Thursday, December 27, 2007

आले बटाटा वडी - Alepak

Alepak in English

सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आल्याचा (जिंजर) भरपूर वापर घरात होतो. आल्याच्या वड्या, आल्याचा चहा बर्याचदा केले जातात. या वड्या नेहमीच्या आलेवड्यांपेक्षा मऊ असतात. करायला सोप्या आणि चवीलाही छान.

ginger wadi, aale pak, ale batata vadi, healthy snack, Indian Spicy salty snackसाहित्य:
(मेजरमेंटसाठी जर मेजरमेंट कप उपलब्ध असतील तर १/४ कपचे जे माप आहे त्या प्रमाणात पुढील जिन्नस घेतले तर साधारण २० मध्यम आकाराच्या वड्या पडतील.)
१ मध्यम वाटी किसलेले आले (चेपून भरून)
२ मध्यम वाट्या साखर
१/२ मध्यम वाटी पिठी साखर
१/२ मध्यम वाटी दूध
१ चमचा साजूक तूप
२ मध्यम वाट्या शिजवलेल्या बटाट्याचा किस
वेलची पूड
सजावटीसाठी बदामाचे काप (ऑप्शनल)

कृती:
१) कढईत किंवा नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये किसलेले आले + २ वाट्या साधी साखर + तूप + दूध एकत्र करावे. हाय गॅसवर ढवळत राहावे.
२) आळत आले कि शिजवलेल्या बटाट्याचा किस घालावा. ढवळत राहावे. मिश्रण घट्टसर झाले कि मध्यम आचेवर त्यात पिठी साखर घालावी.
३) मिश्रण वड्या पाडता येतील एवढे दाटसर झाले त्यात वेलचीपूड घालावी. ढवळून घ्यावे.
४) स्टिलच्या ताटाला तूपाचा हात लावून घ्यावा त्यावर मिश्रण समान थापून घ्यावे. सजावटीसाठी बदामाचे काप घालावे. थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.

टीप:
१) वेलचीपूडऐवजी जायफळ पावडरनेसुद्धा छान स्वाद येतो.
२) मिश्रण व्यवस्थित दाट झाल्यावरच ताटात थापावे नाहीतर वड्या चिकट होण्याचा संभव असतो.
३) वड्या लगेच डब्यात भरू नये काही तास मोकळ्या हवेत उघड्याच ठेवाव्यात.

Labels:
Ale Batata Vadi, Ale Pak recipe, Ginger Candy

No comments:

Post a Comment