Wednesday, February 20, 2008

रगडा पॅटीस - Ragda Pattis

Ragada Patties (English Version)

Indian chat, chat recipe, yummy chat, mumbai street food, hot and spicy snacks, potato crispies, fried potato and beans,ragda pattice recipe, ragada patties recipe, chat items recipe

माझ्या आवडत्या चाट items पैकी रगडा पॅटीस एक आहे. रगडा पॅटीस वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. बाहेरच्या रगड्यामध्ये बर्याचदा फक्त मिठ आणि हळद असते. हि जरा वेगळी आणि चविष्ठ कृती आहे.

साहित्य:
पॅटीसचे साहित्य:
१/२ किलो बटाटे (टीप २ आणि ३)
१ लहान चमचा हळद
चवीपुरते मिठ
रगडा साहित्य:
१ ते सव्वा वाटी पांढरे वाटाणे
फोडणीसाठी २ चमचे तेल, हिंग, हळद, १-२ चमचे लाल तिखट, मीठ, ओलं खोबरं, २-३ आमसुल
आवश्यक तेवढे पाणी
चिंचगूळ चटणी साहित्य: इथे क्लिक करा
हिरवी चटणी साहित्य: इथे क्लिक करा
वरून पेरण्यासाठी:
२ मध्यम कांदे बारीक चिरलेले
बारीक पिवळी शेव
चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) पांढरे वाटाणे ७-८ तास भिजवून कूकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावे.
२) चिंच गूळ चटणी आणि हिरवी चटणी:
इथे क्लिक करा

३) रगडा:
पातेल्यात २-३ चमचे तेल गरम करावे, त्यात हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात शिजवलेले वाटाणे घालावे. १ मिनीट परतून त्यात आवश्यक तेवढे पाणी घालावे. ओलं खोबरं, मीठ, आमसुल घालावे १ उकळी काढावी.
४)पॅटीस:
बटाटे शिजवून घ्यावेत. साले काढून मळून घ्यावेत. त्यात हळद आणि थोडे मिठ घालून मळून घ्यावेत. गुठळी राहू देवू नये. त्याचे २ इंचाचे गोळे करून घ्यावे. किंचीत चपटे करावेत. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २-३ चमचे तेल पसरवावे व त्यावर हे पॅटीस मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राउन करून घ्यावे.
आता सर्व पदार्थ तयार झालेत तेव्हा हे पदार्थ वाढण्याचा क्रम खालील प्रमाणे :
ताटलीत प्रथम ४-५ पॅटीस ठेवावेत. त्यावर रगडा, चिंचगूळ चटणी, हिरवी चटणी, कांदा, शेव व कोथिंबीर घालावी.
गरम गरम रगडा पॅटीसवर ताव मारावा!!

टीप:
१) विकतच्या रगडा पॅटीसमध्ये रगड्याला फोडणी घातलेली नसते. पण वरील कृतीप्रमाणे रगडा करून पाहा, चव खुप छान लागते.
२) बटाटे गरम असतानाच मळून घ्यावे. तसेच किसण्याऐवजी हातानेच मळावेत.
३) बटाटे निवडताना नवीन बटाटा वापरू नये. तसेच 'Red Potato' वापरू नये. 'Red Potato' मुळे पॅटीस चिकट होतात आणि गरम तव्यावर भाजताना एकदम बसके होतात. पॅटीससाठी ’Russet Potato' वापरावेत.

Labels:
Ragda Pattice, Ragada patties recipe, Mumbai Street food, Chat Items

No comments:

Post a Comment