मेथी
१/२ कप कणिक
२ टेस्पून दही
१/२ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून ओवा
१ टिस्पून जिरेपूड
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून लाल तिखट
२-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
थोडेसे तेल
चवीपुरते मिठ

कृती:
१) एका भांड्यात चिरलेली मेथी आणि साधारण १/२ टिस्पून मिठ घालून किंचीत कुस्करून घ्यावी. १५-२० मिनीटे झाकून ठेवावे. थोड्यावेळात मेथीला किंचीत पाणी सुटेल.
२) मेथीमध्ये जिरे, ओवा, जिरेपूड, हळद, लाल तिखट, हिरव्या मिरच्या घालावे आणि मिक्स करावे. कणिक, किंचीत मिठ आणि दही घालून मळून घ्यावे. अजून दही लागणार नाही पण जर पिठ घट्ट झाले तर किंचीत दही घालून मळावे, पाणी वापरू नये. मळलेले पिठ १/२ तास झाकून ठेवावे.
३) १/२ तासाने पिठ एकदा परत मळून घ्यावे आणि ४ ते ५ गोळे करून घ्यावे. तवा गरम करावा. पोळ्या करतो तसे लाटून घ्यावे. थोडे तेल घालून दोन्ही बाजू निट भाजून घ्याव्यात.
गरम गरम थेपला चटणीबरोबर सर्व्ह करावा.

Labels:
Methi Thepla, Fenugreek Roti, Fenugreek Thepla

Tuesday, November 25, 2008

मेथीची आमटी - Methichi Amati

Methichi Amti in English

वाढणी: ३ जणांसाठी

methichi amti, amati recipe, maharashtrian food recipe, dal, dhal recipe, homemade dhal, high carb food
साहित्य:
१ ते दिड कप बारीक चिरलेली मेथीची पाने
१/२ ते ३/४ कप शिजवलेले घट्ट वरण (तूरडाळ)
फोडणीसाठी:
१ टेस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून लाल तिखट किंवा २-३ हिरव्या मिरच्या
४-५ कढीपत्ता पाने
१ टिस्पून गोडा मसाला
२-३ आमसुलं
१ टिस्पून गूळ
चवीनुसार मिठ

कृती:
१) कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात नेहमीप्रमाणे मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. आवडीनुसार तिखट किंवा मिरच्या घालाव्यात. कढीपत्ता पाने घालून काही सेकंद परतावे.
२) नंतर बारीक चिरलेली मेथी घालून परतावे. गॅस मध्यम ठेवून मेथी शिजू द्यावी. मेथी शिजताना कढईवर झाकण ठेवू नये. साधारण २-३ मिनीटे मेथी परतावी. नंतर त्यात शिजवलेली डाळ घालावी. गरजेनुसार पाणी घालावे. गॅस मिडीयम हायवर ठेवावा.
३) गोडा मसाला, आमसुलं घालून ढवळावे. १ उकळी आली कि मिठ आणि गूळ घालून अजून एक-दोन वेळ उकळी काढावी.
हि मेथीची आमटी, गरमगरम तूप-भाताबरोबर खावे.

टीप:
१) आंबटपणासाठी कोकमाऐवजी चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रसही वापरू शकतो.
२) गोडा मसाला नसल्यास इतर कोणताही करी मसाला वापरू शकतो.

Labels:
Methi Amati, Maharashtrian Dal, Amti recipe, Fenugreek recipe

Monday, September 15, 2008

मेथीच्या देठाची भजी - Methichi Bhaji

Methichya Dethachi Bhajji (English version)

Chinese, Mexican, Chinese Horoscope, cancun mexico, Thai Food, Indian Spicy Food, North Indian Food, Chinese Restaurant

साहित्य:
१ वाटी बारीक चिरलेली मेथीची देठं
१ मध्यम कांदा
अर्धी वाटी चणाडाळ
१ चमचा भरून तांदूळपिठ
१ चमचा कणिक
५-६ हिरव्या मिरच्यांची पेस्ट
३-४ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
१ चमचा जिरं
मिठ
तळणीसाठी तेल

कृती:
१) चणाडाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. नंतर अगदी थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट बनवून घ्यावी.
२) कांदा बारीक चिरावा. एका वाडग्यात मेथीची चिरलेली देठं, चिरलेला कांदा, चणाडाळ पेस्ट, चवीप्रमाणे हिरवी मिरची, तांदूळ पिठ, कणिक, जिरं, लसूण आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे. मिश्रण भज्यांची बोंडं तेलात सोडता येतील इतपत घट्ट ठेवावे.
३) कढईत तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाची बोंडं तळून घ्यावी.
चिंच गूळाच्या चटणीबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर हि भजी मस्त लागते.

टीप:
१) मेथी निवडताना ताजी व कोवळी मेथी निवडावी. यामुळे मेथीची देठं कोवळी मिळतील. खुप जून मेथी असेल तर देठातील धागे भजी खाताना तोंडात येतात.
२) आवडीनुसार तिखट कमीजास्त करावे.

चकली

Labels:
Methichi bhajji, methi Bonda, fenugreek pakoda, Methi Pakora, Methichya Dethachi Bhaji, Methi Pakoda

Wednesday, January 9, 2008

मेथीचे लाडू - Methiche Ladu

Methiche Ladu In English

साहित्य:
५० ग्राम मेथी पावडर
२ वाट्या गव्हाचे पिठ (कणिक)
१ वाटी किसलेले सुके खोबरे
१ वाटी खारीक पावडर
५० ग्राम डिंक (ऑप्शनल)
५० ग्राम खसखस (कोरडी भाजावी व पावडर करावी)
अडीच वाट्या पिठी साखर
अडीच वाट्या तूप
बेदाणा काजूतुकडा ईतर सुकामेवा (ऑप्शनल)
वेलची पूड

मेथीचे लाडू पाककृती २ - गूळ घालून मेथीचे लाडू

कृती:
१) खसखस भाजून त्याची पावडर करून घ्यावी.
२) वरील दिलेल्या तूपातील १/२ वाटी तूप गरम करावे. त्यात मेथी पावडर किमान १२-१५ तास भिजवून ठेवावी.
३) सुके खोबरे किसून भाजून घ्यावे.
४) २ वाट्या तूप कढईत घालून त्यात डिंक तळून घ्यावा. डिंक बाजूला काढून उरलेल्या तूपात गव्हाचे पिठ खमंग भाजून घ्यावे. गॅस बंद करून त्यात भिजवलेली मेथी पावडर, खारीक पावडर, खसखस पावडर, किसून भाजलेले खोबरे, वेलची पूड, सुकामेवा, तळलेला डिंक, पिठीसाखर घालून मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू वळावे.

टीप:
१) काही जणांना जास्त तूपाचे लाडू आवडतात तर कणिक भाजताना त्यात अर्धा वाटी गरम तूप वाढवावे.
२) गव्हाच्या पिठाऐवजी आवडीनुसार सोयाबिन पिठ किंवा मुगाचे पिठही वापरू शकतो.