Showing posts with label Corn. Show all posts
Showing posts with label Corn. Show all posts

Thursday, January 29, 2009

कॉर्न अँड पनीर टोस्ट - Corn Paneer Toast

Corn Paneer Toast in English

वाढणी: ४ ते ५ ब्रेड

corn toast, paneer recipe, quick snack, healthy corn snackसाहित्य:
३/४ कप मक्याचे दाणे (उकडलेले)
१/४ कप पनीर (छोटे तुकडे)
४ व्हाईट ब्रेड स्लाईस
१ टिस्पून बटर
१/४ कप + २ टेस्पून दुध
१ हिरवी मिरची बारीक चिरून
१/२ टिस्पून कॉर्न फ्लोअर
आवडीनुसार किसलेले चिज
चवीनुसार मिरपूड आणि मिठ

कृती:
१) पॅन गरम करून त्यात बटर घालावे. बटर वितळले कि त्यात हिरवी मिरची घालावी. उकडलेले मक्याचे दाणे थोडावेळ परतून घ्यावे.
२) नंतर परतलेले मक्याचे दाणे बाजूला काढून ठेवावे. नंतर त्याच पॅनमध्ये पाव कप दुध घालून ढवळावे. गॅस मंद करून ठेवावा. २ टेस्पून गार दुधात थोडे कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावे व गरम दुधात घालावे. मध्यम आचेवर उकळू द्यावे, हळूहळू घट्टसर सॉस तयार होईल. सॉस घट्ट होताना ढवळत राहावे, गुठळी राहू देवू नये. यात परतलेले मक्याचे दाणे घालावेत व पनीर घालावे, निट मिक्स करावेत. गॅस बंद करून या मिश्रणात थोडे मिठ घालावे.
३) ओव्हन ३५० F वर प्रिहीट करावे.
४) ब्रेड स्लाईसवर मक्याचे तयार मिश्रण लावावे. वरून आवडीनुसार चिज घालावे. ५ मिनीटे बेक करावे. ब्रेडवरील चिज वितळले आणि ब्रेड जरा क्रिस्पी झाला कि बाहेर काढावे. थोडे मिठ-मिरपूड भुरभूरवावी. टॉमेटो सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करावे. हे टोस्ट हिरव्या चटणीबरोबरही खुप छान लागतो.

Labels:
Corn Toast, Corn Recipes, Corn Snacks

Tuesday, April 1, 2008

कॉर्न अँड पाइनॅपल सलाड - Corn Pineapple Salad

Corn & Pineapple Salad (English Version)

Colorful and Delicious

मक्याचे हे सलाड चवीला छानच लागते ! आणि अननसाबरोबर याची चव तर अधिकच वाढते. तसेच करायलाही अगदी सोपे आहे. नक्की करून बघा हे सलाड आणि कळवा कसे झाले होते ते !!

corn salad, pineapple salad, salad recipes, healthy heart recipe, corn, pineapple, Fruit salad, salads, heart healthy recipes, easy recipe, easy salad recipes
वाढणी: साधारण दिड कप

साहित्य:
१ कप स्विट कॉर्न
१/४ कप हिरवी भोपळी मिरची, कॉर्न एवढ्या आकारात चौकोनी चिरलेली
१/४ कप लाल भोपळी मिरची, कॉर्न एवढ्या आकारात चौकोनी चिरलेली
२ अननसाचे काप, चौकोनी चिरलेले
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा लिंबाचा रस
२ चमचे अननसाचा रस
सजावटीसाठी कोथिंबीर
चवीपुरते मिठ
चवीपुरती मिरपूड

कृती:
१) पटकन सलाड बनवण्यासाठी कॅनमधील स्विट कॉर्न वापरावा. वापरण्यापुर्वी कॉर्न एकदा पाण्याखाली धुवून घ्यावे. जर कणीस आणून त्याचे दाणे वापरणार असाल तर पाण्यात थोडे मिठ घालून दाणे शिजवून घ्यावेत. नंतर त्यातील पाणी काढून थंड होवू द्यावेत.
२) हिरवी आणि लाल भोपळी मिरची कॉर्नच्याच साईजची चिरून घ्यावी.
३) अननसाचे १ इंचाचे तुकडे कापून घ्यावे.
४) हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घ्यावी.
५) चिरलेली भोपळी मिरची, अननस, कॉर्न एकत्र करावे त्यात लिंबाचा रस , अननसाचा रस, मिठ, मिरची घालून निट मिक्स करावे.
६) सर्व्ह करायच्या आधी फ़्रेश मिरपूड वरती भुरभुरावी. आणि कोथिंबीरीने सजवावे.

Labels:
Corn Salad, Pineapple Salad, Corn, Pineapple, Salad Recipe, Corn recipes,Heart Healthy Recipe, Diet Food, Diet Recipe, easy recipe, easy salad recipe, Low fat recipe, fat free diet recipe, fat free diet recipe

Thursday, July 26, 2007

मशरूम आणि कॉर्न सूप - Mushroom Corn Soup

Mushroom & Corn Soup in English

mashroom reciepe,Mushroom recipe, mushroom corn, sweet corn soup, mushroom soup, mushroom milk recipe, marathi recipe, maharashtrian,sweet corn
साहित्य:
१/२ कप मशरूम उभे चिरून
३/४ कप स्विट कॉर्न (boiled & mashed)
१/२ कप कांदा बरीक उभा चिरून
१ हिरवी मिरची
मिरपूड
१ तमालपत्र
१ All Spice सीड (लवंग, दालचिनी आणि जायफळ याचे Combination)
गार्लिक पावडर किंवा १/४ चमचा लसूण पेस्ट
३ टेबलस्पून दूध
१/२ कप पाणी
१/२ चमचा बटर
चवीपुरते मीठ

कृती:
१) मध्यम आचेवर पातेल्यात बटर घालावे. बटर वितळल्यावर त्यात All Spice आणि तमालपत्र घालावे. थोडेसे परतून त्यात कांदा घालावा.
२) कांदा परतल्यावर त्यात मशरूम घालावे. दोन तीन मिनिटे परतून त्यात स्विट कॉर्न घालावे आणि १/२ कप पाणी घालून एक उकळी काढावी. नंतर त्यातील All Spice आणि तमालपत्र काढून टाकावे. नाहितर सूप उग्र होते.
३) मीठ आणि गार्लिक पावडर घालून उकळी काढावी. मंद गॅसवर ढवळत असताना दूध घालावे. १ मिनीटानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घालावी. सर्व्ह करताना वरून चिमूटभर मिरपूड घालावी.

Labels:
Mushroom Corn Soup, Hot Corn soup recipe