Monday, January 28, 2008

चुरमुर्याचे लाडू - Churmura ladu

churamuryache Ladu (English Version)

चुरमुर्याचे लाडू करायला अतिशय सोपे, झटपट होणारे आणि चवीलाही मस्त लागतात.

kurmuryache laadu, ladu recipe, churmuryache ladu
साहित्य:
५ ते साडे पाच वाट्या चुरमुरे
१ वाटी चिक्कीचा गूळ

कृती:
१) पातेल्यात चिक्कीच्या गूळ घालावा. गूळाचा पाक होवून उकळायला लागला कि लगेच त्यात चुरमुरे घालून ढवळावे.
२) मिश्रण गरम असतानाच लाडू वळावेत.

टीप:
१) साध्या गुळाचेसुद्धा लाडू चांगले होतात पण चिक्कीच्या गुळाचा खमंगपणा त्यांना येत नाही.
२) साध्या गुळाचे जर लाडू बनवले तर १ वाटी गूळाला ३ ते साडेतीन वाट्या चुरमुरे घ्यावे.
३) साध्या किंवा भडंगाच्या चुरमुर्याचे लाडू चवीला सारखेच लागतात पण साध्या चुरमुर्यापेक्षा भडंगाच्या चुरमुर्याचे लाडू दिसायला आकर्षक असतो.
४) आवडत असल्यात भाजलेल्या शेंगदाण्याचे तुकडे, थोडे डाळं घालू शकतो.

Labels:
Laddu recipe, Maharashtrian Laddu, Indian Laddu recipe, Laddu recipe, Indian Sweets Laddu recipe

No comments:

Post a Comment