
लग्नात जेवणाच्या पंगतीत हमखास चाखायला मिळणारा पदार्थ म्हणजे "पंचामृत". खुपच चविष्ठ असा हा पदार्थ बनवायला सोपा आहे.
वाढणी : साधारण १ कप
साहित्य:
१/४ कप चिंच
१/२ कप सुकया खोबर्याचे पातळ काप
१/४ कप भाजलेल्या तीळाचा कूट
१/४ कप भाजलेले शेंगदाणे
७-८ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
१/४ कप मनुका, बेदाणे, काजू
२-३ टेस्पून किसलेला गूळ
२-३ टिस्पून गोडा मसाला (काळा मसाला)
२ टिस्पून तेल
चिमूटभर हिंग
१/२ टिस्पून हळद
कृती:
१)चिंचेचा घट्ट कोळ करून घ्यावा (साधारण एक वाटी).
२)पातेल्यात तेल तापवावे. त्यात हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी.त्यात खोबर्याचे काप परतून घ्यावे. चिंचेचा कोळ घालावा. एक उकळी आल्यावर त्यात गोडा मसाला, शेंगदाणे, बेदाणे, मनुका, काजू घालावे.
३)थोडे पाणी घालावे. तिळाचा कूट घालावा. गूळ घालून थोडे आटवावे.
टीप:
१)पंचामृत हवाबंद काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ७-८ दिवस टिकते.
Labels:
Panchamrut, panchamrit recipe, chutney recipe, panchamrut recipe, maharashtrian panchamrut chutney, chatani
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment