Samosa Puff In English
ही पाककृती खासकरून अमेरीकेतील समोसाप्रेमींसाठी आहे, Pillsbury चे रेफ्रिजरेटेड क्रेसेंट रोल्स कुठल्याही सुपरमार्केटमध्ये उपलब्ध असतात. क्रेसेंट रोल्स भारतात कुठे मिळतील याबद्दल मला फारशी कल्पना नाही.
साहित्य:
रेफ्रिजरेटेड क्रेसेंट रोल्स (Crescent Rolls)
(कुठल्याही सूपर मार्केटमध्ये रेफ्रिजरेटेड सेक्शनमध्ये मिळते.)
स्टफिंगसाठी:
२ शिजवलेले बटाटे
१ वाटी शिजवलेले हिरवे वाटाणे
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ चमचा गरम मसाला
१ लहान चमचा आमचूर पावडर
१ चमचा धनेपूड
१ चमचा बडीशेप
१-२ चमचे तेल
फोडेणीसाठी मोहोरी, जिरे, हळद, कढीपत्ता
मीठ
कृती:
आपण समोसे बनवताना जसे सारण बनवतो तसेच सारण बनवायचे आहे.
१) बटाटे सोलून व्यवस्थित कुस्करून घ्यायचे.
२) कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हळद, कढीपत्ता, बडीशेप, मिरच्या घालाव्यात. वाटाणे घालून एक-दोन मिनीटे परतावे.
३) कुस्करलेले बटाटे घालावेत. गरम मसाला, धणेपूड, आमचूर पावडर आणि मिठ घालावे, व्यवस्थित मिक्स करावे.
४) क्रेसेंट रोल्सच्या "pipe shaped" पॅकमध्ये ८ त्रिकोणी चकत्या असतात. त्या अलगदपणे सेपरेट कराव्यात. त्यातील लहान बाजूवर १ ते दिड चमचा सारण ठेवावे. रोल करावा. चित्रात दाखवल्याप्रमाणे.
५) ओव्हन ३७० F वर प्रिहीट करावे. तयार केलेले रोल्स १५ -१८ मिनीटे बेक करावे.
टीप:
१) आपण आपल्या आवडीचे स्टफिंग बनवून व्हरायटी पफ बनवू शकतो.
२) तिखटपणा जास्त हवा असेल तर मिरचीचा ठेचा वापरावा.
Labels:
Samosa Puff, Samosa stuffing recipe, samosa recipe, spicy samosa recipe
Wednesday, November 14, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment