Mushroom Kadhai (English Version)
Serves : 2 to 3 persons
साहित्य:
२०० ग्राम मश्रुम
२ मध्यम कांदे (१ बारीक चिरणे, १ मोठ्या चौकोनी फोडी करणे)
१ लहान भोपळी मिरची
२ मध्यम टोमॅटो
२ चमचे आले लसूण पेस्ट
२ चमचे लाल तिखट
धणे पूड
जिरे पूड
गरम मसाला पावडर
तेल
मीठ
मिरपूड
कोथिंबीर
कृती:
१) १ कांदा बारीक चिरून घ्यावा. ३-४ चमचे तेलावर परतून घ्यावा. कांदा परतला कि त्यात त्यात आलेलसूण पेस्ट घालावी.
२) आले लसणीचा छान गंध सुटला कि त्यात लाल तिखट घालावे. ढवळून बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. मिडीयम हाय हिटवर टोमॅटो शिजू द्यावा. थोडे पाणी घालून ढवळत राहावे ज्यामुळे मिश्रण एकजीव होईल. मिश्रण खुप पातळ करू नये.
३) टोमॅटो शिजला कि त्यात १ चमचा धणेपूड १ चमचा जिरे पूड, १ चमचा गरम मसाला पावडर, २ चिमटी मिरपूड, चवीपुरते मिठ घालून ढवळावे. १ उकळी काढावी. ३-४ मिनीटांनी गॅस बंद करावा.
४) मश्रुम चिरून घ्यावा. प्रत्येक मश्रुम अधिक चिन्हात चिरून चार चार तुकडे करावे. १ कांद्याच्या आणि भोपळी मिरचीच्या मोठ्या चौकोनी फोडी कराव्यात.
५) मश्रुमचे तुकडे तेल न वापरता फ्राईंग पॅनमध्ये थोडे मिठ घालून १/२ ते १ मिनीट परतून घ्यावेत.
६) दुसर्या कढईत ग्रेव्ही घ्यावी. कांदा भोपळी मिरचीचे मोठे तुकडे ग्रेव्हीत घालावेत. १-२ मिनीटानंतर मश्रुमचे तुकडे, गरज असल्यास मिठ आणि थोडी धणे-जिरेपूड घालावी. वरून कोथिंबीर पेरावी.
Labels:
Mushroom kadhai, Kadai recipe, North Indian Food, Indian Spicy Curry recipe, Mushroom Curry recipe
Monday, January 21, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment