साहित्य:
१/४ कप लसणीचे काप
१/४ कप शेंगदाणे
२/३ कप सुके खोबरे (भाजून)
१ चमचा मिठ
१ चमचा सुकी चिंच
१/४ कप लाल तिखट
कृती:
१) प्रथम शेंगदाणे चांगले भाजून घ्यावेत त्याची साले काढून घ्यावीत. त्याचा कूट करून घ्यावा.
२) सुके खोबरे किसून घ्यावे. चांगले खमंग भाजून घ्यावे. यातील २/३ कप भाजलेला किस घ्यावा.
३) मिक्सरमध्ये लसणीचे काप आणि मिठ वाटून घ्यावे. लसणीची बारीक पेस्ट करून घेतली कि चांगले, कारण लसणीसकट सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरवर वाटले तर त्यात लसणीचे बारीक तुकडे राहण्याचा संभव असतो.
४) आता शेंगदाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, लसणीची तयार केलेली पेस्ट, सुकी चिंच, लाल तिखट आणि गरज वाटल्यास मिठ असे सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक होईस्तोवर वाटावे.
हे लसणीचे तिखट तोंडीलावणी म्हणून मस्त लागते.
टीप:
१) चिंचेऐवजी आमचुर पावडरही वापरू शकतो.
२) शक्यतो रेडीमेड किसलेल्या खोबर्यापेक्षा सुक्या खोबर्याची वाटी आणून ती घरी किसावी. त्याचा स्वाद जास्त चांगला लागतो.
३) शेंगदाणे, खोबर्याचा किस खमंग भाजावे. नाहीतर लसणीचे तिखट जास्त टिकत नाही.
Wednesday, March 26, 2008
लसणीचे तिखट - Lasaniche Tikhat
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment