Showing posts with label Mexican. Show all posts
Showing posts with label Mexican. Show all posts

Thursday, January 22, 2009

ग्वाकामोले - Guacamole

Guacamole in English

आवोकाडो हे खुप पौष्टीक आणि चविष्ट असे फळ आहे. भारतात आवोकाडो पाहायला मिळत नाही पण अमेरीकेतील बाजारात तरी अगदी सहज available असतो. कॉर्न चिप्सबरोबर आवोकाडो डीप किंवा ग्वाकामोले संध्याकाळच्या खाण्यासाठी चांगला आणि healthy पर्याय आहे. त्याचीच ही झटपट कृती.
आवोकाडोच्या औषधी गुणधर्मांविषयी वाचण्यासाठी इथे क्लिक करा - Avocado Health Benefits.

वाढणी: २ जणांसाठी

mexican food, Tex Mex Food, Enchilada, Guacamole dip, healthy avocado, health benefits of avocadoसाहित्य:
१ पिकलेला आवोकाडो (टीप १)
१/४ कप लाल कांदा, एकदम बारीक चिरलेला
१/४ कप लालबुंद टोमॅटो, बारीक चिरून
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
२ टिस्पून लिंबू रस
१ लहान हिरवी मिरची, बारीक चिरून
किंचीत मिठ
१/८ टिस्पून मिरपूड

कृती:
१) आवोकाडोमधील गर काढून घ्यावा. एका बोलमध्ये आवोकाडोमधील गर काट्याने (Fork) मॅश करून घ्यावा. पूर्ण मॅश करू नये, किंचीत गुठळ्या राहू द्याव्यात.
२) मॅश केलेल्या आवोकाडोमध्ये लिंबाचा रस, चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आणि मिरची घालून मिक्स करावे. थोडे मिठ आणि मिरपूड घालावी.
ग्वाकामोले किंवा आवोकाडो डिप, टॉर्टीया चिप्सबरोबर खुपच छान लागतो तसेच मेक्सिकन राईस आणि इतर मेक्सिकन डिशेस बरोबर मस्त जमून जातो.

टीप:
१) कच्च्या आवोकाडोचे साल गर्द हिरवे असते, तर पिकलेल्या आवोकाडोचे साल काळपट हिरवे झालेले असते. पण आवोकाडो घेताना खुप जास्त पिकलेलाही घेऊ नये, निट तपासून घ्यावा. सर्व बाजूंनी firm असला पाहिजे. कधी कधी जास्त पिकलेला आवोकाडो आतून खराब निघतो, तसेच चवीलाही चांगला लागत नाही.
२) ग्वाकामोले जर थोडा थंड करायचा असेल तर ग्वाकामोले एका काचेच्या बोलमध्ये ठेवून त्यावर प्लास्टिक रॅप करून तासभर फ्रिजमध्ये ठेवावे म्हणजे काळपट पडणार नाही. तासाभराने थंड ग्वाकामोले, टॉर्टीया चिप्सबरोबर सर्व्ह करावे.
३) कांदा टोमॅटोचे प्रमाण आवडीनुसार कमीजास्त करावे.
४) खायच्या आधी टॉर्टीया चिप्स ओव्हनमध्ये ५ मिनीटे बेक करावे, गरम चिप्समुळे चव खुप छान लागते आणि चिप्स जास्त कुरकूरीतही लागतात.

Tuesday, December 23, 2008

मेक्सिकन राईस - Mexican Rice

Mexican Rice in English

वाढणी २ जणांसाठी

Mexican Cuisine is famous for flavorful and colorful dishes. Previously I had posted few Mexican recipes like Mexican Salad, Red Beans with Rice and Quesadilla which are little Indianised way. Today I am posting recipe of Mexican Rice which is sauteed in Pure Ghee. Because of Ghee Rice becomes more flavorful and delectable.

Mexican Rice recipes, Bean Rice, Spanish Food, Tex mex food, corn and bean rice
साहित्य:
१/२ कप तांदूळ
३ कप वेजिटेबल स्टॉक
२ टेस्पून तूप
१ टेस्पून लसूणपेस्ट
१ कप कांदा, पातळ उभा चिरून (लांबी एक इंच)
१/२ कप भोपळी मिरची, लहान चौकोनी तुकडे
१/२ टिस्पून लाल तिखट
१ मोठा किंवा २ मध्यम टॉमेटो [१/२ ते ३/४ कप Canned Chopped Tomatoes]
१/२ कप कोबी, उभी चिरून
१/२ कप पाती कांदा, बारीक चिरून
१/४ कप ड्राय रेड बिन्स [१/२ कप कॅन्ड बिन्स]
२ टेस्पून उकडलेले मक्याचे दाणे [२ टेस्पून कॅन्ड मक्याचे दाणे]
१ तमालपत्र
चवीनुसार मिठ
किसलेले चिज (ऐच्छिक)

easy mexican rice recipe, authentic mexican food, mexican red rice
कृती:
१) जर कॅनमधील बिन्स वापरणार असाल तर तुम्ही लगेच हा भात करू शकता. पण ड्राय रेड बिन्स वापरणार असाल तर ६ ते ७ तास बिन्स भिजवून ठेवाव्यात. नंतर थोडे मिठ घालून प्रेशर कूकरमध्ये मध्यम शिजवून घ्याव्यात. बिन्स अख्ख्या राहिल्या पाहिजेत.
२) तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावा. पॅनमध्ये स्टॉक गरम करावा. त्यात धुतलेले तांदूळ घालावे. थोडे मिठ आणि तेल घालून तांदूळ मोकळा शिजवून घ्यावा. भात शिजला कि गाळून घ्यावा. परातीत किंवा ताटलीत मोकळा करून गार करावा.
३) खोलगट पॅनमध्ये पाणी गरम करावे. उकळत्या पाण्यात टॉमेटो घालावे. ४५ सेकंदांनंतर गॅस बंद करावा. लगेच टॉमेटो बाहेर काढून गार पाण्यात घालावेत, यामुळे टॉमेटोची साले निघतील. ती काढून आतला गर अलगद काढून सुरीने बारीक चिरून घ्यावा.
४) नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात तमालपत्र आणि लसूणपेस्ट परतावी. लाल तिखट आणि कांदा घालून परतावे. कांदा १/२ मिनीटंच परतावा आणि लगेच भोपळी मिरची घालावी. अर्धवट शिजवावे आणि त्यात टॉमेटो घालून थोडावेळ परतावे. तमालपत्र काढून टाकावे.
५) नंतर शिजवलेल्या बिन्स आणि मक्याचे दाणे घालून १/२ ते १ मिनीट परतावे. शिजवलेला भात घालून मोठ्या आचेवर परतावे. गरजेपुरते मिठ घालावे.
६) कोबी आणि थोडा पाती कांदा घालून परतावे. सर्व्ह करताना किसलेले चिज आणि पाती कांदा घालावा.

टीप:
१) वेजिटेबल स्टॉक नसेल किंवा करायला वेळ नसेल तर तांदूळ साध्या पाण्यातही शिजवू शकतो.

Labels:
Mexican Corn and beans rice, Mexican veg Red rice, texmex food

Friday, April 18, 2008

मेक्सिकन सलाड - mexican salad

Mexican Salad (English Version)

Red Beans salad, Mexican Salad, salad recipe, Instant salad recipe, Tasty Salad Recipe, Healthy Heart recipe, healthy salad recipe, oilfree recipe, low calorie recipe, diet food recipe, diet recipes

वाढणी: साधारण दिड कप

साहित्य:
१/२ कप उकडलेले मक्याचे दाणे
१/२ कप उकडलेला राजमा/ रेड बिन्स
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप चिरलेला पाती कांदा (पातीसह)
१/४ कप बारीक चिरलेला टोमॅटो
१ बारीक चिरलेली मिरची
२ चमचे ग्रिन चिली सॉस/ हॉट पेपर सॉस
२ चमचे टोमॅटो केचप
२ चमचे लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
मूठभर टॉर्टिया चिप्सचे तुकडे (ऑप्शनल)

कृती:
१) मक्याचे दाणे, राजमाचे दाणे, कांदा, टोमॅटो एका बोलमध्ये एकत्र करून हलक्या हाताने मिक्स करावे.
२) ड्रेसिंगसाठी चिली सॉस/ हॉट पेपर सॉस, टोमॅटो केचप, लिंबाचा रस, बारीक चिरलेली मिरची आणि मिठ एका छोटया वाटीत एकत्र करावे
३) सर्व्ह करायच्या आधी चमच्याने हे ड्रेसिंग तयार सलाडवर घालून चांगले मिक्स करावे.
४) वरती मूठभर टॉर्टिया चिप्सचे तुकडे घालावे आणि सर्व्ह करावे.

Labels:
Mexican salad, Simple Mexican Salad recipe, Vegetarian Mexican Salad, bean and corn salad, salad with pepper sauce, rajma salad.

Monday, December 24, 2007

रेड बिन्स विथ राईस - Red Beans with Rice

Red Beans With Rice

मेक्सिकन पाककतींमध्ये बिन्स आणि राईसचा प्रामुख्याने वापर केला जातो. मेक्सिकन राईस आणि बिन्स बनवण्याची हि माझी पद्धत !! तेलाचा अजिबात वापर नसल्याने आणि भरपूर प्रमाणात भाज्या घातल्याने हि डिश पौष्टीक तसेच चविष्टही लागते. उसळ भाताला चेंज म्हणून हा नक्कीच चांगला पर्याय आहे.

black beans with rice, black beans recipe, mexican recipe

साहित्य:
१ कप ब्लॅक बिन्स/ रेड बिन्स
१ लसूण पाकळी
१ तमालपत्र
१ ऑल स्पाईसचा गोळा
१ मध्यम कांदा बारीक उभा चिरलेला
१ मध्यम सिमला मिरची पातळ चिरून
१ चमचा व्हिनेगर (लिंबाचा रस)
दिड वाटी तांदूळ
मिठ
सजावटीसाठी: गाजराचे तुकडे, टोमॅटोच्या गोल चकत्या

कृती:
१) १ कप ब्लॅक बिन्स कोमट पाण्यात १०-१२ तास भिजत ठेवावे. न भिजलेल्या बिया काढून टाकाव्यात.
२) कूकरमध्ये ब्लॅक बिन्स शिजवून घ्याव्यात. खुप जास्त पाणी घालू नये, प्रमाणात पाणी घालावे. शिजवताना कूकरमध्ये मिठ, २ चमचे चिरलेला कांदा, २ चमचे सिमला मिरची, ठेचलेली लसूण पाकळी, तमालपत्र, ऑल स्पाईस हे सर्व जिन्नस घालावे. ३ शिट्ट्या कराव्यात. बिन्स मऊसर शिजवाव्यात त्याचबरोबर अख्ख्या राहातील याची पण काळजी घ्यावी.
३) तांदूळ मिठ न घालता शिजवून घ्यावा.
४) बिन्स पातेल्यात काढून घ्याव्यात. त्यातील लसूण, तमालपत्र, ऑल स्पाईस काढून टाकावा. गरज असल्यात थोडे पाणी घालावे. थोडावेळ मध्यम आचेवर उकळू द्यावे. शिजलेल्या बिन्सपैकी १/४ बिन्स ठेचून घ्याव्यात ज्यामुळे भाताबरोबर खाताना थोडी घट्टपणा येईल. १ चमचा व्हिनेगर घालावे. बिन्सला हवा तेवढा घट्टपणा आला कि त्यावर कांदा, सिमला मिरची घालून गरम गरम भाताबरोबर खावे. सजावटीसाठी गाजराचे तुकडे, टोमॅटोच्या गोल चकत्या वापराव्यात.

टीप:
१) रेड किंवा ब्लॅक बिन्स उपलब्धतेनुसार वापरता येतात.
२) आवडीनुसार पाती कांदा, कोबी पातळ चिरून घालू शकतो.

चकली

Saturday, August 18, 2007

कसेडिया - Quesadilla Indian

Chakali's Version of Quesadilla

कसेडिया हा मेक्सिकन पदार्थ आहे. यामध्ये मुख्यतः चीजचा जास्त वापर केला जातो. Quesadilla हा शब्द Queso या स्पॅनिश शब्दावरून तयार झाला आहे. स्पॅनिशमध्ये Queso म्हणजे चीज.
मक्याच्या किंवा गव्हाच्या पोळ्यांमध्ये {ज्याला Tortilla असे म्हटले जाते} आवडत असलेल्या पदार्थांचे स्टफिंग करून हा पदार्थ बनवला जातो. स्टफिंग मध्ये वेगवेगळ्या भाज्या किंवा नॉन-वेजिटेरियन लोकांना खिम्याचा ही वापर करता येतो. मी हाच पदार्थ थोडा भारतीय लूक देऊन बनवला आणि मला तो खूप आवडला. त्याची कृती खालीलप्रमाणे :

पोळ्या/ चपात्या


साहित्य

तयार कसेडिया

साहित्य :
२ छोट्या चपात्या/ फुलके (भाजून)
१ छोटा कांदा
१ छोटा टोमॅटो
अर्धी भोपळी मिरची
पाती कांदा
१ हिरवी मिरची
बटर
किसलेले चीज (मेक्सिकन चीज ब्लेण्ड मिळाल्यास उत्तम)
चाट मसाला
मीठ
ग्रील करण्यासाठी सॅण्डविच टोस्टर

कृती :
१) प्रथम कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची उभी चिरून घ्यावी. पाती कांद्याची फक्त पात घेऊन ती एकदम बारीक चिरावी.
२) दोन पैकी एका पोळीला एका बाजूने थोडे बटर लावून घ्यावे, त्यावर थोडे मीठ पेरावे.
३) प्रत्येक पोळीवर चिरलेला कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची आणि पाती कांदा घालावा. हिरवी मिरची बारीक चिरून पोळीवर घालावी. वरुन चाट मसाला आणि मीठ घालावे.
४) शेवटी थोडे किसलेले चीज घालावे. दुसरी पोळी कांदा टोमॅटो घातलेल्या पोळीवर ठेवावी.
५) वरुन हलक्या हाताने थोडा दाब द्यावा. आणि टोस्टरमध्ये घालावे. कसेडीया टोस्टरमध्ये चांगला ग्रील करून घ्यावा. त्यावर थोडे बटर लावावे आणि थोडा चाट मसाला लावावा. आणि गरम गरम खावा.

टीप :
१) जर सॅण्डविच टोस्टर उपलब्ध नसेल तर कसेडीया तव्यावरही करू शकतो.
२) आवडीनुसार मश्रुम, गाजर व इतर भाज्या घालू शकतो.
३) आदल्या दिवशीच्या पोळ्या संपवण्यासाठी कसेडीया हा उत्तम पर्याय आहे.

चकली