Tomato Soup (English Version)
साहित्य:
१/२ किलो टोमॅटो
१ चमचा तांदूळ पिठ
२ तमालपत्र
१ लहान चमचा जिरं
१/२ चमचा जिरपूड
१ चमचा तिखट
१ चमचा तूप
हिंग
दिड चमचा साखर
चवीपुरते मिठ
कोथिंबीर
कृती:
१) टोमॅटो कूकरमध्ये शिजवून घ्यावेत(कूकरमध्ये ३ शिट्ट्या कराव्यात). थंड झाले कि त्याची साले काढावीत.
२) तांदूळ पिठ १/२ वाटी पाण्यात गुठळ्या न होत्या कालवून घ्यावे.
३) थंड झालेल्या टोमॅटोचा देठाकडचा भाग काढून टोमॅटो मिक्सरमध्ये घालावेत त्यातच कालवलेले तांदूळपिठ, तिखट, साखर, मीठ घालावे, आणि सर्व एकत्र करून मिक्सरवर वाटून घ्यावे. हे करताना जास्तीचे पाणी घालू नये. मिश्रण मिक्सरवर फिरवल्यावर आवश्यक तेवढे पाणी घालावे.
४) ही टोमॅटोची पातळसर प्युरी चाळणीवर गाळून घ्यावी, म्हणजे टोमॅटो सूपमध्ये कसल्याच गुठळ्या, बिया राहणार नाहीत. गाळलेल्या रसात १/२ चमचा जिरपूड, २ तमालपत्र घालावे. गाळलेले मिश्रण उकळण्यासाठी पातेल्यात काढून घ्यावा.
५) लहान कढल्यात / लोखंडी पळीत १ चमचा तूप गरम करावे. जिरे, हिंग घालून फोडणी करावी. वरून टोमॅटो सूपला फोडणी द्यावी आणि थोडावेळ उकळावे. कोथिंबीर घालावी.
टीप:
१) टोमॅटो कूकरमध्ये शिजवताना थोडे जिरे घातल्यास जिर्याचा वास छान लागतो.
२) तमालपत्र फक्त उकळताना घातल्यास तमालपत्राचा उग्रपणा सूपाला लागणार नाही. जर तमालपत्र फोडणीत घातले तर त्याचा वास वरचढ होतो.
३) आवडत असल्यास वरून थोडे क्रिम घालू शकतो.
४) तांदूळपिठाऐवजी कॉर्न फ्लोरही वापरू शकतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment