Thursday, September 20, 2007

मसूराची आमटी - Masoor Amati

Masoor Amati in English

भाजलेल्या मसूराची आमटी हि बनवायला सोपी तसेच जेव्हा मसूर भिजवलेले नसतील तेव्हा पटकन होण्यासारखी असते. मसूर भाजल्याने आमटीला मस्त खमंगपणा येतो. तसेच मसूर शिजल्यावर आमटी करताना विरघळतही नाहीत.

masoor recipe, masoorachi amti, masur amati, masoorichi amati, dal recipe
साहित्य:
१/२ कप मसूर
१ टोमॅटो
२-३ लसूण पाकळ्या
२ टेस्पून खवलेला नारळ
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१ टिस्पून जीरेपूड
२ टिस्पून गोडा मसाला (काळा मसाला)
सुपारीएवढा गूळ
२ आमसुलं
चवीपुरते मीठ
फोडणीसाठी २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जीरे, चिमुटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, २ ते ३ कढीपत्ता

कृती:
१) सर्वप्रथम मसूर चांगले खमंग भाजावेत. (अंदाजे १५-२० मिनीटे)
२) मसूर थोडे गार झाले कि कूकरमध्ये शिजवून घ्यावे.
३) कढईत २-३ चमचे तेल घ्यावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता तेलात घालून फोडणी करावी. लसणीच्या पाकळया ठेचून फोडणीत घालाव्या. खवलेला नारळ परतून घ्यावा. टोमॅटोच्या फोडी करून परताव्यात.
४) शिजवलेले मसूर पळीने थोडे चेचून घ्यावे. कढईत घालावे. १ ते दिड भांडे पाणी घालावे.
५) एक उकळी आल्यावर त्यात आमसूल घालावे. गोडा मसाला, मीठ आणि गूळ घालावा. मध्यम आचेवर उकळी काढावी. चिरलेली कोथिंबीर घालावी. गरम गरम भाताबरोबर गरम गरम आमटी खावी.

टीप:
१) जर गोडसर आमटी नको असेल तर आमटीत गूळ घालू नये, आणि गोडा मसाल्याऐवजी गरम मसाला किंवा करी मसाला घालावा.

Labels:
Lentil Soup, Masoor Amati, Red Lentil curry, Red Lentil soup

No comments:

Post a Comment