Monday, February 11, 2008

फोडणी भात - Phodni Bhat

Phodani Bhat (English Version)

बरेचवेळा भात उरला कि आपण त्याचा फोडणीभात बनवतो. एखादा पदार्थ नेहमीच्या पद्धतीने न बनवता थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली तर खायलासुद्धा मजा येते. खाली दिलेली कृती फोडणीभाताचीच आहे पण थोडी वेगळी आणि सर्वांनाच आवडेल अशी आहे.

phodani bhaat recipe, phodni bhat recipe, fried rice, instant vegetable rice, leftover rice recipe, veggie rice, spicy rice recipe, marathi rice recipe, marathi fried rice, high carb white rice
साहित्य:
२-३ वाट्या मोकळा भात
१/२ वाटी गाजराचे तुकडे
१ वाटी मटार
१ लहान भोपळी मिरची उभी चिरून
१/४ वाटी फरसबी
३-४ लाल सुक्या मिरच्या
३-४ चमचे तेल
१/२ लहान चमचा हिंग,१ लहान चमचा जिरे
कढीपत्ता
२ चमचे लिंबाचा रस
थोडी चिरलेली कोथिंबीर
मीठ

कृती:
१) आदल्या दिवशीचा भात असेल तर तो मोकळा करून घ्यावा.
२) सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. कढईत / नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करावे. हिंग जिरे कढीपत्ता घालून फोडणी करावी. लाल मिरच्यांमधल्या बिया नको असतील तर मिरच्या तोडून त्यातील बिया काढाव्यात. मिरच्या फोडणीत घालाव्यात.
३) फोडणीत आधी मटार आणि फरसबी थोडी परतून २ मिनीटे वाफ काढावी. नंतर भोपळी मिरची आणि गाजराचे बारीक तुकडे घालून वाफ काढावी. भाज्या अर्धवटच शिजवाव्यात, खुप शिजू देवू नयेत. भाज्या शिजताना थोडे मिठ घालावे.
४) नंतर त्यात मोकळा भात घालावा. थोडा परतून वाफ काढावी. लिंबाचा रस घालावा भाज्या शिजताना थोडे मिठ घातलेलेच आहे त्यामुळे आवश्यक असल्यासच मिठ घालावे. कोथिंबीर घालावी
हा भात गरम गरम खायला छान लागतो.

टीप:
१) बर्याचजणांना फोडणी भातात लसणीची चव आवडते तेव्हा फोडणी करताना त्यात १-२ लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात.
२) आवडीनुसार भाज्या घालू शकतो.
३) या भाताच्या फोडणीत थोडे आले ठेचून घातले तरी छान चव येते.

Labels:
Leftover rice recipe, healthy rice recipe, rice and vegetables, fried rice and veggies, Fried Rice, Leftover Rice, Fried Leftover Rice, Phodanicha bhat, phodni bhat

No comments:

Post a Comment