साहित्य:
३/४ मध्यम वाटी चण्याचे पिठ
१ कांदा
३-४ लसूण पाकळ्या (ऑप्शनल)
फोडणीचे साहित्य: मोहोरी, जिरे, हिंग, १ लहान चमचा हळद, कढीपत्ता
२-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
३-४ आमसुल
२-३ चमचे तेल
मिठ
कोथिंबीर
कृती:
१) चण्याचे पिठ पाण्यात गुठळ्या न होता मिक्स करून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे हिंग, हळद, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात लसूण पाकळ्या बारीक करून किंवा ठेचून घालाव्यात. बारीक चिरलेला कांदा फोडणीस घालावा.
३) कांदा निट परतला कि गॅस बारीक करून त्यात भिजवलेले चणा पिठ घालावे. लगेच थोडे पाणी घालावे. गुठळ्या न होता ढवळावे. आवश्यक तेवढा पातळपणा ठेवावा. आमसुल आणि मिठ घालून उकळी काढावी.
गरम गरम पिठले तूप भाताबरोबर झकासच लागते.
Labels:
Pithale, Maharashrian Pithale, Zunka Recipe, Pithala Recipe, Pithla Recipe
Monday, March 24, 2008
चण्याचे पिठले - Chanyache Pithale
Pithale (English Version)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment