Kulith Usal (English Version)
साहित्य:
पाउण वाटी कुळीथ
फोडणीसाठी:
२ चमचे तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/२ टिस्पून हळद, १ टिस्पून तिखट
१ ते दिड चमच गोडा मसाला
२-३ आमसुलं
सुपारीएवढा गूळ
मीठ
कोथिंबीर
कृती:
१) पाउण वाटी कुळी रात्रभर पाण्यात भिजत घालावेत (किमान १०-१२ तास). नंतर ते उपसून निथळत ठेवावेत. भिजलेले कुळीथ स्वच्छ पंचामध्ये मोड येण्यासाठी किमान ७-८ तास घट्ट बांधून उबदार ठिकाणी ठेवावेत.
२) कूकरच्या तळाला २ भांडी पाणी घालावे. मोड आलेले कुळीथ कूकरच्या डब्यात घ्यावेत. त्यात दुप्पट पाणी घालावे व कुळीथ शिजवून घ्यावे. कूकरच्या खुप शिट्ट्या करू नये. कुळीथ जास्त प्रमाणात शिजू देवू नये, कुळीथ अख्खे राहिले पाहिजेत.
३) शिजलेले कुळीथ व पाणी वेगवेगळे करावे. या पाण्याचे कळण करता येते.
४) कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. शिजलेले कुळीथ फोडणीस टाकावे. सावकाशपणे ढवळून मिठ, गोडा मसाला आणि आमसुल घालावे. मध्यम आचेवर १ वाफ काढावी. नंतर त्यात गूळ घालावा. गरज पडल्यास किंचीत पाणी घालावे व एक उकळी काढावी.
Labels: Kulith Usal, Horsegram Usal, Kulathachi Usal
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment