Chatani Vadi (English Version)
आपण पुरीसाठी जे पिठ भिजवतो त्यातील उरलेल्या पिठाचे काय करायचे हा प्रश्न असतो. त्यासाठी चटणी वडीची हि कृती. जेवताना तोंडीलावणी म्हणू छान लागतात.
साहित्य:
४-५ मिरच्या
पाउण वाटी कोथिंबीर
१ चमचा जिरं
१ चमचा किसलेले सुके खोबरे
पुरीच्या पिठाचे प्रमाण:
जर १ मोठी वाटी गव्हाचे पिठ असेल तर
पाउण चमचा बेसन
१ चमचा रवा
चवीपुरते मीठ
२ चमचे तेल
कृती:
१) पुरीचे पिठ भिजवताना गव्हाच्या पिठाला गरम तेलाचे मोहन घालावे, बेसन रवा मीठ घालून घट्ट मळून घ्यावे.
२) मिरच्या, कोथिंबीर, जिरे, सुके खोबरे, मीठ एकत्र वाटून घ्यावे. जर आवडत असल्यास १ चमचा तिळ घालावेत. वाटण १/२ चमचा तेलावर थोडे परतून घ्यावे.
३) पुर्या करून झाल्या कि उरलेल्या पिठाची पोळी लाटून घ्यावी. पूर्ण पोळीवर तयार केलेली कोथिंबीर मिरचीची चटणी पसरवावी. घट्ट रोल करावा.
४) रोल तयार झाला कि रोलच्या दोन्ही बाजू एकमेकांना घट्ट चिकटवून घ्याव्यात (फोटो). असे केल्याने तळताना सारण बाहेर येणार नाही.
५) मध्यम आचेवर हा रोल गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळून घ्यावा. नंतर सुरीने वड्या पाडाव्यात.
जेवताना तोंडी लावायला किंवा नुसत्या खायलासुध्दा या वड्या छान लागतात.
टीप:
१) या वड्या गरमच खायच्या असतात. आतील चटणी ओलसर असल्याने थंड झाल्यावर या वड्या थोड्या नरम पडतात.
२) या वड्यांच्या सारणात १ चमचा बेसन भाजून घातले तर आतल्या सारणातला ओलसरपणा कमी होतो.
Labels:
Chutney wadi, spicy chutney wadi, spicy rolls Maharashtrian vadi recipe, spicy chutney roll recipe
Description:
Chutney Wadi recipe is a quick simple 30 minute version of famous, delicous "Bakarwadi". It is a great recipe if you have leftover chutney and chapati(Indian bread) dough. This is fried version, hence high in fat/calories and certainly not suitable for low fat low cholestrol diet plan. But baking in Oven can provide low fat variation of this spicy fiery indian fast food.Serve with sweet fresh chat chutney, which brings out seasoning and spice of Chutney Wadi.
Wednesday, January 30, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment