Spring Roll Dipping Sauce (English Version)
वाढणी: साधारण एक वाटी
साहित्य:
३ चमचे तेल
४ लसणीच्या पाकळ्या
१ लहान चमचा साखर
थोडे पाणी वाटण बनवण्यासाठी
१ लहान चमचा व्हिनेगर
१ चमचा सोयासॉस
१/२ कप टोमॅटो पेस्ट
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप बारीक चिरलेला पाती कांदा
१ लहान चमचा आले पेस्ट
४-५ लाल सुक्या मिरच्या
चवीपुरते मिठ
फ्रेश मिरपूड
गरजेनुसार लाल तिखट
स्प्रिंग रोलची कृती
कृती:
१) टोमॅटो पेस्ट, लाल मिरच्या, चिरलेल्यातील अर्धा कांदा, आले पेस्ट, लसणीच्या पाकळ्या हे सर्व साहित्य एकत्र करावे. शक्यतो कॅनमधील टोमॅटो पेस्ट किंवा बाजारातील रेडीमेड पेस्ट वापरावी. घरगुती बनवलेल्या पेस्टमुळे डिपींग सॉसला हवा तसा रंग आणि चव येत नाही. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक करून घ्यावे. मिश्रण घट्टसरच हवे आहे त्यामुळे अगदी बेताचे पाणी घालावे.
२) कढईत तेल तापवावे, बाकी राहिलेला कांदा आणि पाती कांदा घालावा. आपण हा कांदा शिजवणार नाही आहोत ज्यामुळे सॉसमध्ये कांद्याचा आवश्यक असा करकरीतपणा राहील.
३) लगेच सोयासॉस घाला. त्यावर साखर घालावी. ३-४ सेकंद परतून लगेच तयार लाल पेस्ट घालावी. या पेस्टला तेल सुटेपर्यंत परतावे (साधारण १ ते २ मिनीटे).
४) पेस्टला तेल सुटले कि त्यात व्हिनेगर घालावे आणि गॅस बंद करावा.
५) सॉसची चव बघावी. हा सॉस चांगला झणझणीत आणि तिखट असावा. आवश्यकतेनुसार मिठ, व्हिनेगर आणि लाल तिखट घालावे. थोडी मिरपूड घालावी आणि मिक्स करावे.
Labels:
Spring roll dipping sauce, recipe for dipping sauce, Asian dipping sauce, hot dipping sauce recipe, hot and spicy sauce, homemade dipping sauce
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment