व्हेजी रॅप्स म्हणजे माझा आवडता आणि पौष्टीक असा मधल्या वेळी खायचा पदार्थ !!! हे व्हेजी रॅप्स चविष्ट आणि तेलविरहित (oil Free) तर आहेतच पण पटकन होणारे सुद्धा आहेत.. जरूर करून बघा.
साहित्य:
२ गव्हाच्या पोळया (चपात्या)
१ लहान कांदा उभा बारीक चिरून
३ काड्या पाती कांदा बारीक चिरून
१ लहान टोमॅटो बारीक चिरून
१ लहान सोललेली काकडी
अर्धी वाटी भोपळी मिरची
अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
अर्धी वाटी चिरलेली पुदीन्याची पाने
२ वाट्या घट्ट दही (घोटलेले) (NonFat Yogurt)
१ चमचा लिंबाचा रस
१ हिरवी मिरची
२ चिमटी मिरपूड
१ चिमूटभर चाटमसाला (ऑप्शनल)
मीठ
कृती:
१) प्रथम कांदा तेल न घालता फ्राईंग पॅनमध्ये परतून घ्यावा. जरा रंग बदलला कि बाजूला काढून ठेवावा. काकडी सोलून गोल चकत्या कराव्यात. भोपळी मिरचीचे अगदी बारीक तुकडे करावेत.
२) घोटलेल्या घट्ट दह्यात मिरपूड, कोथिंबीर, पुदीना, लिंबाचा रस, मिरच्या, मिठ, घालून ढवळून घ्यावे.
३) तयार पोळ्या तव्यावर गरम कराव्यात. ताटलीमध्ये काढून त्यावर प्रथम दह्याचे तयार केलेले मिश्रण चमच्याने पसरावे, त्यावर सर्व भाज्या घालाव्यात. वरून थोडे मिठ पेरावे. हवा असल्यास चाट मसाला घालावा आणि गुंडाळी करून गरम गरम खावे.
टीप:
१) शक्यतो पोळ्या आकाराने लहान असाव्यात. जर आकार मोठा असेल तर व्हेजी रॅप्स मधून कट करावा.
२) जर आदल्या दिवशीच्या पोळ्या उरल्या असतील तर त्या संपवण्यासाठी व्हेजी रॅप्स हा चांगला पर्याय आहे.
३) वरील दिलेल्या भाज्यांबरोबर कोबीची पाने, लेट्युस, किसलेले गाजर अशा भाज्यासुद्धा घालून व्हेजी रॅप्स अजून पौष्टीक बनवता येवू शकतो.
Labels:
veggie wraps, oil free wraps, healthy vegetable wraps
No comments:
Post a Comment