Wednesday, February 27, 2008

मूग डाळीचे लाडू - Moogdal ladu

Moog Dal Ladu

साहित्य:
२ वाट्या रवाळ मूग डाळ पिठ (पिवळी मूगडाळ)
(मूग डाळ किंचीत जाडसर दळून आणायची)
१ वाटी तूप
१ वाटी पिठीसाखर
१/२ वाटी दूध
१ लहान चमचा वेलचीपूड
आवडीनुसार बेदाणे बदाम,पिस्ता यांचे काप

कृती:
१) मूगडाळ जराशी रवाळ दळून आणायची. १ वाटी तूप पातेल्यात गरम करायचे. त्यात २ वाट्या मूगडाळीचे पिठ मध्यम आचेवर खमंग भाजायचे.
२) पिठाचा रंग बदलला आणि खमंग भाजले गेले कि त्यावर १/२ वाटी दूधाचा हबका मारावा व ढवळावे. गॅस बंद करून पातेले खाली उतरवावे.
३) भाजलेले पिठ कोमटसर झाले कि त्यात १ वाटी पिठी साखर घालावी. बर्याचदा मिक्स करताना पिठी साखरेची गोळी होते त्याची निट काळजी घ्यावी. निट मिक्स करावे. वेलची पूड, सुकामेवा घालावा व लाडू वळावे.

टीप:
१) जर लाडू अजून पौष्टीक हवे असतील तर मूगडाळ सालीसकट दळावी.
२) या लाडवांसाठी आपण हिरवी किंवा पिवळी कोणतीही मूगडाळ वापरू शकतो.

चकली

No comments:

Post a Comment