Friday, February 8, 2008

पालक पनीर - Palak Paneer

Palak Paneer in English

२ ते ३ जणांसाठी
वेळ: ४० मिनीटे

Palak Paneer, Paneer recipe, Spinach Paneer curry, Spinach Curry recipe, Indian Paneer, Indian Palak paneer, Gain weight, weight loss, healthy recipeसाहित्य:
४०० ग्राम पालक (साधारण २ जुड्या) (खुडलेला)
१५० ग्राम ताजे पनीर
१/२ कप कांदा, बारीक चिरलेला
१ मध्यम टोमॅटो
१/२ टिस्पून जिरे
१ टिस्पून लसूण पेस्ट
१/२ टिस्पून आले पेस्ट
२-३ हिरव्या मिरच्या, कुटून
१/२ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून कसूरी मेथी
खडा गरम मसाला (१ वेलची, १ तमालपत्र, २ लवंगा, १ लहान काडी दालचिनी).
३ टेस्पून तेल
मीठ चवीनुसार

कृती:
१) पालक धुवून त्याची पाने खुडून घ्यावी. एका पातेल्यात पाणी करत ठेवावे. पाणी गरम झाले त्यात पालक घालून झाकण न ठेवता उकळी काढावी.२-३ मिनीटांनी सर्व पाणी काढून पालक थोडा थंड होवू द्यावा. थंड झाला कि मिक्सरवर पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्यावी.
२) टोमॅटो ब्लांच करून घ्यावा. त्यासाठी पातेल्यात टोमॅटो बुडेल इतपत पाणी गरम करावे. टोमॅटोला हलकेच सालाला चिर द्यावी सोलताना सोपे जाते. पाणी उकळले कि त्यात टोमॅटो २ मिनीटे शिजू द्यावा. नंतर लगेच थंड पाण्यात घालावा यामुळे साल निघायला मदत होईल. साल काढून आतल्या भागाची प्युरी करावी.
३) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २ टेस्पून चमचे तेल गरम करावे. खडा गरम मसाला घालावा. १/२ मिनीट फ्राय करून जिरे घालावे. बारीक चिरलेला कांदा घालून गोल्डन ब्राउन होईस्तोवर परतावे. नंतर आलेलसूण पेस्ट घालावी. आलेलसणीचा छान वास सुटला कि टोमॅटो घालून परतावे. टोमॅटो प्युरी घालून त्याचा कच्चट वास जाईस्तोवर परतावे.
४) त्यात धणेजिरेपूड, कसूरी मेथी घालावी. त्यात पालकाची पेस्ट, मिठ आणि मिरचीची पेस्ट घालावी. मध्यम आचेवर ५ मिनीटे शिजू द्यावे.
५) मिश्रण चांगले मिळून आले कि त्यात पालकाची पेस्ट घालावी. १ उकळी काढून पनीरचे तुकडे घालावेत. १-२ मिनीटानंतर गॅस बंद करावा. गरमागरम सर्व्ह करावे.

टीप:
१) आवडत असल्यास पालक पनीर तयार झाल्यावर त्यात १/२ वाटी क्रिम घालू शकतो.
२) जर पनीर ताजे नसेल तर आधी डीप फ्राय करून घ्यावे.

Labels:
Palak Paneer, Spinach Recipe,Spinach Curry, North Indian Palak Paneer

No comments:

Post a Comment