भाताबरोबर आमटी हा जेवणातला अविभाज्य भाग आहे, कधीतरी आमटीऐवजी एखादा वेगळा प्रकार खायला बरे वाटते. तशीच बीटरूट घालून केलेली ही डाळीची कृती:
साहित्य:
१/२ कप हिरवी मूग डाळ
१ मध्यम बिट
१ लहान कांदा
१ मध्यम टोमॅटो
४-५ लसूण पाकळ्या बारीक चिरून
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
२ टेस्पून बेसन
फोडणीसाठी: १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जीरे, १/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून चमचा हळद
३-४ कढिपत्ता पाने
१ टिस्पून तूप
२ टिस्पून लिंबाचा रस
दिड टिस्पून साखर
चवीपुरते मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) प्रथम मूगाची डाळ कूकरमध्ये शिजवून घ्यावी. बिटाचे तुकडे अर्धवट शिजवून घ्यावे. कांदा टोमॅटोचे चौकोनी तुकडे करून घ्यावे.
२) कढईत तूप गरम करावे. तूपात मोहोरी, जीरे, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, लसूण घालून फोडणी करावी.
३) मध्यम आचेवर फोडणीमध्ये चिरलेला कांदा घालावा. कांदा परतला गेला कि त्यात टोमॅटो घालावा. २-३ मिनीटांनी अर्धवट शिजवलेले बिट घालावे. थोडेसे परतून त्यात १ कप पाणी घालावे. पाव कप पाण्यात चणा पिठ गुठळ्या न होता मिक्स करून कढईत घालावे. १२-१५ मिनीटे वाफ काढावी. सुरीने बिट शिजले आहे कि नाही ते पहावे.
४) नंतर त्यात शिजलेली मूग डाळ घालावी. ५ मिनीटं उकळी काढावी. चवीपुरते मिठ, साखर, आणि लिंबाचा रस घालावा. गरम गरम भाताबरोबर खावे. या डाळीला बिटाचा छानसा रंग येतो.
टीप:
१) या डाळीमध्ये कुठल्याही मसाल्याची आवश्यकता नसते. पण जर गरज वाटलीच तर पाव चमचा गरम मसाला किंवा करी मसाला घालावा.
Labels:
Dal Recipe, Dahl recipe, Moong Dal Recipe, Indian Dal Recipe
No comments:
Post a Comment