Wednesday, January 9, 2008

मेथीचे लाडू - Methiche Ladu

Methiche Ladu In English

साहित्य:
५० ग्राम मेथी पावडर
२ वाट्या गव्हाचे पिठ (कणिक)
१ वाटी किसलेले सुके खोबरे
१ वाटी खारीक पावडर
५० ग्राम डिंक (ऑप्शनल)
५० ग्राम खसखस (कोरडी भाजावी व पावडर करावी)
अडीच वाट्या पिठी साखर
अडीच वाट्या तूप
बेदाणा काजूतुकडा ईतर सुकामेवा (ऑप्शनल)
वेलची पूड

मेथीचे लाडू पाककृती २ - गूळ घालून मेथीचे लाडू

कृती:
१) खसखस भाजून त्याची पावडर करून घ्यावी.
२) वरील दिलेल्या तूपातील १/२ वाटी तूप गरम करावे. त्यात मेथी पावडर किमान १२-१५ तास भिजवून ठेवावी.
३) सुके खोबरे किसून भाजून घ्यावे.
४) २ वाट्या तूप कढईत घालून त्यात डिंक तळून घ्यावा. डिंक बाजूला काढून उरलेल्या तूपात गव्हाचे पिठ खमंग भाजून घ्यावे. गॅस बंद करून त्यात भिजवलेली मेथी पावडर, खारीक पावडर, खसखस पावडर, किसून भाजलेले खोबरे, वेलची पूड, सुकामेवा, तळलेला डिंक, पिठीसाखर घालून मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू वळावे.

टीप:
१) काही जणांना जास्त तूपाचे लाडू आवडतात तर कणिक भाजताना त्यात अर्धा वाटी गरम तूप वाढवावे.
२) गव्हाच्या पिठाऐवजी आवडीनुसार सोयाबिन पिठ किंवा मुगाचे पिठही वापरू शकतो.

No comments:

Post a Comment