प्रांता-प्रांतात जशी जेवणाची पद्धत बदलते, तशी नाक्या-नाक्यावर पाणीपुरी, भेळपुरीची चव बदलत असते. अशाच अनेक पद्धतीतील मी बनवलेल्या "घरगुती आणि चविष्ठ" शेव बटाटा पुरीची हि कृती :
साहित्य:
टॉपिंग
१ मोठा कांदा
२ टोमॅटो
२ मध्यम आकाराचे शिजवलेले बटाटे
पिवळी बारीक शेव (नायलॉन शेव)
बारीक चिरलेली कोथिंबीर
चटण्या
यात तीन प्रकारच्या चटण्या वापरल्या जातात. यातील लाल चटणी थोडी वेगळी आहे पण याने शेव बटाटा पुरीला मस्त स्वाद येतो.
हिरवी चटणी आणि आंबटगोड चटणी
आंबट गोड चटणी
लाल चटणी
१ ते दिड चमचा लाल तिखट
३-४ लसणीच्या पाकळ्या
वरून पेरण्यासाठी
काळे मिठ
चाट मसाला
पुर्यांसाठी साहित्य:
१ ते दिड वाटी कणिक (गव्हाचे पीठ)
२-३ चमचे तेल
मिठ
पाणी
तळण्यासाठी तेल
कृती:
१) पुरीची कृती :
शेव बटाटा पुरीसाठी लागणार पुर्या करायला अगदी सोप्या असतात. जर शक्य असेल तर आपण त्या घरीसुद्धा बनवू शकतो.
तेल भरपूर गरम करावे आणि कणकेच्या पिठाला त्याचे मोहन घालावे. चवीपुरते मीठ घालावे. २-३ मिनीटांनी कणिक घट्ट मळून घ्यावी.थोडावेळ पिठ झाकून ठेवावे. नतंर त्याचे गोटीएवढे गोळे करावे. त्याच्या छोट्या पुर्या लाटाव्यात. काटा-चमच्यातील काट्याने पुरीवर ५-६ वेळा टोचावे (फोटो) त्यामुळे पुर्या फुगणार नाहीत.हे करत असतानाच कढईत तेल तापत ठेवावे. पुर्या मध्यम गॅसवर तळाव्यात. एकदम गरम तेलात भराभर तळून काढू नयेत त्यामुळे पुर्या नरम पडतात आणि पुर्यांना आवश्यक कडकपणा येत नाही. तळलेल्या पुर्या थोडावेळ टीपकागदावर काढून ठेवाव्यात. लगेच डब्यात भरू नयेत.
२) चटण्या
* हिरवी चटणी आणि आंबटगोड चटणी
* लाल चटणी: लाल तिखट, लसूण आणि किंचीत पाणी घालून मिक्सरवर बारीक करावी.
३) सर्वात शेवटी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यावी. बटाटा व्यवस्थित कुस्करून घ्यावा.
४) शेव बटाटा पुरी बनवण्याचा क्रम : पुर्या, बटाटा, कांदा, लाल चटणी, आंबट गोड चटणी, हिरवी चटणी, चाट मसाला, काळे मिठ, शेव, टोमॅटो, कोथिंबीर, थोडे जास्त तिखट हवे असल्यास हिरवी चटणी.
टीप:१) उरलेल्या पुर्या हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. आठवडाभर छान टिकतात.
२) कणिक घट्टच मळली पाहिजे, जर कणिक सैल मळली गेली तर पुर्या नरम होतात.
३) पाणीपुरीच्या न फुगलेल्या पुर्या शेव बटाटा पुरीसाठी वापरता येतात.
No comments:
Post a Comment