Methichi Amti in English
वाढणी: ३ जणांसाठी
साहित्य:
१ ते दिड कप बारीक चिरलेली मेथीची पाने
१/२ ते ३/४ कप शिजवलेले घट्ट वरण (तूरडाळ)
फोडणीसाठी:
१ टेस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून लाल तिखट किंवा २-३ हिरव्या मिरच्या
४-५ कढीपत्ता पाने
१ टिस्पून गोडा मसाला
२-३ आमसुलं
१ टिस्पून गूळ
चवीनुसार मिठ
कृती:
१) कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात नेहमीप्रमाणे मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. आवडीनुसार तिखट किंवा मिरच्या घालाव्यात. कढीपत्ता पाने घालून काही सेकंद परतावे.
२) नंतर बारीक चिरलेली मेथी घालून परतावे. गॅस मध्यम ठेवून मेथी शिजू द्यावी. मेथी शिजताना कढईवर झाकण ठेवू नये. साधारण २-३ मिनीटे मेथी परतावी. नंतर त्यात शिजवलेली डाळ घालावी. गरजेनुसार पाणी घालावे. गॅस मिडीयम हायवर ठेवावा.
३) गोडा मसाला, आमसुलं घालून ढवळावे. १ उकळी आली कि मिठ आणि गूळ घालून अजून एक-दोन वेळ उकळी काढावी.
हि मेथीची आमटी, गरमगरम तूप-भाताबरोबर खावे.
टीप:
१) आंबटपणासाठी कोकमाऐवजी चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रसही वापरू शकतो.
२) गोडा मसाला नसल्यास इतर कोणताही करी मसाला वापरू शकतो.
Labels:
Methi Amati, Maharashtrian Dal, Amti recipe, Fenugreek recipe
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment