Suralichya Vadya in English
साहित्य:
१ वाटी बेसन
१ वाटी आंबट ताक (जरा घट्ट)
१ वाटी पाणी
पाउण ते एक चमचा मिरचीचा ठेचा
१ लहान चमचा हळद
१/२ लहान चमचा हिंग
फोडणीसाठी : २-३ चमचे तेल, मोहोरी, चिमूटभर हिंग, थोडीशी हळद, कढीपत्ता
खवलेला नारळ
वरून पेरायला थोडे लाल तिखट
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ
मिश्रण पसरवण्यासाठी कालथा
तेलाचा हात लावून जाड प्लास्टिकची लांब शिट
कृती:
१) बेसन, ताक, पाणी एकत्र करावे. बेसनाच्या गुठळ्या न होता मिश्रण भिजवावे. त्यात मिरचीचा ठेचा, हळद आणि हिंग घालावे. चवीपुरते मीठ घालावे. सर्व मिश्रण एकदम स्मूद करून घ्यावे.
२) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये सर्व मिश्रण घालावे. मध्यम आचेवर मिश्रण शिजेपर्यंत ढवळत राहावे, जर ढवळायचे थांबवले तर गुठळ्या होण्याची शक्यता असते.
३) मिश्रण दाटसर झाले कि प्लास्टिक शिटला थोडासा तेलाचा हात लावावा. जास्त तेल लावू नये नाहीतर मिश्रण निट पसरणार नाही.
४) मिश्रण किंचीत थंड होवू देवू नये. लगेच कालथ्याने मिश्रणाचा पातळ थर प्लास्टिक शिटवर पसरावा.(फोटो) थोडे थंड होवू द्यावे.
५) कढल्यात तेल गरम करावे त्यात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. आणि मिश्रणाच्या पातळ थरावर चमच्याने फोडणी पसरावी. म्हणजे फोडणी नीट पसरली जाते.
६) त्यावर खवलेला नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी. थोडे लाल तिखट पेरावे. नंतर सुरीने ५ इंच पट्ट्या कापाव्यात. त्याची सुरळी (गुंडाळी)करावी आणि मग त्या सुरळीचे ३-४ भाग करावेत.
७) सर्व्ह करताना सुरळीच्या वड्यांवर थोडी कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालावा.
८) सुरळ्या करायच्या आधी मिश्रणाच्या थरावर फोडणी घातली असल्याने वरून फोडणीची आवश्यकता नाही. पण जर आवडत असल्यास वरूनही थोडी फोडणी देऊ शकतो.
सुरळी वडी - मायक्रोवेव्ह पद्धत
टीप:
१) मिश्रणाचा पातळ थर करण्यासाठी स्टीलची ताटेसुद्धा वापरू शकतो पण त्यामुळे खुप ताटे वापरली जातात.
२) जर फोडणी फक्त वड्यांवर आवडत असेल तर आपल्या आवडीनुसार सुरळ्या केल्यानंतर त्यावर फोडणी घालावी.
Labels:
Suralichya Vadya, Suaralichya Wadya, Surali Vadi, Gujarati Snacks, Indian Snack, Salty Snack
Wednesday, January 23, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment